पुणे | आरोग्य निरीक्षक, मुकादमाविरुद्ध गुन्हा

  पुणे {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षक, तसेच मुकादमाने सफाई कर्मचारी महिलेचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत आराेग्य निरीक्षकासह मुकादमाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोग्य निरीक्षक दिनेश सोनावणे (४०), मुकादम रोहिदास फुंदे (५०, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एका … Read more

जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार; दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड  : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादम जखमी झाला असून याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्ट नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की घटनेतील फीर्यादी आबेद … Read more

#MumbaiMetro3 : मुंबई मेट्रो-3 च्या पहिल्या भूमिगत ट्रेनची यशस्वी चाचणी; जाणून घ्या….काय आहेत वैशिष्टये?

मुंबई :-मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प … Read more

स्यू की यांच्यावरील खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

बॅंकॉक – म्यानमारच्या पदच्युत राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांच्यावरील डझनभर खटल्यांपैकी भ्रष्टाचाराच्या पहिल्या खटल्यातील निकाल सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. या प्रकरणाचा निकाल बुधवारपर्यंत पुढे ढकलला गेला आहे. मात्र ही सुनावणी पुढे ढकलली जाण्याचे कोणतेही कारण न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही, असे विधी विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. स्यू की यांच्या खटल्याची … Read more

पुणे : सिंहगड ई-बस ‘ट्रायल’च्या फेऱ्यात

पुणे –सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकानंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गडावर खासगी वाहनांना बंदी करत, पायथ्यापासून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही ई-बस सेवा उपलब्ध करणे नियोजित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश … Read more

लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात; १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु

नवी दिल्ली : करोनाची लस निर्माण करणाऱ्या फायझर कंपनीने गुरुवारपासून ११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु केल्याची माहिती दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचे मानले जात आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार फायझरने सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचे स्पष्ट केले आहे. “आमची सहकारी कंपनी असणाऱ्या … Read more

चिंताजनक ! पेरूमध्ये चीनच्या कोरोना लसीची चाचणी थांबवली

न्यूयॉर्क : जगात सध्या करोनाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींची चाचणी घेण्यात येत आहे. दरम्यान, दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशामध्ये चीनच्या सिनोफार्म कोविड १ लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे. एका गंभीर घटनेनंतर चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या या लसीची चाचणी थांबवण्याचा निर्णय देशातील आरोग्य मंत्रालयाने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. पेरु सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी … Read more

गुडन्यूज : भारतातील ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

नवी दिल्ली – करोनाचा कहर जगभर सुरु असताना काही आनंदाच्या बातम्या देखील समोर येत आहे. जगभरातील औषध कंपन्या करोना विरोधात लस शोधत आहेत. यातील काही कंपन्या यशाच्या जवळ आहेत. भारतातील ‘भारत बायोटेक’ या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ ही लस तयार केली आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. भारताचे सिरम इन्स्टिट्यूट, झायड्स … Read more

ऑक्सफर्डच्या मानवी लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

न्यूयॉर्क : ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचणीदरम्यान ब्राझीलमध्ये एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने सांगितले आहे. स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असला तरी, लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. … Read more

अखेर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या ट्रायलवरील बंदीची शिफारस मागे

नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. या औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी होतो. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस जागतिक … Read more