पुणे जिल्हा : सिद्धबेटातील वृक्षांसाठी सेंद्रीय खताचा वापर

पालिकेकडून संवर्धनावर भर : बनतोय सेल्फी पॉईंट आळंदी – सिद्धबेटामध्ये प्रवेशद्वाराजवळील परिसरात विविध प्रकारचे वृक्षारोपण विविध संस्था,व्यक्ती व पालिका प्रशासन मार्फत करण्यात आले आहे. तेथील वृक्षांची योग्य प्रकारे वाढ व्हावी यासाठी वृक्ष वाढीसाठी अपायकारक असलेल्या वेलीचा नायनाट करण्यात आला असून, छोटे मोठे गवत काढून तिथे स्वच्छता करण्यात आली आहे.तर या वृक्ष संवर्धनासाठी सेंद्रीय खतांचा वापर … Read more

नगर : पाप लपविण्यासाठीच खासदारांच्या नावाचा वापर!

संगमनेर – संगमनेर कारखान्याचे संस्थापकच बदलले असा गंभीर दावा करीत आपले पाप लपविण्यासाठीच खासदारांच्या नावाचा वापर केला असून, नाचता येईना अंगण वाकडे असा जोरदार पलटवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. वडगाव पान येथील कार्यक्रमात विखेंचे नाव न घेता आ. बाळासाहेब थोरात यांनी टीका केली होती. त्यांच्या “त्या’ वक्तव्यावर संगमनेरात येऊन मंत्री विखे पाटील यांनी … Read more

आता व्हॉट्सअॅपमध्येही आले शॉर्ट व्हिडिओ फीचर; ‘असा’ करा वापर

नवी दिल्ली : इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन फीचर जारी केले आहे. व्हॉट्सअॅपने शॉर्ट व्हिडीओ मेसेजचे फीचर जारी केले आहे, याचा अर्थ आता तुम्ही कोणत्याही मेसेजला व्हिडिओसह रिप्लाय देऊ शकता. आधी रिप्लायसाठी टेक्स्ट आणि ऑडिओचा पर्याय होता. हा रिअल टाईम व्हिडिओ संदेश असेल जो 60 सेकंदांचा असेल. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की हा छोटा व्हिडिओ … Read more

करिना कपूरने महिला चाहतीकडे केले दुर्लक्ष, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले,’इतका पैसा अन् प्रसिद्धीचा काय उपयोग…’

मुंबई – अभिनेत्री करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. करीनाची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. मात्र, काही वेळा फोटो काढण्याच्या वेळी असे काही घडते, ज्यामुळे स्टार्स बदनाम होतात.     View this post on Instagram   A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)   सोशल असाच एक व्हिडिओ करिनाचा व्हायरल होत आहे. … Read more

पुणे: व्यावसायिक दृष्टीकोन ठेवा, डिजिटल तंत्रज्ञान वापरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला : उत्कृष्ट नागरी बॅंकांच्या सत्कार समारंभ पुणे –  स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बॅंकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्‍वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बॅंकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर … Read more

पेनिसिलिनचा वापर झालेल्या पहिल्या रुग्णाविषयी तुम्हाला माहिती आहे का?; वाचा सविस्तर

न्यूयॉर्क : अल्बर्ट अलेक्झांडर मृत्यूपंथाला लागलेला होता. दुसरे महायुद्ध सुरू होते आणि इंग्लंडमधील ऑक्सफर्ड प्रांतातील ह्या पोलिस अधिकाऱ्याला सेप्सिसने ग्रासले होते. सेप्सिसमध्ये रक्तात आणि इतर पेशींमध्ये घुसलेल्या घातक सूक्ष्मजीवांशी लढताना शरीर थकत जाते आणि हळूहळू अवयव निकामी होऊन शेवटी माणसाला मृत्यू येतो. त्याच्या चेहऱ्यावर घाव लागल्याने जखम झाली होती आणि त्याठिकाणी संसर्ग झाला होता. आता … Read more

तुमचाही मोबाईल होतो ‘स्लो चार्ज’? मग वापर या सोप्या टिप्स !

मुंबई : मोबाईल फोन स्लो चार्ज होण्याच्या समस्येने अनेकदा आपण सगळेच त्रस्त असतो. कधी-कधी लोकांना फोन चार्जिंगला लावून तासनतास थांबावे लागते. अशा परिस्थितीत आपला बराच वेळ वाया जातो. आज आम्ही तुम्हाला असे काही सोपे टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल फोन जलद चार्ज करू शकता. चला त्या उपायांबद्दल जाणून घेऊया – *ओरिजनल चार्जर … Read more

मुंबईतील ‘त्या’ दहा लसीकरण शिबिरांत सलाइनचे पाणी; पोलिसांचे स्पष्टीकरण

मुंबई : कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील बोगस लसीकरण प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लसीकरण झालेल्या दहा शिबिरांत सलाइनचे पाणीच दिल्याचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील  यांनी  स्पष्ट केले. मात्र अद्याप ७८४ लसींचा हिशेब पोलिसांना लागत नसून त्यानुसार चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगस लसीकरण प्रकरणात अद्याप मुंबईत नऊ आणि ठाण्यात एक … Read more

पुणे : खबऱ्याला वाचवणाऱ्या पोलिसांवर हल्ला

सुमारे 150 जणांवर गुन्हा दाखल पुणे – पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून जमावाने खबऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा बचाव करणाऱ्या पोलिसांवरच सुमारे दीडशे जणांनी हल्ला केला. यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले. जमावात मोठ्या संख्येने महिलाही सहभागी होत्या. हा खळबळजनक प्रकार वारजेतील म्हाडा कॉलनीत घडला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात … Read more

राज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर करण्याचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प पुणे, गडचिरोली आणि जालना येथे सुरु करावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  (गुरूवार, दि. १७) दिले. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव श्रीमती केरीकट्टा, आयुक्त डॉ.रामास्वामी, संचालक डॉ.साधना तायडे आदी उपस्थित होते. या … Read more