नाशिकमध्‍ये कांदा, टोमॅटोने केले मतदान; शेतकऱ्यांकडून निर्यात बंदीचा रोष अनोख्‍या पद्धतीने व्‍यक्‍त

Nashik | Farmers | Voting – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तर राज्‍यातील शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आज मतदान पार पडले. मात्र काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीचा रोष नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज अनोख्या पद्धतीने मतदान करत शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे आणि टोमॅटोचा … Read more

पिंपरी | मिरची, टोमॅटो, कोबी तीव्र उष्णतेमुळे धोक्यात

कान्‍हे, (वार्ताहर) – काही आठवड्यांपासून वाढत्या उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम मावळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. कार्ला, कान्‍हे, टाकवे, पवनानगर आदी परिसरात मिरची, टोमॅटो, कलिंगड व कोबीचे पीक या तीव्र उष्णतेमुळे धोक्यात आले आहे. गर्द झाली असूनही मावळ तालुक्‍यातील उन्‍हाचा पारा ४० अंशांच्‍या वर गेला आहे. टोमॅटो, मिरची व कोबीसाठी लाखो रुपये खर्च करून … Read more

पुणे जिल्हा | शेतकरी “महादेव”साठी तैवान पिंक पेरूची शेती ठरली आधार

वडापुरी, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील महादेव संपत खबाले या युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात केलेल्या तैवान पिंक पेरूची शेती त्यांच्यासाठी घराला आधार ठरली आहे. शाहूपुरी तालीम कोल्हापूर येथील लाल मातीत कुस्ती खेळणारा महादेव गावाकडे आल्यानंतर शेतीकडे वळला. शेतीतील आधुनिक ऊस पिकाकडे दुर्लक्ष करून महादेव खबाले यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून पेरू, डाळिंब, … Read more

plastic virus : शेतकरी पुन्हा अडचणीत ! टोमॅटो शेती प्लॅस्टिक व्हायरसच्या विळख्यात

नाशिक – कांद्या पाठोपाठ जिल्ह्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटोला भाव मिळत नाही. त्यातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. स्थानिक बोली भाषेत शेतकऱ्यांनी “प्लॅस्टिक व्हायरस’ (plastic virus) असे रोगाला नाव दिले आहे. शेतकऱ्यांना धडकी भरविणारा हा प्लॅस्टिक व्हायरसमुळे शेतच्या-शेत वाया जात असल्याने शेतकऱ्यावर नवे संकट उभे … Read more

200 रुपये किलोने विकणारे टोमॅटो आले 2 रुपये किलोवर; रस्त्यावर फेकून केला ‘लाल चिखल’

छत्रपती संभाजीनगर – सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 200 रुपये किलोन विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन रुपयांवर आले आहे. त्यामुळे येथील जाधव मंडीमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतून लाल चिखल केला आहे. दर घसरल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. दीडशे ते दोनशे रुपये … Read more

‘….तर भविष्यात 5000 रु. सिलेंडर अन् 1500 रु. किलो टोमॅटो होतील”; केंद्राच्या ‘वन नेशन-वन इलेक्शन’वर केजरीवालांची टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकाने देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची म्हणजेच ‘वन नेशन वन इलेक्शन’ संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला  आहे. यावर विचार करण्यासाठी मोदी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीदेखील स्थापन केली आहे. मात्र, याबाबत विरोधी पक्षनेत्यांच्यामतांमध्ये भिन्नता आढळून आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जयपूरमध्ये म्हटले आहे की, देशात एकाचवेळी … Read more

पुणे जिल्हा : कांबळवडीतील टोमॅटो उत्पादक लखपती

नीरा – परिंचे (ता. पुरंदर) जवळील कांबळवडी येथील शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केल आहे. मागील चार वर्षांत या टोमॅटो उत्पादकांचा झालेला तोटा यावर्षी शेतकऱ्यांनी भरून काढला आहे. या वर्षी मागील चार वर्षात टोमॅटोला विक्रमी भाव मिळाला आहे. साधारण 2 ते 3 हजार रुपये असा भाव टोमॅटोच्या कॅरेटला मिळाला आहे. त्यामुळे पुरंदरमधील छोट्याशा कांबळवडीतील चार शेतकरी लखपती … Read more

PUNE: टोमॅटोची आवक, दर आवाक्‍यात

पुणे – महिन्याभरापूर्वी किरकोळ बाजारात 200 रुपये किलो झालेल्या टोमॅटोच्या भावात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन आलेल्या पिकामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात टोमॅटोची आवक वाढली आहे. महिन्याच्या तुलनेत आता दुप्पट आवक होत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोला किलोला 25 ते 35 रुपये, तर किरकोळ बाजारात 50 ते 70 रुपये भाव मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला … Read more

आजपासून टोमॅटो 50 रुपये किलो

ग्राहक व्यवहार विभागाने NCCF आणि Nafed ला 15 ऑगस्ट 2023 पासून टोमॅटो 50 रुपये प्रति किलो या किरकोळ दराने विकण्याचे निर्देश दिले आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कमी होत असल्याने विभागाने हा निर्णय घेतला आहे. NCCF आणि Nafed द्वारे दिल्ली-NCR मध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री 14 जुलै 2023 पासून सुरू झाली. ऑगस्ट 2023 मध्ये दोन्ही एजन्सींकडून … Read more

सात मिनिटात तीन टन टोमॅटोचे बुकींग

नवी दिल्ली – स्वस्त टोमॅटोसाठी देशातील प्रत्येक मंडईपासून ऑनलाइनपर्यंत चढाओढ लागली आहे. आता सर्वांनाच स्वस्त टोमॅटोची आस लागली आहे. आता सरकारने 70 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल उघडले असून, या पोर्टलवर सात मिनिटात तीन टन टोमॅटोचे बुकींग करण्यात आले. टोमॅटोच्या किमतीचा समतोल राखण्यासाठी भारत सरकार नेपाळमधून टोमॅटो आयात करत आहे जेणेकरून बाजारात … Read more