Thomas and Uber Cup 2022 : भारतीय संघाची ऐतिहासिक पदकनिश्‍चिती

बॅंकॉक – थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने मलेशिया संघाचा 3-2 असे पराभव करत ब्रॉंझपदकाची निश्‍चिती केली. या स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तब्बल 43 वर्षांनी भारतीय संघाने या स्पर्धेत या फेरीत प्रवेश घेत इतिहास रचला आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनला ली झी जिआकडून 21-23, 9-21 असा पराभव … Read more

Thomas and Uber Cup 2022 : उबेर चषकातील भारताचे आव्हान संपुष्टात

बॅंकॉक – भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला रत्चानोक इंतानोनकडून संघर्षपूर्ण लढतीत पराभव पत्करावा लागला. यामुळे उपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी थायलंडकडून 0-3 असा पराभूत झाल्याने भारतीय महिला बॅडमिंटन संघाचे उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीच्या गटात जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला 59 मिनिटांच्या लढतीत आठव्या क्रमांकावर असलेल्या इंतानोनविरुद्ध … Read more

Thomas and Uber Cup 2022 : अमेरिकेवर मात करत भारत उपांत्यपूर्व फेरीत

बॅंकॉक – उबर करंडक महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मंगळवारी झालेल्या पाच सामन्यांत भारतीय संघाने अमेरिकेवर 4-1 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताने कॅनडाचा असाच 4-1 पराभव केला होता. भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हीने जेनी गेइवर 21-10, 21-11 अशी मात … Read more

Thomas and Uber Cup 2022 : भारताकडून जर्मनीपाठोपाठ कॅनडाचाही 5-0 ने धुव्वा

बॅंकॉक – भारतीय बॅडमिंटनपटूंनी येथे सुरु असलेल्या थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत जर्मनीपाठोपाठ कॅनडाचाही 5-0 असा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सोमवारी झालेल्या लढतींमध्ये किदाम्बी श्रीकांतने ब्रायन यंगवर 20-22, 21-11, 21-15 अशी मात केली. दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने जेसन अँथनी … Read more