वॉन्टेड घोषित दहशतवाद्याचं काबुलच्या रस्त्यावर जोरदार स्वागत

काबुल : अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलेल्या एका दहशतवाद्याच तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानमध्ये खुलेआम रस्त्यावर जोरदार स्वागत होत असल्याचं समोर आलंय. खलील हक्कानी असं या दहशतवाद्याचं नाव आहे. तो अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये खुलेआम फिरताना दिसत आहे. येथे लोक त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करताना दिसत आहे. तालिबान्यांसाठी पैसा गोळा करणारा हक्कानी दहशतवादी संघटना अल-कायदाशी संबंधित आहे. … Read more

येत्या पाच वर्षातील महामारीसाठी अमेरिकेची प्रोटोटाईप वॅक्‍सिन

न्यूयॉर्क – येत्या काळातील संभाव्य महामारीसाठी आता अमेरिकेने तयारी सुरू केली आहे. लासा फिव्हर, इबोला किंवा निपाह व्हायरसपासूनच्या महामारीचा संभाव्य धोका ओळखूनच अमेरिकेने यासारख्या महामारीचा प्लॅन तयार करण्यासाठी सुरूवात केली आहे. आगामी पाच वर्षांमध्ये येणाऱ्या संभाव्य महामारीची तयारी अमेरिकेने करायला सुरूवात केली आहे. हा प्लॅन महत्त्वाकांक्षी आणि खर्चिक असा आहे. त्यासाठीअब्जावधी डॉलर्स लागणार आहेत. तसेच … Read more

अरे बापरे! करोनानंतर आता मंकीपॉक्स; ‘या’ देशात रुग्ण आढळल्यानं खळबळ

लंडन  :  देशासह जगात करोना लाट जरी ओसरत असली तरी धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. कारण करोनातुन मुक्त होणाऱ्या रुग्णांना बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत  आहे. आतापर्यंत रुग्णांना काळी,पांढरी, आणि पिवळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.  यातच करोना लढाई सुरु असतांनाच ब्रिटन येथे आणखी एक नवा विषाणू सापडला आहे. अमेरिकेत नुकताच दुर्मिळ मंकीपॉक्स … Read more

GREATEST NEWS : जगभरात करोना मृत्यू दरात घट; भारतासह करोनाचा जोर ओसरला

pune district corona updates

जीनिव्हा : संपूर्ण जगाला वेठीला धरलेल्या करोनाची रुग्णसंख्या जगभरात गेल्या आठवड्यात किंचित वाढली असली, तरी दुसरीकडे करोनामृत्यूंचा साप्ताहिक आकडा मात्र गेल्या दहा महिन्यांतील नीचांकावर गेला आहे. जगभरात आठवड्यात ५४ हजार करोना रुग्णांचा मृत्यू झाला. हा आकडा आधीच्या आठवड्यापेक्षा सात टक्क्यांनी कमी असून, ऑक्टोबरपासूनचा नीचांक ठरला आहे. जगभरात करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४० लाखांवर गेला आहे. जागतिक … Read more

फायझर आणि मॉडर्नाची लस कोरोनावर 91 टक्के प्रभावी

न्यूयॉर्क : संपूर्ण जग अजूनही कोरोनाशी लढत आहे. याच दरम्यान लसीकरणाला गती देऊन विषाणूला संपवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. अशातच कोरोना प्रतिबंधक लसींच्या परिणामकतेच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांना फाइजर आणि मॉडर्नाची लस देण्यात आली आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 91 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. अभ्यासानुसार या लसींमुळे … Read more

ऑकलँड प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना कोरोना लस

अमेरिकेत कोरोना काळात माणसे बिकट परिस्थितीचा समाना करत असतानाच अमेरिकेतील प्राणी देखील कोरोनाच्या विळख्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेने आता माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचे ठरवले आहे. माणसांप्रमाणेच आता प्राण्यांना देखील कोरोना विरोधी लस देण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सीस्को येथील ऑकलँड प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना कोरोना लस देण्यात येत आहेत. या प्राणीसंग्रहालयातील अस्वल आणि वाघांना … Read more

ओबीओआरविरोधातील जी-7 च्या भूमिकेमुळे चीन संतापला

लंडन/बीजिंग – इंग्लंडच्या कार्नवालमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या जी-७ मुळे चीन संतापला आहे. या संमेलनाकडे आपल्याविरोधातील गट म्हणून चीन पाहत आहे. म्हणून त्याने रविवारी जी-७ देशांना धमकी देत सांगितले की, काही देशांच्या लहानशा गटाने जगाच्या भविष्याचा निर्णय घेण्याचा काळ खूप आधीच गेला आहे. लंडन येथील चिनी वकिलातीच्या प्रवक्त्याने सांगितले, देशांचा लहान गट जागतिक निर्णय घेण्याचा काळ … Read more

आता १२ वर्षाखालील मुलांनाही लस; Pfizerने सुरू केली चाचणी

जीवघेण्या कोरोना विषाणूच्या लढाईत लस ही महत्त्वाची अस्त्र आहे. त्यामुळे सध्या जगभरात सर्व वयोगटातील नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांचे लसीकरण व्हावे अशी इच्छा आहे. अनेक देशांमध्ये १८ वर्षावरील वयोगटाचे लसीकरण सुरू केले आहे. यामुळे आता कोरोना लस तयार करणारी अमेरिकन कंपनी फायझर (Pfizer)ने १२ वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांवर आपल्या लसीची चाचणी करण्यास केली आहे. पहिल्या … Read more

गुगल, फेसबुक, अमेझॉनला दणका : जी -7 देशांमध्ये नफ्यावर 15 टक्के कर द्यावा लागणार

वॉशिंग्टन : बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कमी कर असलेल्या देशात कंपन्यांचं छोटं युनिट सुरू केल्याचं दाखवून होणाऱ्या कर चुकवेगिरीवर उपाय म्हणून जी 7 देशांनी अनेक वर्षांच्या चर्चेनंतर ऐतिहासिक करार केलाय. यानुसार गुगल, फेसबुक, अमेझॉन अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्यावर 15 टक्के वैश्विक कर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्या सर्वच कंपन्यांना हा मोठा झटका आहे. … Read more

नासाच्या रोव्हरनं काढले मंगळ ग्रहावरील ढगांचे दुर्मिळ फोटो

वॉशिंग्टन : संपूर्ण जगाचं लक्ष सध्या मंगळावरील संशोधनावर लागलं आहे. अमेरिकेने आपली महत्त्वकांक्षी योजना राबवत मंगळावर जीवसृष्टीसाठी पुरक वातावरण आहे का याचा शोध सुरु केलाय. याचाच भाग म्हणून नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरच्या माध्यमातून विविध प्रयोग केले जात आहेत. आता याच रोव्हरने मंगळ ग्रहावर घेतलेले काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो म्हणजे मंगळ ग्रहावरील ढगांचे फोटो … Read more