Pune: पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांची बदली

पुणे –  पुणे विभागासह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी किरण क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, बुक्के यांना नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. विधी व न्याय विभागाने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पुणे या विभागांतील सह धर्मादाय आयुक्तांच्या बदल्या … Read more

यूपी मदरसा कायदा रद्दचा निर्णय स्थगित: सुप्रीम कोर्ट म्हणाले, “17 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम, दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर योग्य नाही”

लखनौ – ‘यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन ऍक्ट 2004’ असंवैधानिक घोषित करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 22 मार्चच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासोबतच उत्तर प्रदेश सरकारकडून उत्तर मागवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा 17 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार असून, विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर करण्याचे निर्देश देणे योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. 22 … Read more

पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली; अमितेश कुमार नवे आयुक्‍त

पुणे – पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने होमगार्डचे महासमादेशक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर् शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी सर्वाधिक काळ राहिलेले अधिकारी आहेत. तर सह पोलीस आयुक्त म्हणून प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवार हे कोकण … Read more

अहमदनगर – वैद्यकीय अधिकार्‍यांचा बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे

टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री देशमुख यांनी दिले. येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारी होत असूनही त्यांना कामकाजात सुधारणा करण्याची संधी देण्यात आली मात्र त्यांच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले … Read more

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरण : जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली

मुंबई  – जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. त्यानंतर, या सर्व प्रकरणाची गृह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागाने दिले … Read more

PUNE : डॉ. भगवान पवार पुन्हा महापालिकेत; बदलीच्या आदेशाला मॅटची स्थगिती

पुणे – महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदावर डॉ. भगवान पवार यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडून महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदाची जबाबदारी डॉ. पवार यांच्याकडे देण्यात आल्यानंतर 4 सप्टेंबर 2023 ला त्यांची महापालिकेतून बदली करण्याचे आदेश शासनाने काढले. तसेच त्यांच्याकडे अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या सहाय्यक संचालक पदाचा पदभार देण्यात आला. मात्र, या बदली विरोधात … Read more

तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

पुणे – तलाठी यांच्या बदलीचे अधिकार हे प्रांताधिकाऱ्यांना होते. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्‍यांमध्येच तलाठ्यांची पूर्ण सेवा होत होती. आता शासनाने यामध्ये बदल करून हे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे तलाठी यांच्या बदली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्‍यात होणार आहे. 2013 पासून उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी यांच्या कार्यालयांची पुनर्रचना होऊन एका उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एक किंवा … Read more

‘तो’ हट्ट पडला महागात; 7 तहसीलदार आणि 4 उपजिल्हाधिकाऱ्यांना केलं निलंबित

मुंबई – बदली (transfer) झालेली असताना मिळालेल्या ठिकाणी रुजू न होता मनासारख्या ठिकाणी बदलीचा हट्ट धरणाऱ्या सात तहसीलदार आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. मनासारखी पोस्टिंग न मिळाल्याने तब्बल 30 उपजिल्हाधिकाऱ्यांनी गेली दोन महिन्यापासून पोस्टिंग स्वीकारली नव्हती. यातील बरेचसे अधिकारी मंत्रालय आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये फेऱ्या मारत होते. अधिकारी कामावर रुजू न झाल्याने त्या … Read more

Pune: जिल्ह्यातील दोन आरोग्य प्रमुखांची बदली; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

पुणे  – जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि पुणे महानगरपालिका आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पाच महिन्यांपूर्वी डॉ. भगवान पवार यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारला होता. … Read more

ज्येष्ठाची 33 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक; बॅंक मॅनेजरसह आईविरोधात दोषारोपपत्र दाखल

पुणे – कोंढवा येथील फ्लॅट खरेदी, भोरमधील जमिनीचे हक्कसोड पत्र रद्द करणे, पत्नीची वडिलोपार्जित जागा मिळविण्याचे कारणे सांगून करून ज्येष्ठ नागरिकाची 33 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात खडक पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. फसवणूक, संगणमत आणि 406 च्या कलम लावण्यात आलेले आहेत. बॅंक मॅनेजर ज्ञानेश्‍वर भुजबळ, त्याची आई प्रमिला आणि मयत वडिल बापू भिकाजी … Read more