टीएमसीच्या दोन गटात हाणामारी; दगडफेकीत एकाचा मृत्यू

कोलकता – पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील बागुआती भागात तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. अर्जुनपूर पश्चिमपारा येथे शनिवारी रात्री हाणामारी झाली. या हाणामारीनंतर दगडफेकही झाली. या दगडफेकीत एक जण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संजीव दास उर्फ ​​पोतला असे मृताचे नाव आहे. … Read more

“खूप उशीर झाला…”; पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला सुट्टी जाहीर होताच भाजपचे प्रत्युत्तर

Mamata Banerjee|

Mamata Banerjee| येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याशिवाय विविध घोषणा देखील केल्या जात आहे. यातच आता पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या काळात हिंसाचाराच्या … Read more

राज्यसभेसाठी तृणमूलच्या उमेदवारांची घोषणा ; ममता बॅनर्जींनी सांगितली ‘ही’ चार नावं

TMC ON Rajya Sabha।

TMC ON Rajya Sabha। तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवर चार उमेदवार पाठवणार असल्याची माहिती दिलीय. तृणमूल काँग्रेसकडून सुष्मिता देव यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. याशिवाय पत्रकार सागरिका घोष, ममता बाला ठाकूर आणि खासदार नदीमुल हक यांची नावे यादीत आहेत. याविषयीची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. … Read more

Loksabha Election 2024: तृणमुल कॉंग्रेस बरोबर जागावाटपाची चर्चा सुरू – राहुल गांधी

बहरमपूर (पश्चिम) – लोकसभा निवडणुकीत तृणमुल कॉंग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने इंडिया आघाडीला पश्‍चिम बंगालमध्ये मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात होते. तथापी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमुल कॉंग्रेस सोबत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर चर्चा करत असल्याची माहिती दिली आहे. या चर्चेतून जागा वाटपाचा तिढा लवकरच संपुष्टात … Read more

तृणमूलने घेतली अजब-गजब भूमिका; देश पातळीवर इंडियाचाच घटक असल्याची ग्वाही

कोलकता – देश पातळीवर इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीचाच घटक असल्याची ग्वाही शनिवारी तृणमूल कॉंग्रेसने दिली. पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूलची ती भूमिका अजब-गजब स्वरूपाची ठरली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नुकतीच त्या राज्यात स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. ती घडामोड इंडियासाठी जोर का झटका ठरली. त्या आघाडीपासून तृणमूलने फारकत घेतल्याचे … Read more

राहुल गांधींच्या यात्रेतील सहभागाबाबत अद्याप तृणमुलचा निर्णय नाही

कोलकाता  – राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या २५ जानेवारी रोजी पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश करीत आहे. मात्र या यात्रेत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय अजून तृणमूल काँग्रेसने घेतलेला नाही. ही यात्रा, सध्या आसाममध्ये असून, कूचबिहार जिल्ह्यातील बक्षीरहाट मार्गे २५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे, २७ जानेवारीला बिहारमध्ये पोहोचण्यापूर्वी ही यात्रा … Read more

बंगालमध्ये कॉंग्रेस-तृणमूलचे सूत जुळणे निश्‍चित

नवी दिल्ली – सगळे भाजपविरोधक इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत. मात्र प्रत्येक राज्यात या आघाडीचे नेमके स्वरूप कसे असेल याचा अद्याप आकार ठरलेला नाही. मात्र आजची परिस्थिती पाहता प. बंगालमध्ये कॉंग्रेेस- तृणमूल कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र येण्यापेक्षा दोन्ही कॉंग्रेस एकत्र येण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे. किंबहुना कॉंग्रेसला अन्य राज्यांचा व विशेषत: केरळचा विचार करता … Read more

तृणमूल कॉंग्रेसला ‘खाप’ पंचायतीची नोटीस; माफी मागण्याचा अल्टीमेटम

नवी दिल्ली – उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची कथित प्रतिकात्मक संसदेत मिमिक्री करून हेटाळणी करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे पालम ३६० चे प्रमुख सुरेंद्र चौधरी यांनी तृणमूल कॉंग्रेसला इशारा दिला आहे. या पक्षाच्या खासदारांनी आजच माफी मागावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. जर तृणमूलच्या खासदारांनी माफी मागितली … Read more

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या प्रकरणाची सुनावणी 3 जानेवारीला

नवी दिल्ली  – सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून करण्यात आलेल्या हकालपट्टीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढील वर्षी 3 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. महुआंना अपात्र ठरवण्याची शिफारस संसदेच्या आचार समितीने केली आहे, पण ही शिफारस करताना त्यांनी योग्य प्रक्रियेचाअवलंब केला नाही व मनमानी पद्धतीने निर्णय दिला असा त्यांचा आक्षेप आहे. … Read more

तृणमूल कॉंग्रेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणींत भर

नवी दिल्ली – खासदारकी धोक्यात असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणींत भर पडली आहे. आता त्या सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. संसदेत प्रश्‍न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून महुआ राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या प्रकरणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकपालांकडे तक्रार दाखल केली. आता लोकपालांच्या शिफारसीवरून सीबीआयने महुआ यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी … Read more