सातारा : खंबाटकी घाटात दरीत कोसळला ट्रक

उडी मारल्याने दोघे वाचले, चालक जखमी खंडाळा – पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा येथील खंबाटकी घाटात मालवाहतुकीचा ट्रक दरीत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, अपघातावेळी ट्रकमधील दोघांनी प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतल्याने जीव वाचला. मात्र यात चालक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी पुण्याहून सातारच्या दिशेस जाणारा ट्रक … Read more

पुणे जिल्हा : माळशेज घाटात एसटी थांबवत चालकाची दरीत उडी

जुन्नर – माळशेज घाटातील बोगद्याजवळ महादेव मंदिरासमोर एसटी थांबवत एसटी चालकाने दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. गणपत मारुती इंदे (वय 48, रा. भंडारदरा, ता. अकोले, अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे. इंदे हे अकोले-कल्याण बस घेऊन जात होते. अहमदनगर … Read more

काश्‍मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन न करता काश्‍मिरातच राहावे; मुफ्ती नसीर उल इस्लाम यांचे आवाहन

श्रीनगर – काश्‍मीर खोऱ्यात पुन्हा काश्‍मिरी पंडित आणि हिंदुंना लक्ष्य करून त्यांच्या हत्या करण्याचा प्रकार वाढला असून या घृणास्पद प्रकारांचा श्रीनगरातील ग्रॅंड मुफ्ती नसीर उल इस्लाम यांनी निषेध केला आहे. या प्रकाराची कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली असून त्यांनी लोकांना काश्‍मीर खोऱ्यातील बंधुभावाचे वातावरण कायम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच काश्‍मिरी पंडितांनी किंवा … Read more

जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटनेत वाढ; आतापर्यंतच्या 4 हत्येनंतर संरक्षणाची मागणी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, 12 तासांत दहशतवाद्यांनी 2 गैर-काश्मीरींची गोळ्या मारून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये बिहारचा रहिवासी दिलखुश कुमारचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. दुसरीकडे गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. आतापर्यंत … Read more

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! दीडशे फूट दरीत कार कोसळूनही चालक “सुखरूप’

राजगुरूनगर  – मध्यरात्रीच्या वेळेस, नवीन खेड घाटातून मोटार दगडधोंड्यांवर आपटत दीडशे फूट खोल दरीत पडली, तरी प्रवासी चालकाचा जीव वाचल्याची किमया सोमवारी रात्री घडली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय आला. पोलीस व कार्यकर्ते वेळेत पोहचल्याने त्याचे प्राण वाचले. सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास, पुणे नाशिक महामार्गावरून एक फियाट कंपनीची मोटार (एमएच … Read more

सातारा : कास रोडवरील दरीत युवक कोसळला

सातारा – कास रस्त्यावर गणेश खिंड येथे साडेसातशे फूट दरीत पडलेल्या कनिष्क जांगळे (रा. समर्थमंदीर परिसर, मंगळवार पेठ) या युवकाला आमदार शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यु टिमच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमी कनिष्कला उपचारासाठी सातार्‍यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कनिष्क काल दुपारी दिडच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. उशीरापर्यंत घरी न … Read more

भोर : केंजळ गडावर पर्यटनासाठी गेलेला मुलगा 450 फुटांवरून दरीत कोसळला

भोर – भोर तालुक्‍यातील आंबवडे खोऱ्यातील रायरेश्‍वर किल्ल्यासमोरच वाई हद्दीतील केंजळ गडावर 450 फूट दरीत कोसळून दहा वर्षांचा मुलगा जखमी झाला. पाकिरे वस्तीवरील ग्रामस्थांनी मदतकार्य राबवून त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केंजळ गडावर (दि.12) पहाटे वडील गणेश उरणे (वय 35) व त्यांचे 5 ते 6 तरुण मित्रांसह मयांक … Read more