“कोकणी’ गोव्याची राजभाषा करणे मराठीवर अन्यायकारक : कौतिकराव ठाले पाटील

उदगीर – आमच्या राजकारण्यांनी मराठी भाषेचा बळी देऊन ‘कोकणी’ ही गोव्याची राजभाषा केली. मराठी भाषेला टाळून कोकणी भाषेला हे स्थान देण्यात आले हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. मराठी भाषेला दुसरी भाषा म्हणून दर्जा द्यावा, अशी मागणी गोवा सरकारकडे करणार असल्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी गेल्या अनेक … Read more

मराठी-कन्नड-तेलुगू आणि उर्दू भाषांचे गोत्र एकच – परिसंवादातील सूर

उदगीर – मराठी-कन्नड-तेलुगू आणि उर्दू या सर्व भाषा वरकरणी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी या सर्व भारतीय भाषाच असून त्यांचे भाषिक आणि सांस्कृतिक गोत्र एकच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका परिसंवादामध्ये मांडण्यात आले. लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात हुतात्मा भाई श्‍यामलालजी व्यासपीठ येथे आयोजित ‘मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू यांचा भाषिक व सांस्कतिक … Read more

जाणकार समीक्षकांनी माझ्या लेखनाची समीक्षा केली नाही : वीणा गवाणकर

उदगीर – जाणकार समीक्षकांनी माझ्या लेखनाची समीक्षा केली नाही याची खंत आहे; पण वाचकांनी मात्र सदैव साथ दिली, याचा आनंद-समाधान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी केले. 40 वर्षांचा लेखन प्रवास गवाणकर यांनी मनोगतात मांडला. त्या म्हणाल्या, लेखन प्रवासातून अनेक माणसे जोडता आली. मला कथा, कांदबरी लेखन नाही करता आले पण चरित्र लेखन … Read more

बालकुमार नटले साहित्यिकांच्या वेशभूषेत ; बालकुमार मेळ्याचे अनोख्या पद्धतीने झाले उद्घाटन

उदगीर – लक्ष्मीबाई टिळक, शांताबाई शेळके यांच्या पासून सिंधूताई सपकाळ तसेच बालकवी यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्या वेशभूषेत नटलेली बालके आपापसात साहित्यिक चर्चा करत होती. निमित्त होते ते 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याचे! बालसाहित्यिक आणि असंख्य बालकांच्या किलबिलाटात प्रसिद्ध लेखिका तथा अनुवादिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेत दीपप्रज्वलनाने या बालमेळाव्याचे उद्घाटन नथमलशेठ … Read more

खळबळजनक; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेवर दोन वर्षापासून जबरदस्ती बलात्कार!

लातुर – राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून दोन वर्षापासून महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातुर जिल्ह्यातील उदगीर मध्ये हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पदाधिकाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचा हा पदाधिकारी मुळचा जळकोट तालुक्यातील गुत्ती येथील असून हल्ली उदगीर मध्ये वास्तव्साय आहे. या … Read more

एसटीमध्येच बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर हादरले!

उदगीर – संगमनेरमध्ये मध्ये बस चालकाच्या आत्महत्येची घटना ताजी असताना लातूर जिल्ह्यातील उदगीर आगारामध्ये बस चालकाने आत्महत्या केली आहे. या एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बस चालकाच्या आत्महत्येच्या पुनरावृत्ते परिवहन विभाग पुन्हा हादरले आहे. संजय रामराव केसगिरे, वय ४७ असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले … Read more

विजेची तार अंगावर पडल्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

उदगीर – वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजेची तार तुटून अंगावर पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उदगीर तालुक्यातील बामणी शिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. नारायण यादवराव कोडमंगले (50), मुलगा सिद्धरामेश्वर नारायण कोडमंगले (16, रा. बामणी, ता. उदगीर) हे दोघे दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन शेतातून घराकडे जात होते. अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस … Read more

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी ; रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी लागू

लातूर : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यामुळे इथे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, आता लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासून ते पुढील आदेश येईपर्यंत रात्री 11 … Read more