जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार; दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड  : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादम जखमी झाला असून याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्ट नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की घटनेतील फीर्यादी आबेद … Read more

पुणे : अवयवदानातून तीन रुग्णांना जीवदान, दोघांना मिळणार दृष्टी

भारती हाॅस्पिटलमधील डाॅक्‍टरांच्या प्रयत्नांना यश पुणे – ब्रेन डेड झालेल्‍या ५७ वर्षीय व्‍यक्‍तीने केलेल्‍या अवयवदानातून तीन जणांचे प्राण वाचले आणि दोघांना दृष्टी मिळणार आहे. एकीकडे देश प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना दुसरीकडे भारती हाॅस्पिटलमधील डाॅक्‍टर अवयवदानातून तीन जणांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्‍नात होते. अखेर, त्‍यात त्‍यांना यश आले आहे. भारती हाॅस्पिटलमध्ये ५७ वर्षीय रुग्ण मेंदूत … Read more

खासदार कोल्हेंचा दौरा अन्‌ दोघांना पोलीस ठाण्यात डांबले

आढळराव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर चार तासांनी सुटका पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून निषेध व्यक्‍त मंचर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्‍यात आदिवासी भागातील विविध प्रश्‍न यासंदर्भात केलेली पोस्ट व त्या संदर्भात कोल्हे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या दोन आदिवासी बांधवांना घोडेगाव पोलिसांनी ताब्यात घेत चार तास पोलीस ठाण्यात ठेवल्याची घटना … Read more

बदल मोकळा | श्‍वास

– रियाज इनामदार सौदी अरेबियात महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना तुरुंगातून मुक्‍त करण्यात आले आहे. महिलांसाठी कडक धोरण असणारा देश म्हणून असलेल्या प्रतिमेतून सौदी बाहेर पडू इच्छित आहे. गेल्या काही वर्षांत सौदी अरेबियामध्ये मोठ्या वेगाने बदल घडून आले असून, अजूनही बदल घडत आहेत. तेथून दररोज चकित करणाऱ्या बातम्या ऐकायला मिळू लागल्या आहेत आणि त्या सर्व … Read more

पुणे: लष्कर अधिकाऱ्याच्या मुलीला धमकाविल्याप्रकरणात महिलेसह दोघांना जामीन

पुणे : भाड्याने घर मिळवून दिल्यानंतर ब्रोकरेज न दिल्याच्या कारणावरून पुण्यात नोकरीनिमित्त आलेल्या लष्कर अधिकाऱ्याच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणात महिला एजंट आणि तिच्या साथीदाराला जामीन झाला आहे. लष्कर न्यायालयाने हा जामीन दिला आहे. याबाबत 34 वर्षीय तरूणीने कोंढव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महिलेसह दीपक शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्या … Read more

अमिरातीच्या दोन क्रिकेटपटूंवर 8 वर्षाची बंदी

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्‍सिंग केल्या प्रकरणी आयसीसीने संयुक्‍त अरब अमिरातीच्या महंमद नावेद व शैमान अन्वर या दोघांवर 8 वर्षाची बंदी घातली आहे.  या दोघांवर मॅच फिक्‍सिंग केल्याचा आरोप झाला होता. दोघांनाही जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. नावेद केवळ सलामीवीर फलंदाज नव्हे तर अमिरातीकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे. त्याने संघाचे नेतृत्वही केले … Read more

#AUSvIND : दोन कसोटी सामने सिडनीतच होणार

सिडनी – न्यू साऊथ वेल्समधून येणाऱ्या दोन्ही संघांना क्विन्सलॅंड प्रशासनाने प्रवासाची परवानगी नाकारल्यास ब्रिस्बेनचा चौथा सामनाही सिडनीला खेळवावा लागेल. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील नव्या वर्षांतील उर्वरित दोन्ही सामने सिडनीत खेळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सिडनीच्या काही भागांमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला या कसोटी सामन्यांचे आयोजन सिडनीतच करावे लागण्याची चिन्हे आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात … Read more

इनसाईड कांगारू लॅंडस्‌… : ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी विजय

– श्रीनिवास वारुंजीकर भारताने वर्ष 1977-78 च्या दौऱ्यात कांगारुंच्या भूमीत एकाच मालिकेत दोन कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. ब्रिस्बेन – 2 ते 6 डिसेंबर 1977  मालिकेतला पहिलाच सामना चुरशीचा झाला. बिशनसिंग बेदीच्या 55 धावातल्या 5 आणि चंद्रशेखर व मोहिंदर अमरनाथच्या प्रत्येकी 2 विकेट्‌सपुढे ऑस्ट्रेलियन संघाला फक्त 166 धावा करता आल्या. त्यात पिटर टुहीच्या 82 धावा होत्या. … Read more

अफगाणिस्तान: काला-ए-नाव शहरात बॉम्बस्फोट

काबूल – अफगाणिस्तानातील काला-ए-नाव शहरात रविवारी एका दुकानात झालेल्या बॉम्ब स्फोटात दोन जण ठार तर दोन जखमी झाले. हे शहर बदघीस प्रांताच्या मध्यभागी आहे. प्रांतीय कार्यवाहक पोलीस प्रमुख शिर अका आलोकोझई यांनी या स्फोटाबद्दल टोला न्यूज या स्थानिक  वृत्त वाहिनीला माहिती दिली आहे. Two civilians killed & two others wounded in a bomb blast at … Read more

मारटकर खून प्रकरणी आणखी दोघांना अटक

पुणे – शिवसेनेचे पदाधिकारी दीपक विजय मारटकर (36) यांच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. या आरोपींना अहमदनगर येथील काष्टी येथून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणातील अटक गुन्हेगारांची संख्या नऊ झाली आहे. संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते(23,रा.लोहीयानगर) व लखन मनोहर ढावरे(30,रा.सहकार चौक, कुंभारघाट) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दिपक मारटकर यांचा खून महेंद्र … Read more