सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा तांडव ; भूस्खलन, पुरामुळे अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत  झाले आहे. सिक्कीममध्ये भूस्खलन झाल्यामुळे काही ठिकाणचे रस्ते बंद झाल्यामुळे बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. अडकलेल्या तीन हजारहून अधिक पर्यटकांची सुटका केली आहे. या पर्यटकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागातील रस्ते बंद … Read more

नागपूरमध्ये अ‍ॅग्रो कंपनीच्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; जवळपास 30 कामगार अडकल्याची भीती

नागपूर : नागपूरमध्ये अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील हिंगणा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामागरांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तर कंपनीमध्ये जवळपास 30 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती … Read more

रशियाकडून मारिओपोल स्टील प्लांटवर जोरदार हल्ला; सैनिकांसह शेकडो नागरिक अडकले

कीव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. तर या युद्धाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. याच दरम्यान, रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. काल रशियाच्या सैन्याने मारियूपोलमध्ये असणाऱ्या स्टील प्लांटवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हे ठिकाण प्रतिकार करण्याचे शेवटचे ठिकाण मानले जाते, याविषयीची माहिती युक्रेनच्या … Read more

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराची अग्निशमन दलाकडून सुटका

पुणे  :  कल्याणीनगर येथील  सुग्रा टेरेस येथे इमारत नूतनीकरणाचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एक मजूर अडकला होता. इतर मजूरांनी दोन तास प्रयत्न करुन ही मजूराची सुटका झाली नाही. त्यामुळे अखेर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.  त्यानंतर येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक गणेश पराते, जवान वसंत कड, सुनिल खराबी, रतन राऊत यांनी घटनास्थळी येत … Read more

हिमाचलमध्ये बसवर दरड कोसळली; पाच जणांचा मृत्यू, 30 प्रवासी अद्याप दरडीखाली

किन्नौर – हिमाचल प्रदेशात किन्नौर जिल्ह्यात हिमाचल राज्य परिवहन मंडळाच्या बसवर दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत ढिगाऱ्या खालून 12 जणांना बाहेर काढण्यात आले. अद्याप त्या ढिगाऱ्याखाली आणखी 30 जण अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. वेगाने मदत कार्य सुरू करण्यात आले असून मोठी जीवीतहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पंतप्र्रधान नरेंद्र मोदी … Read more

रत्नागिरी: खेड तालुक्यात घरांवर दरड कोसळल्याने १७ जण अडकले; बचावकार्य सुरु

रत्नागिरी: कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने सात कुटुंबातील १७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या माहितीनुसार धामणंद बौद्धवाडी येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये … Read more

इंडोनेशियात 6.2 तीव्रतेचा भूकंप; 30 जणांचा मृत्यू, 700 जखमी

जकार्ता : इंडोनेशियाला आज सकाळी भूकंपाचे मोठे धक्के बसले असल्याची माहिती समोर येत आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती. या भूकंपामध्ये एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 30 जणांचा … Read more

मुंबई : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; १० जणांचा मृत्यू

भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृ्त्यू झाला असून अकरा जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील टीडीआरएफ (TDRF) तसेच एनडीआरएफ (NDRF) चे जवान मदत कार्यात गुंतले आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. #UPDATE Maharashtra: Death toll rises to 10 in the building collapse incident in … Read more

अखेर ‘तो’ बिबटया गजाआड…..

सविंदणे (प्रतिनिधी) : सविंदणे (ता. शिरूर) येथे दोन दिवसापूर्वी एका बिबट्याने आई गोट फार्ममधील सानेन जातीच्या दहा बोकडांवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते व नऊ बोकडांना गंभीर जखमी केले होते. वन विभागाने याची तात्काळ दखल घेत सदर ठिकाणी पिंजरा लावला होता. पुन्हा एकदा बिबटया हल्ला करण्यासाठी आला असता अलगद पिंजऱ्यामध्ये अडकला. शुक्रवारी रात्री संरक्षक … Read more

समुद्र टापूवर अडकून पडलेल्या खलाशांची सुटका करण्याची मागणी

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होत असल्यामुळे देश पूर्णपणे लॉक डाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनचा फटका सर्व स्तराबरोबर कोळी आणि खलाशांना बसलेला आहे. मुंबईतील मड आणि भाटी या परिसरातील समुद्र टापुंवर साडेतीन हजारांपेक्षा जास्त खलाशी अडकून पडलेले आहेत. भारतातील विविध राज्यांसह मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली होते. यावेळी देशाचे … Read more