बंगालमधील निवडणूक वेळापत्रक बदलण्यास नकार

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकात कुठला बदल करण्यास निवडणूक आयोगाने नकार दर्शवला आहे. सहाव्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी आयोगाने त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. करोना संकटाची तीव्रता वाढल्याने निवडणूक वेळापत्रकात बदल करण्याची आग्रही मागणी तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी केली होती. तीन टप्प्यांचे मतदान एकाच वेळी घ्यावे, असे तृणमूलचे म्हणणे … Read more

‘गेट’ परीक्षा ५ फेब्रुवारीपासून

‘गेट’ परीक्षा ५ फेब्रुवारीपासून
December 13, 2020 03:38:17 PM0

मुंबई (प्रतिनिधी) : पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ परीक्षा यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. देशातील आयआयटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांच्या प्रतिनिधींच्या गेट २०२१ कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेट परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत परीक्षा रोज दोन सत्रांत घेण्याचे ठरविण्यात आले. या वर्षी दोन अतिरिक्त विषयांचा समावेश झाल्याने परीक्षा २७ विषयांसाठी होईल. एक विद्यार्थी एका अर्जावर दोन विषयांच्या परीक्षेला बसू शकतो.

अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या पाहून भविष्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले. सध्या ही परीक्षा ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पार पडेल.

तंत्रशिक्षणच्या बॅकलॉग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित आणि तंत्रशिक्षणच्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष वगळता उर्वरित बॅकलॉग परीक्षेचे वेळापत्रक राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले. त्यानुसार या परीक्षा 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षा संस्थास्तरावर होणार आहे. त्याबाबतची कार्यपद्धती राज्य तंत्रशिक्षण मंडळाने जाहीर केली. प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून … Read more

प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे – तंत्रशिक्षणच्या 6 व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणाच्या 8 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अशा 14 परीक्षांचे (सीईटी) वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले. यात सर्वात महत्त्वाची मानली जाणारी म्हणजेच अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशासाठी अनिवार्य असणारी “एमएचटी-सीईटी’ 13 ते 17 एप्रिल आणि 20 ते 23 एप्रिल या कालावधीत दोन टप्प्यांत होत आहे. राज्य सीईटी सेलची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमावेत … Read more

‘सीए’ परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर

19,20 नोव्हेंबरला होणार परीक्षा पुणे – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या पुढे ढकललेल्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षा 19 आणि 20 नोव्हेंबरला होणार आहेत. “आयसीएआय’ने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर गुरुवारी प्रसिद्ध केले. या परीक्षा नियोजित वेळापत्रकनुसार पूर्वी 9 आणि 11 नोव्हेंबरला घेतल्या जाणार होत्या. मात्र, सर्वोच्च … Read more

दहावी व बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात एकाच … Read more

तांत्रिक कारणांसाठी काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल

पुणे – मुंबई विभागामधील मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान “अप लाइन’च्या अत्यावश्‍यक कामास्तव रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकडे ये-जा करणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या अंशत: आणि पूर्णत: रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दि. 5 ते 14 ऑक्‍टोबर – कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस पुणे … Read more

बसथांब्यांवरील वेळापत्रकच देतेय धोका

वेळापत्रकावरील वेळ आणि बस धावण्याच्या वेळेत तफावत पुणे – शहरातील नागरिकांसाठी सर्वात मोठे साधन म्हणून पीएमपी वाहतूक सेवेला प्राधान्य दिले जाते. परंतु, पीएमपी बस वेळेत धावत नसल्याने प्रवाशांची धांदल उडत आहे. बस थांब्यावरील वेळापत्रक व धावत असलेल्या बस या दोघांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. यासाठी अनेकदा चालक-वाहकांना जबाबदार धरण्यात येत. मात्र, बस थांब्यावरील … Read more

पिंपरीचिंचवड : एक दिवस पाणी पुरवठा बंदचे वेळापत्रक

महापालिकेचा निर्णय : पाणी पुरवठा विभागाकडून वेळापत्रक जाहीर पिंपरी – दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय महापालिकेने आठवडाभरातच बदलला असून सोमवारपासून (दि. 19) आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. एका दिवशी, एकेका भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असून त्याचे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाने आज जाहीर केले. एक दिवस पाणी पुरवठ्याचे सविस्तर बंदचे वेळापत्रक सोमवार – … Read more