पुणे | १५ दिवसांत ट्रॅक्टर आणि १० दुचाकी चोरल्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एका अल्पवयीन मुलाने केवळ मौजमजेसाठी १५ दिवसांत तब्बल १० दुचाकी आणि एक ट्रॅक्टर चोरला. वाहने चालवण्याची हौस फिटल्यानंतर ती रस्त्याकडेला सोडून दिली. त्याने हिंजवडी, वारजे माळवाडी, भारती विद्यापीठ, पर्वती, अलंकार आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही वाहने चोरली होती. वारजे पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली, त्याच्या ताब्यातून … Read more

मिरज -सोलापूर हायवेवर अपघात; ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने उडवले

सोलापूर – मिरज – सोलापूर हायवेवर ट्रकने ऊसतोड कामगारांना दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 जण गंभीर जखमी झालेत. हे कामगार ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत होते. तेव्हा ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. मृतांपैकी 3 जण चिखलगीचे, तर 1 जण शिरनांदगीचा रहिवाशी आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना नागपूर -रत्नागिरी महामार्गावरील कवठेमहांकाळ … Read more

पुणे जिल्हा: बायफच्या चार एकर चार्‍यावर फिरविला नांगर

लोणी काळभोर – बायफचे कम्पाऊंड तोडून चार एकराच्या चार्‍यावर ट्रॅक्टरने नांगर फिरविल्याची घटना घडली. उरुळी कांचन (ता. हवेली) जवळील टिळेकरवाडीमध्ये घडली. याप्रकरणी मयुरेश मुकुंद कुलकर्णी (वय 40, रा. ऊरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अर्जुन गोपीचंद कादबाने (रा. सहजपूर, ता. दौड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

सातारा – ट्रॅक्टर -दुचाकी अपघातात उपवळेचा दुचाकीस्वार ठार

फलटण – फलटण-उपळवे रस्त्यावर दालवडी गावच्या हद्दीत ऊसाने भरलेल्या ट्रॉलीतील ऊसाचा धक्का मोटारसायकलला लागून झालेल्या अपघातात केरबा ज्योतिबा कर्णे (वय 73, रा. उपळवे ता. फलटण) हे वृद्ध ठार झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री साङेआठ वाजण्याच्या दरम्यान फलटण ते उपळवे रस्त्यावर दालवडी गावच्या हद्दीत असणार्‍या चढावर केरबा ज्योतिबा कर्णे … Read more

उकिरड्यातून कमवा सोने; शेण खताला मागणी

नगर – रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य ही धोक्‍यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारावा, यासाठी शेतकरी आता पुन्हा शेणखताकडे वळू लागले आहेत. मात्र, पशुधनात होणाऱ्या घटमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापिक होण्याचा धोका … Read more

ट्रॅक्‍टरखाली सापडून सात वर्षांचा मुलगा ठार

पुसेगाव – कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर वर्धनगड घाटातील लक्ष्मीआई मंदिराजवळ ट्रॅक्‍टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून शौर्य काकडे (वय 7, रा. कोरेगाव) हा जागीच ठार झाला. कोरेगाव येथील काकडे दाम्पत्य हे मुलगा शौर्यला घेऊन मोटारसायकल (एमएच-42-डब्लू-2409) वरून मोहोद, ता. सांगोला येथे निघाले होते. वर्धनगड घाटात लक्ष्मीआई मंदिरानजीक दोन ट्रॉली असलेल्या ट्रॅक्‍टर (एमएच-11-सीडब्लू-6456) ला ओव्हरटेक करताना, पुढून वाहने आल्याने, काकडे यांनी … Read more

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

संगमनेर – पुण्याहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने ट्रॅक्‍टरला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत ट्रॅक्‍टरचे मधोमध दोन तुकडे होऊन त्याखाली दबल्याने चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्यासह दोन विद्यार्थीनीही जखमी झाल्या. अपघातानंतर पीकअप चालक वाहन सोडून पसार झाला. डोळासणे शिवारातील बांबलेवाडीजवळ गुरुवारी (ता.13) सकाळी आठच्या सुमारास हा … Read more

ट्रॅक्टर उलटून पुण्यातील तरुणाचा मृत्यू, संगमनेर तालुक्यात अपघात

संगमनेर – संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील कर्जुले पठार येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बाजूच्या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून एकजण जागीच ठार झाला. योगेश विलास बर्डे (वय 22, रा. नायगाव थेऊर, पुणे) हा कर्जुले पठार येथील नातेवाईकांकडे आलेला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिकच्या दिशेने ट्रॅक्टरमधून वरूडी फाट्याकडे येत होता. त्यानंतर ट्रॅक्टर गावाच्या पुढे आल्यानंतर थेट पलटी झाला. ट्रॅक्टरखाली … Read more

…तर बुलडोझरचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रस्त्यावर उतरतील

नवी दिल्ली – भारतीय किसान युनियनचे (BKU) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. दहा वर्षे जुने ट्रॅक्टर उद्ध्वस्त करण्याचा विचार सरकारने केला तरी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर योगी सरकारच्या बुलडोझरला सामोरे जातील आणि या लढाईत विजयही फक्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचाच  होईल. राकेश टिकैत शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात पोहोचले होते. … Read more

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या गाडीला अपघात

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या गाडीला अपघात झाला आहे. हा अपघात जालौन येथे घडला. भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनरची ट्रॅक्टरला धडक बसून हा अपघात घडला. या अपघातात फॉर्च्युनरचे नुकसान झाले असून केशव मौर्य यांचा मुलगा योगेश मौर्य अपघातात बालंबाल बचावला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी … Read more