पुणे जिल्हा : सिमेंट गोणीचा ट्रक उलटला ;रस्त्याच्या कामामुळे तीन दिवसांत तीन वाहने उलटली

ट्रक चालकासह इतर दोनजण जखमी : आंदोलनाचा इशारा मंचर – लोणी ते मंचर (ता. आंबेगाव) येथील रस्त्यावर निरगुडसर फाटा हांडेवस्तीजवळ सिमेंट मालवाहू ट्रक शुक्रवारी (दि. 28) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उलटला आहे. या अपघातात ट्रक चालक आणि इतर दोनजण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे गेल्या तीन दिवसात तीन वाहने येथे उलटली आहेत. या अपघातात … Read more

Pune : गणेशोत्सव काळात ‘या’ दिवसात दारू विक्रीला बंदी

पुणे : गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या (दारू विक्री) सर्व अनुज्ञप्ती 31 ऑगस्ट,9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर दिवशी बंद राहतील. तसेच गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र … Read more

पुणे जिल्हा : तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मागे

केवळ 14 जूनला बंद राहणार मंदिर पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.14) शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून तुकोबांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देहू संस्थानने घेतला होता. मात्र, समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया आणि भाविकांची होणारी गैरसोय यामुळे हा निर्णय बदलण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष … Read more

धक्कादायक! अंत्यसंस्कार करताना अचानक शवदाहिनीतील गॅस संपला; मृतदेह तीन दिवस पडून

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत एका धक्कादायक घटना घडली आहे.  गॅस शवदाहिनीमधील गॅस अचानक संपला. त्यामुळे शवदाहिनीतील  मृतदेहावर अर्धवट अंत्यसंस्कार झाल्याची  खळबळजनक घटना घडली आहे. तब्बल तीन दिवसांनी गॅस भरण्यात आल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले. मात्र तोपर्यंत पार्थिव तिथेच पडून राहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीमध्ये शनिवारी रात्री … Read more

हैदराबादसाठी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस

पुणे –बहुप्रतीक्षित हडपसर-हैदराबाद मार्गावर त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे दि.9 जुलैपासून धावणार आहे. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हडपसर टर्मिनसची पाहणी केली. सध्या येथे विविध कामे सुरू असल्याने, येथून धावणाऱ्या रेल्वेचा मुहूर्त सातत्याने पुढे सरकत होता. ही विशेष रेल्वे हडपसर येथून मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी दुपारी 3.30 वाजता सुटणार आहेत. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 3.35 वाजता हैदराबाद … Read more

सातारा | डोंगरीभागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान; तीन दिवसात प्रस्ताव करा

सातारा  : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करुन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शुभूराज देसाई यांनी केल्या. पाटण तालुक्यातील अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पाहणी गृह राज्यमंत्री देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या पाहणी … Read more

फक्त प्रतीक्षा! स्वॅब रिपोर्टसाठी तीन दिवस ‘वेटिंग’

पुणे – करोनाचे गंभीर रुग्ण वाढत आहेत. त्यात रुग्णांचा शासकीय चाचणी केंद्रावरील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अहवाल येण्यापूर्वी करोना झाला आहे का नाही, हे तपासणीसाठी नागरिक सीटी स्कॅन करण्यावर भर देत आहेत. त्यात करोना विषाणू फुफ्फुस निकामी करत असल्याचे दिसले, तरी चाचणी अहवाल असल्याशिवाय अनेक … Read more

#INDvENG : इंग्लंड संघ तीन दिवस विलगीकरणात

नवी दिल्ली – भारताविरुद्धच्या मालिकेसाठी येत्या बुधवारी दाखल होत असलेला इंग्लंडच्या संघाला तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंकेत मालिका खेळत असून भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नई येथे येत्या 5 फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटीने प्रारंभ होत आहे. इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाल्यावर चेन्नईतच त्यांना तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. भारतीय संघ … Read more

चीनकडून पुन्हा दगाफटका ! तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये संघर्ष; २० सैनिक जखमी

सिक्कीम : पूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा अतिक्रमणाचा हा डाव उधळून लावला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी … Read more

#IPL2020 : विलगीकरणाचा कालावधी तीन दिवसांचा करा

बीसीसीआयकडे संघमालकांची मागणी नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धेसाठी अमिरातीत गेल्यानंतर सहभागी होत असलेल्या सर्व संघांच्या खेळाडूंना तीन दिवसांसाठीच विलगीकरणात ठेवले जावे, अशी मागणी सर्व संघमालकांनी अमिराती सरकार व बीसीसीआयकडे केली आहे. स्पर्धा होणार असे निश्‍चित झाले त्यावेळी 14 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. करोनाचा धोका अत्यंत कमी असल्याने हा कालावधी 6 दिवसांपर्यंत कमी … Read more