शमिता शेट्टी झाली गंभीर आजाराची शिकार

Bollywood News । बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मात्र, नुकताच शमिताने इंस्टाग्राम हँडलवर असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते चिंताग्रस्त झाले आहे. व्हिडिओमध्ये शमिता हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. यासोबतच तिने सर्व महिलांना एका गंभीर आजाराचा इशाराही दिला आहे.  शमिता शेट्टी सांगते की तिला एंडोमेट्रिओसिस … Read more

अहमदनगर – दुसऱ्या दिवशीही शहरटाकळी बंद

शेवगाव – तालुक्यातील शहरटाकळीच्या यात्रेत अक्षय संजय आपशेटे या युवकावर गावातीलच ७ – ८ जणांच्या टोळक्याने गुरुवारी रात्री सशस्र हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री साडेअकराला मृत्यू झाला. यासंदर्भात त्याचा भाऊ संकेत आपशेटे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीस तात्काळ अटक केली असली तरी ग्रामस्थांचे मात्र यावर समाधान झाले नाही. … Read more

पुणे जिल्हा : बिबट्याने हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवार दि.५ रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली मंगेश रामदास गुंजाळ (वय २६ वर्ष रा. कांदळी, ता.जुन्नर) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती कांदळी येथील … Read more

पुणे : कमी वजनाच्या ३,७४२ नवजात बालकांवर उपचार

विशेष नवजात काळजी कक्षा’द्वारे यशस्वी कार्य पुणे – राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा, उपजिल्हा आणि महिला रूग्णालयांमध्ये आजारी नवजात आणि कमी वजनाच्या नवजात बालकांचे व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी ‘विशेष नवजात काळजी कक्ष’ची स्थापना करण्यात आलेली असून, गेल्या दोन वर्षात या विशेष कक्षामध्ये अत्यंत कमी वजन (१५०० ग्राम पेक्षा कमी) असलेल्या तीन हजार ७४२ नवजात बालकांवर … Read more

सातारा : पोगरवाडीमध्ये 25 गाई, म्हशींवर उपचार

वंध्यत्व निवारण शिबिरास प्रतिसाद; दोन गाईंवर कृत्रिम रेतन सातारा – राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानांतर्गत पोगरवाडी (ता. सातारा) येथे वंध्यत्व निवारण शिबिरात 25 गाई, म्हशींवर उपचार करण्यात आले. दोन गाईंवर कृत्रिम रेतन करण्यात आले. या शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक परळी यांच्या संयुक्त … Read more

‘न्यूमोनिया’वर तत्काळ निदान आणि उपचार हाच रामबाण; डाॅ. डी. बी. कदम यांचा सल्ला

पुणे – ‘न्यूमोनिया’ झाला असे म्हणताच, आता रूग्ण बरा होईल ना? असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, न्यूमोनिया कसा झाला, त्या रुग्णाच्या शरिरामध्ये संसर्ग कसा पसरला यावर त्या रुग्णांच्या आजाराची गंभीरता समजते. कम्युनिटी अॅक्वार्डमधून न्यूमोनिया झाला तर तो लवकर बरा होतो. मात्र, रुग्णालयात उपचार घेताना न्यूमोनिया झाला तर त्यांची गंभीरता अधिक असते. त्यामुळे ‘तत्काळ निदान आणि … Read more

Ahmednagar – जलशुद्धीकरण प्रकल्प धूळ खात पडून!

सोनई – भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथील पाणी योजनेचे जलशुद्धीकरण प्रकल्प गेल्या सात ते आठ वर्षांपासून धूळ खात पडल्याने या प्रकल्पाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रकल्प बंद पडल्याने नागरिकांसह भाविक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. हा प्रकल्प त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांसह भाविकांनी केली आहे. शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीतर्फे सन 2015मध्ये येथे पाणी योजनेद्वारे मंदिराच्या आवारात जलकुंभालगत जलशुद्धीकरण … Read more

Tobacco – तंबाखू अन् सिगारेटपासून मिळणाऱ्या करापेक्षा सरकार उपचारांवर करतेय जास्त खर्च

Tobacco – आपण कुठेही असो, आपल्या गावात किंवा देशातील कोणत्याही शहरात किंवा महानगरात, रस्त्यांवर आणि गल्लीत  सार्वजनिक रित्या  थुंकून लाल पिचकाऱ्या मारलेल्या अनेकदा दिसतात. मात्र थुंकणे हे कोणत्याही साथीच्या आजाराचे उगमस्थान. सरकारकडून या संबंधित अनेकदा फलक लावलेले बघायला मिळतात. स्वच्छता राखण्यासोबतच थुंकणे टाळावे, असे आवाहन करत सरकार रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि स्वच्छतागृहे तसेच मोठ्या कार्यालयांच्या … Read more

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी केला निर्धार, उद्यापासून…

जालना  – मनोज जरांगे यांनी आजपासून सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण स्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी शिवरायांचे वंशज म्हणून मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेत पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याच सांगितले. आज … Read more

आईचा अट्टाहास बेतला चिमुरडीच्या जीवावर ; ८ वर्षाच्या लेकीला झाला रेबीज, डॉक्टरांनी औषधं सांगूनही आईने ऐकलं नाही अन्.

Dog Bite : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्यात  मोठी वाढ झाली आहे. त्यातच अलीकडेच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने आठ वर्षांच्या मुलीचा दोन आठवड्यांनी मृत्यू झाला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. मृत चिमुकलीच्या आईने उपचारासाठी रेबीज प्रतिबंधक लसीऐवजी घरगुती उपचार वापरले असल्याने हा मृत्यू ओढवला असल्याची माहिती समोर आली आहे. सामुदायिक … Read more