तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; भीषण अपघातात चौघे ठार

नांदेड – तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी चाललेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात घडली. वाहन चालकाचे कारवली नियंत्रण सुटल्याने कारची ऊसाच्या ट्राॅलीला पाठिमागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. ( car accident) मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई,कृष्णा मंडके, नर्मन कात्रे (सर्व रा. नांदेड) अशी … Read more

तुळजाभवानीचा चांदीचा मुकुटही गायब ! महंत चिलोजीबुवा फरार.. पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गायब झाला असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानच्या वतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. २०११ सालापूर्वी चांदीचा मुकुट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे … Read more

पुणे जिल्हा : मुळशीची शक्‍तिदायिनी आई तुळजाभवानी

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मुळशी तालुक्‍यात औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिरंगुट गावच्या टेकडीवरील शिवकालीन तुळजाभवानी माता मंदिर हे वैभव बनले आहे. तमाम मुळशीकराचे श्रद्धास्थान असलेल्या भवानी माता मंदिरात नवरात्र उत्सवाची रेलचेल सुरू आहे. शिवकाळात गनिमांविरोधात लढताना भवानी मातेच्या परिसरात युद्ध झाल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. शिवरायांचे एकनिष्ठ सरदार बाजी पासलकर यांनी पिरंगुटच्या माळरानावरून पळवून लावले होते. … Read more

Tuljabhavani temple : ‘या’ दिवसापासून तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार खुले; मंदिर संस्थानचा निर्णय

तुळजापूर – येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani temple) 13 ऑक्‍टोबरपासून दररोज 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. 13 व 14 ऑक्‍टोबर रोजी भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी अगदी परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ही वेळ वाढवण्यात आली आहे. 15 ऑक्‍टोबर रोजी घटस्थापना होऊन तुळजाभवनीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार … Read more

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना 25 हजार साड्यांची मदत

तुळजापूर – तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या 25 हजार साड्यांची मदत पूरग्रस्त भागामधील महिलांना पाठवण्यात येणार आहे. पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या 25 हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत … Read more

तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा उस्मानाबाद,दि.30: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज पहिली माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री … Read more

आई राजा उदो…उदो च्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना..

श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे रविवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, … Read more