Pune Crime: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात चोरी; दानपेट्या फोडून 2 लाखांची रोकड लंपास

पुणे- येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. मंदिराचे विश्वस्त सुधीर वसंतराव वांबुरे (वय ६७, रा. येरवडा गाव) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा गावातील टेकडीवर श्री तारकेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून चोरटा आत शिरला. मंदिरात ठेवलेल्या सहा दानपेट्या फोडून चोरट्याने … Read more

Pune Crime: चांदीची मूर्ती घेण्याचा बहाणा, मालकाला बोलण्यात गुंतवून 19 लाखांचे दागिने पळवले; चोरीची घटना CCTVत कैद

Pune Crime: चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने मालकाला बोलण्यात गुंतवून ठेवत सहकाऱ्याने ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचे सोन्याचे दागिने पळविली असल्याची घटना येरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्स मध्ये घडली आहे.

याप्रकरणी राकेश गोपीलाल जैन (-४४, रा. नीता पार्क कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विमानतळ रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात ६ चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) रोजी सकाळी ११ च्या सुमारास महावीर ज्वेलर्स येरवडा बाजार येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी राकेश जैन हे महावीर ज्वेलर्सचे मालक आहेत. फिर्यादी राकेश जैन हे सकाळी ११ वाजता दुकानात एकटे असतांना ६ चोरट्यांचे टोळके महावीर ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने घुसले. यातील एकाने मुलीसाठी अंगठी पाहिजे असल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी जैन यांनी अंगठी दाखवली असता त्याने ती बघून परत केली. त्यानंतर टोळक्यातील दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचे फिर्यादी जैन यांना सांगितले.

यामुळे फिर्यादी काऊंटरवरून उठून बाजूला असलेल्या शोकेरा मधील मूर्ती दाखवायला गेले. चोरट्यांनी मूर्ती पहिल्या पण ते काही घेतल्या नाही. या दरम्यान फिर्यादी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतर चोरट्याने काउंटरच्या ड्रावरमध्ये ठेवलेले पॅकेट मधील सोन्याची चैन, मंगळसूत्र, मणी, मंगळसूत्रातील वाटी, सोन्याच्या ९ अंगठ्या, असा १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

nagar | प्रवासादरम्य़ान चार लाखांच्या दागिन्यांची चोरी

नगर, (प्रतिनिधी) – महिलेच्या ४ लाख ४ हजार रूपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी अहमदनगर ते शेवगाव प्रवासा दरम्यान झाली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता कल्याण पागर (रा. रेणुकानगर, केडगाव) या नातेवाईकाच्या लग्नासाठी गुरूवारी (दि.२) सकाळी साडे नऊ वाजता माळीवाडा बसस्थानकात आल्या. त्यांच्यासमवेत इतर नातेवाईक ही होते. त्या शेवगावला जाणाऱ्या बसमध्ये … Read more

पुणे | डॉक्टरांच्या बंगल्यात चोरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सिंहगड रस्ता परिसरातील एका डॉक्टरांच्या बंगल्यात चोरी केली असून, ४४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. त्यामध्ये ६० हजारांची रोकड, सोने-चांदी आणि हिर्‍यांच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (६८, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात … Read more

satara | वाई पोलिसांकडून दुचाकीचोरास अटक

वाई, (प्रतिनिधी) – एका दुचाकी चोरटयास अटक करत वाई पोलिसांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सोन्या उर्फ प्रीतम सुनील शिंदे (रा. गंगापुरी, वाई) असे याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकीही जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना वाहन … Read more

नगर | ३० लाखांचा ढंपर चोरी करणारा मुद्देमालासह जेरबंद

नगर – राहुरी फॅक्टरी येथील मुसमाडे यांच्या पेट्रोलपंपावर लावलेला हायवा ढंपर चोरुन नेणारा मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रकाश एकनाथ कदम (रा. साकुरी, ता. राहाता, जि. नगर), असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

satara | घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात 14 ठिकाणी आणि अन्य जिल्ह्यांमध्ये घरफोड्या करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीने केलेल्या घरफोडीच्या 18 आणि चोरीच्या आठ गुन्ह्यांचा तपास करून, पोलिसांनी 40 लाख पाच हजार रुपये किमतीचे अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत … Read more

satara | जबरी चोरीच्या गुन्ह्यात तिघांना आठ वर्षे सक्तमजुरी

कराड (प्रतिनिधी) – जबरी चोरीच्या गुन्ह्यात रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा (रा. वसई, जि. पालघर), विजय शंकर पवार (रा. मोळाचा ओढा, सातारा) आणि रवींद्र गोरखनाथ निकम (रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा, मूळ रा. जांब बुद्रुक, ता. कोरेगाव) यांना कराड न्यायालयाने आठ वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली, तर अनुज गंगाराम चौगुले (रा. … Read more

satara | कोयत्याच्या धाकाने परप्रांतीय तरुणाला लुटले

सातारा, (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक शिखर प्रदीप श्रीवास्तव (रा. गोमतीनगर, लखनौ, उत्तर प्रदेश, सध्या रा. यशोदानगर) या युवकाला चार जणांनी कोयत्याचा धाक दाखवून, त्याच्याकडून साडेसात हजार रुपये रक्कम लुटल्याची घटना सोमवारी (दि. 18) रात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर श्रीवास्तव यांची … Read more

nagar | टाकळी मानूर दरोडाप्रकरणी सहा आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दरोडाप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपी जेरबंद केले आहेत. या घटनेत १३ आरोपींचा समावेश असून ७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील तुकाराम धोंडीबा पवार, (रा. पाथर्डी) हा चोरी करणे करीता आगोदर बोलावुन घेऊन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवायचा. त्यानंतर चोर रात्रीचे वेळी … Read more