Ultimate Kho Kho Season 2 : गुजरात ठरला जायंट्स; अंतिम सामन्यात ‘चेन्नई क्विक गन्स’वर धमाकेदार विजय

भुवनेश्वर – अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ चा अंतिम महामुकाबल्यात गुजरात चेन्नई क्विक गन्सचा ३१-२६ असा ५ गुणांनी दणदणीत पराभव करून खऱ्या अर्थाने जायंट्स ठरली. गुजरातच्या विजयानंतर कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा केला. विजेत्या गुजरात जायंट्सला रु. एक करोड व चषक, उपविजेत्या चेन्नई क्विक गन्सला रु. पन्नास लाख व चषक तर … Read more

Ultimate Kho Kho 2022 : मुंबई खिलाडीजला जॉन्टी ऱ्होड्‌सने दिले डायव्हिंगचे धडे

पुणे – विश्‍वकरंडक 1992 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध जॉन्टी ऱ्होड्‌सने हवेत झेप घेत केलेला अफलातून धावबाद क्रिकेट शौकिनांच्या कायमच स्मरणात राहील. क्रिकेटमधील सार्वकालिक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी कीर्ती मिळवणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्‌सने अल्टीमेट खो खो लीग स्पर्धेतील पुनीत बालन, जान्हवी धारिवाल-बालन व बादशहा यांच्या मालकीच्या मुंबई खिलाडीज संघाच्या खेळाडूंना डायव्हिंगचे धडे दिले. सध्याच्या सुरू असलेल्या अल्टीमेट खो … Read more

Ultimate Kho-Kho League : ‘खो-खो’ खेळाला आंतरराष्ट्रीय ओळख देणार

पुणे  – भारतात क्रिकेट वगळता इतर खेळाडूंना म्हणावे तसे महत्त्व मिळाले नाही. खो-खोबद्दल बोलायचे झाल्यास हा आपल्या मातीतला खेळ आहे. अनेकांनी देशात खो-खो हा खेळ संपला असल्याचे म्हटले. मात्र, लीगच्या माध्यमातून आम्ही या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या उंचीवर नेण्याकरता खेळाडूंना योग्य संधी आणि पाठिंबा देणार आहोत. ही लीग येणाऱ्या काळात अनेकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे … Read more

अल्टिमेट खो-खो लीग : प्रदर्शनीय सामन्यात अफलातून कौशल्याचे प्रदर्शन

पुणे – अल्टिमेट खो खो लीगच्या पार्श्‍वभूमीवर श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथील संकुलात आज खेळल्या गेलेल्या प्रदर्शनीय लढतीत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उपस्थित फ्रॅंचाइजींना पारंपरिक खो खो खेळात झालेले बदल आणि कौशल्याचे अफलातून दर्शन घडवले. खो-खो चा हा नवा अवतार सादर करण्यासाठी आज विविध संघांमधील 60 खेळाडू मैदानात उतरले आणि त्यांनी खेळातील विविध कौशल्यांचे चित्तथरारक दर्शन … Read more

Kho-Kho | अल्टिमेट खो-खो लीग सप्टेंबरमध्ये

मुंबई – भारतात प्रथमच बहुचर्चित अल्टिमेट खो-खो लीग येत्या सप्टेंबर महिन्यात होणार आहे, असा निर्वाळा भारतीय खो-खो महासंघाने दिला आहे. स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच मोबाइलवरही सामने पाहता येणार आहेत. भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) झालेल्या बैठकीत लीगबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दोन वर्षांपासून अल्टिमेट लीगची घोषणा होत होती मात्र, … Read more