अमेरिकेने मोदींकडे सुपूर्द केल्या दीडशेपेक्षा अधिक पुरातन वस्तू

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे अमेरिकेने  दीडशेपेक्षा अधिक पुरातन वस्तू परत केल्या आहेत. यामध्ये157 दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू भारतातीलच आहेत. परंतु, त्या तस्करी करण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तू धातू, दगड, माती आणि सिरॅमिकपासून बनवलेल्या आहेत. 157 artefacts & antiquities were handed over by … Read more

अमेरिकेवर पुन्हा भयावह हल्ल्याची शक्‍यता ; चीनमधील सरकारी ग्लोबल टाईम्सच्या संपादकांचा इशारा

नवी दिल्ली – अमेरिकेतील ट्विन टॉवरवर 11 सप्टेंबरला झालेल्या भयावह हल्ल्याच्या 20 व्या स्मृतिदिनी अमेरिकेवर असा भयावह हल्ला पुन्हा होऊ शकतो, असा इशारा चीनच्या सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्स या दैनिकाच्या संपादकांनी दिला आहे.11 सप्टेंबरचा आत्मघाती हल्ला हा 19 दहशतवाद्यांनी घडवला होता. पण तो दहशतवाद्यांसाठी आत्मघाती नव्हता. पुढील दहशतवादी हल्ला करण्यासाठी दहशतवादी ताकद गोळा करत आहेत. … Read more

मनीष माहेश्वरी यांची अमेरिकेत बदली

नवी दिल्ली – ट्‌विटरचे भारतातील प्रमुख मनीष माहेश्‍वरी यांची भारतातून अमेरिकेत बदली करण्यात आली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्‌विटरने माहेश्‍वरी यांना पुन्हा बोलविले असून त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये कथित द्वेषपूर्ण व्हिडिओ संबंधी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कंपनीने बदली करण्याचे कोणतेही स्पष्ट कारण न देता सांगितले … Read more

‘या’ कारणामुळे अमेरिकेत आज एकाला मृत्यूदंडाची शिक्षा

तेरे हाऊते – अमेरिकेत आज आणखी एकाला मृत्यदंडाची शिक्षा देण्यात आली. डस्टीन हिग्ज असे आज मृत्यूदंड देण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने मेरीलॅंडमध्ये तीन महिलांची हत्या केली होती. या आठवड्यात अमेरिकेत देण्यात आलेला ही तिसरी मृत्यूदंडाची शिक्षा आहे. गेल्या जुलै पासून आत्तापर्यंत ट्रम्प प्रशासनाकडून एकूण तेरा जणांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अमेरिकेत मृत्यूदंडाच्या … Read more

अमेरिकेकडून मध्यपूर्वेत आणखी कुमक तैनात

वॉशिंग्टन – इराणकडून वाढता धोका लक्षात घेऊन मध्यपूर्वेमध्ये आणखी लष्करी कुमक तैनात करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. मध्यपूर्वेतील आंतरराष्ट्रीय शांतता कायम राखण्यासाठी 1,500 सैनिक तैनात करण्यात येणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर इराणकडून जोरदार टीका झाली आहे. अमेरिकेचे हे पाऊल म्हणजे अंतरराष्ट्रीय शांततेला धोका असून त्याला विरोध करणे गरजेचे बनल्याचे इराणचे विदेश मंत्री … Read more