महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का: शिंदे-फडणवीसांकडून CBI चौकशीच्या परवानगीचा निर्णय रद्द

मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने सीबीआयला कोणत्याही प्रकरणात तपासासाठी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीची गरज लागणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तोच निर्णय आता राज्यातील नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने बदलत सीबीआयला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची असलेली ‘जनरल कॅसेन्ट’ पुन्हा बहाल केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी काढून घेतली … Read more

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला राज्य सरकारची स्थगिती; पुन्हा घेणार निर्णय

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत. सरकार कोसळण्यापूर्वी 29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ … Read more

ठाकरे सरकार मोठा निर्णय; सामाजिक आंदोलनातील खटले मागे

मुंबई – राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटल्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रिय समिती गठीत करण्यास व समितीने त्यावर प्रकरणपरत्वे निर्णय घेण्यास मान्यता देण्यात … Read more

ठाकरे सरकारचा निर्णय! सरकार कोसळण्याआधीच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार कोसळण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारने कर्जाचे पैसे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोविडची स्थिती आणि … Read more

आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार का?

मुंबई : आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 14 हजार कोटींचा जीएसटी परतावा देण्यात आला आहे. आतातरी केंद्रावर खापर न फोडता राज्य सरकार पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का, असा टोला लगावत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीच्या परताव्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत ट्विट करताना फडणवीसांनी म्हटले आहे की, “31 मे 2022 पर्यंतचा … Read more

ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय,’एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन’

मुंबई  : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ … Read more

ठाकरे सरकार राज्यपालांवर मेहरबान; राजभवनाच्या खर्चात दोन वर्षात 18 कोटींची वाढ

मुंबई  – महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्यामध्ये वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. दुसरीकडे राजभवनाच्या खर्चात कोट्यवधीची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. राजभवनाच्या खर्चात तब्बल 18 कोटींची वाढ झाली आहे. यावरून ठाकरे सरकार हे राज्यपाल कार्यालयावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे राज्यपाल आणि राज्य शासनामध्ये संघर्ष सुरू असताना दुसरीकडे राज्य शासन … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे, ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा झाली. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सभेतून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आणि आरोपांना जोरदार उत्तर दिले. दरम्यान, या सभेत भाजपकडून हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले. जाणून घेऊया फडणवीस … Read more

अन्यायाबाबत केंद्राकडे तक्रार करणार; ठाकरे सरकारविरुद्ध रवी राणा आक्रमक

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली आहे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. तसेच आम्ही न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केले नसल्याचे देखील स्पष्टीकरण राणा दाम्पत्यांनी दिले आहे. आमदार रवी राणा यांनी मुंबईतील खार निवासस्थानाहून दिल्लीकडे जाताना माध्यमांशी संवाद साधला … Read more

सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर घणाघात,’आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली…’

पुणे –  गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखांचा ‘खेळ’ अखेर थांबला असून आठवडाभराच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा. असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाालिकांच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या या … Read more