पुणे जिल्हा | वाल्ह्यात महाविकास आघाडीचा जल्लोष

वाल्हे, (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा एक लाखापेक्षा अधिक फरकाने विजयी झाला. त्यानंतर वाल्हे (ता. पुरंदर) सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला, रॅली काढून त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह, कॉग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी वाल्हे गावठाणातील सिध्दार्थनगरपासून गांधी चौकापर्यंत … Read more

पुणे जिल्हा | वरचेमळा शाळेबाबत आमदार जगतापांची मध्यस्थी

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे जवळील वरचामळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रारदाराने थेट शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्याने अखेर पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांच्या मध्यस्थीला यश आले असून बाधित कुटुंबाने शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला असल्याचे निलेश कुदळे यांनी सांगितले. वरचामळा येथे निलेश कुदळे यांच्या खासगी … Read more

पुणे जिल्हा | घरघुती बियाणांना प्राधन्य द्या

वाल्हे, (वार्ताहर) – वाढते क्षेत्र बघता बियाणांचा तुटवडा होऊ नये म्हणून घरगुती बियाणे वापरावे; व त्यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी घ्यावी, बियाणे पेरतात त्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन कृषी सहायक मयुरी नेवसे यांनी शेतकर्‍यांना केलेआहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हेजवळील भुजबळ कामठवाडी येथील नितीन शहा यांच्या शेतावर कृषी विभागातर्फे, तालुका कृषी अधिकारी एस. … Read more

पुणे जिल्हा | वाल्हे परिसरातील फूल उत्पादक कोमेजला

वाल्हे, (वार्ताहर)- यावर्षी पाण्याअभावी फूलशेती अडचणीत आली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही लागवड केलेली फुलझाडे विहिरी, बोअरचे पाणी आटल्याने सुकून जात आहेत. त्यात सद्यःस्थितीत लग्नसराई नसल्याने फुलांचे भावही गडगडल्याने फूल उत्पादक अडचणीत सापडले आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील शेतकरीवर्ग मागील काही वर्षांपासून परंपरागत शेती सोडून इतर शेती व्यवसायाकडे वळत, शेतकर्‍यांनी फूलशेतीकडे लक्ष केंद्रित केले होते; … Read more

पुणे जिल्हा | उन्हा तान्हात पाण्यासाठी भटकंती

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हेचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्राउत्सव मागील पाच दिवसांपासून उत्साही वातावरणात सुरू आहे. यात्रेनिमित्त अनेक पाव्हणे गावाकडे आले असताना, अनेकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील वाड्या-वस्त्यांना पाण्याचा प्रश्‍न भेडसावू लागला असून, सद्यःस्थितीत सुरू असलेल्या अपुर्‍या टँकरच्या संख्येमुळे दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. वाल्हे परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना भर उन्हात … Read more

पुणे जिल्हा | सुकलवाडीच्या उपसरपंचपदी अमित पवार

वाल्हे,(वार्ताहर)- सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील उपसरपंचपदी अमित अरुण पवार यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच दत्तात्रेय किसन पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर निवड करण्यासाठी सुकलवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संदेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम शेंडगे … Read more

पुणे जिल्हा | वाळवणाच्या कामात महिला व्यग्र

वाल्हे, (वार्ताहर) – सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये शेवया, पापड, कुरड्या, सांडगे, वेफर्स, उपवासाचे साबुदाणा पापड आदी पदार्थ बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. उन्हाळी वाळवण म्हणजे आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची खास ओळख. उन्हाळी वाळवण ही वर्षभर टिकणारी गोष्ट असल्यामुळे ग्रामीण भागात सणासुदीला … Read more

पुणे जिल्हा | नाथ साहेबाचं चांगभलंने वाल्हे दुमदुमले

वाल्हे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्ह गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्या निमित्त ग्राम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या यात्रेची माहिती व वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, नाथ साहेबाचं चांगभलं गजर करीत, गुढी पाडव्यानिमित्त आयोजित ग्राम बैठक संपन्न झाली. गुढीपाडव्या निमित्त पहाटे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के … Read more

पुणे जिल्हा | श्री संत तुकाराम महाराज की जय

वाल्हे, (वार्ताहर) – आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकींच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या वाल्हे (ता. पुरंदर) नगरितील महर्षि वाल्मिकी मंदिरामध्ये तुकाराम बीज उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, श्री संत तुकाराम महाराज की जयच्या जयघोषात तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून भाविकांनी याची देही याची डोळा बीजेचा सोहळा अनुभवला. तर याप्रसंगी विठूनामाच्या गजरात वाल्मिकनगरी दंग झाली होती. श्री संत तुकाराम … Read more

पुणे जिल्हा | वर्ड वॉटर डेची वाल्ह्यात मानवी प्रतिकृती

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्ह्यातील महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये जागतिक जल दिननिमित्त विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वर्ड वॉटर डे (जागतिक जलदिनाची) मानवी प्रतिकृती तयार करुन जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली. जागतिक जलदिन म्हणून 22 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी वर्ड वॉटर डे (जागतिक जल दिन) मानवी प्रतिकृती तयार करून पाण्याचे महत्त्व पटवून दिले. … Read more