‘न’ तोडलेल्या नियमांचा पुणेकरांना नाहक त्रास

वाहतूक पोलिसांच्या कारभाराला वाहनचालक वैतागले हर्षद कटारिया पुणे/बिबवेवाडी  – वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांच्या वाहनांचा नंबर सिग्नलवरील कॅमेरांद्वारे टिपला जातो. संबंधित वाहनचालकाच्या मोबाइल नंबरवर ऑनलाइन दंड पाठवला जातो. पण, हे प्रमाण वाढले असून कॅमेरांतून नंबरप्लेटचा स्पष्ट फोटो न आल्यामुळे भलत्याच मोबाइलधारकांना दंडाची रक्कम पाठवली जात आहे. त्यामुळे पुण्यातील वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत.   ऑनलाइन आलेल्या दंडाची रक्कम … Read more

कंगनाच्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व – शरद पवार

मुंबई  – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने केलेल्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व दिले जात असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले. मात्र याप्रसंगी त्यांनी कंगना रणावतच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. कंगनाच्या वक्‍तव्याला जनता गांभीर्याने घेत नाही. तसेच तिला या आठवड्यात मिळालेल्या धमक्‍यांनाही आपण गांभीर्याने घेत नसल्याचे पवार म्हणाले.  मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरबरोबर केल्यामुळे … Read more

प्रशांत भूषण यांना झालेली शिक्षा अनावश्‍यक – वीरप्पा मोईली

बंगलुरू – न्यायालयाच्या बेअदबीबद्दल प्रशांत भूषण यांना कोर्टाने ठोठावलेली शिक्षा अनावश्‍यक आहे अशी प्रतिक्रिया माजी विधीमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की भूषण यांनी न्यायाधीशांवर आरोप ठेवले होते व त्या प्रकरणात न्यायाधीशांनीच निकाल देणे योग्य नव्हते, त्या ऐवजी हा विषय बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे सोपवायला हवा होता. भूषण … Read more