या राज्यात नातेवाईकांची 17 मृतदेहांकडे पाठ, 12 मृतदेहांवर रुग्णालयाकडूनच अंत्यविधी

अहमदाबाद- मुंबईत 20 पेक्षा जास्त करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक शव घेण्यास आले नाही. मुंबईनंतर आता गुजरातमधील अहमदाबादमध्ये मुंबईसारखीच घटना समोर आली आहे. येथे करोना विषाणूच्या भीतीमुळे 17 करोना बाधित मृतांचे शव घेण्यास त्यांचे नार्तवाईक रुग्णालयात गेलेच नाहीत. 17 पैकी 12 मृतदेहांचे त्यांच्या नातेवाईकांची परवानगी घेऊन त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. पाच मृतदेह अजूनही बेवारस … Read more

राज्यातील करोना उपाययोजनांची देशभरात दखल

मुंबई- करोनाच्या उपाययोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस्‌ निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली आहे. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडली आहे, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या वतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या करोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि … Read more

दिलसादायक! ‘या’ जिल्ह्यात दिवसभरात एकही बाधित रुग्ण नाही

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवार दिनांक 8 जून रोजी एकही रुग्ण आढळला नाही आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे. 7 जुनल एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.  त्यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 39 झाली होती . मात्र आज दिसभरात एकही रुग्ण न आढळल्याने जिल्ह्यात  दिलासादायक वातावरण आहे यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री … Read more

जिल्हा रुग्णालयात वृद्धेचा मृत्यू

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 8) करोनाने एका 76 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. दौंड-सिंधी गल्ली येथील ही वृद्धा आहे. त्यामुळे रुग्णालयात आत्तापर्यंत मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्या 13 पर्यंत पोहचली आहे. दरम्यान, करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज आणखी सहा करोना बाधित रुग्णांची भर पडली. नव्याने वाढलेल्या करोना बाधित रुग्णांमध्ये 4 … Read more

जिल्हा रुग्णालयात आणखी दोन करोना बाधित

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 6) आणखी दोन करोना बाधित रुग्णांची भर पडली. औंध-आंबेडकर वसाहत येथील 60 वर्षीय पुरुष आणि नाना पेठ (पुणे) येथील 72 वर्षीय महिलेचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांचा आकडा 147 पर्यंत जाऊन पोहचला आहे. रुग्णालयामध्ये आज 8 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. 36 रुग्ण … Read more

विक्रमी उच्चांक; एकाच दिवशी 8381 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी  उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात 26 हजार 997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश … Read more

पुण्यात कोरोनामुळे नाही तर ‘या’ आजारांनी ग्रस्त असलेल्यांचा मृत्यू जास्त!

पुणे- आजपर्यंत करोना बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील 90 टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब, मधुमेह, किडनी आदी आजारांनी ग्रस्त होते. घरातील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आदींची विशेष काळजी घ्यावी. बाहेरुन घरी आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्‍यक ती काळजी घ्यावी, असे कळकळीचे … Read more

नवीन ९ कोरोना रुग्ण, नांदेड जिल्ह्यात एकुण १२५ रुग्ण संख्या

नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना विषाणु संदर्भात शनिवार २३ मे रोजी सायंकाळी ६ वा. पुढीलप्रमाणे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. शनिवार २३ मे रोजी प्राप्त झालेल्या एकुण १३५ अहवालापैकी १२० निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले व नवीन ३+६ रुग्णांचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यात रुग्ण संख्या १२५ झाली आहे. प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी … Read more

चौथ्या लॉकडाऊनमध्ये शिरुरचा ऑरेंज झोनमध्ये समावेश

शिरूर- तालुक्यात कोरोनाव्हायरस संसर्ग झाला असून आजपर्यंत 16रुग्ण कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, यात सात रुग्ण बरे झाले तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत . तर तिघे जणाचा यात मृत्यू झाला आहे. यातशिरूर तालुक्यातील नऊ जण असून बाहेरून आलेले सहजनांचा समावेश असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. शिरूर तालुक्यात सात गावात … Read more

सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आणखी सात करोना बाधित

पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आज नव्याने 7 करोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णालयात आत्तापर्यंत 80 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, वडगाव झांजे (ता. वेल्हा) येथील 80 वर्षीय ज्येष्ठाला रुग्णालयातून “डिस्चार्ज’ देण्यात आला. रुग्णालयात आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील 4 रुग्ण आहेत. ताडीवाला रोड, रामनगर-येरवडा, वाघोली, वैदुवाडी-हडपसर … Read more