भीमा कोरेगाव प्रकरण: वरवरा राव यांना जामीन मंजुर

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कवी आणि सामाजिक कार्यकर्ते पी वरावरा राव यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा जामीन मंजुर करताना असे निरीक्षण नोंदवले की, सध्या आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामिनावर सुटलेले 82 वर्षीय राव यांची आरोग्य स्थिती एवढी सुधारलेली नाही की त्यांना … Read more

भीमा कोरेगाव प्रकरण: वरवरा राव यांना 6 महिन्यांचा अंतरिम जामीन

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी तेलगू कवी आणि कार्यकर्ता वरवरा राव यांना सोमवारी सहा महिन्यासाठी अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला. त्यांना 50 हजार रुपयांचा व्यक्तीगत जातमुचलका देण्याचे आदेश देण्यात आले. 82 वर्षीय राव यांच्या पत्नी पी. हेमलता यांनी त्यांची ढासळती प्रकृती आणि वयोमानाप्रमाणे असणारे आजार या कारणांमुळे वैद्यकीय कारणांसाठी जामीन मागणारी … Read more

भीमा कोरेगाव प्रकरण; अखेर वरवरा राव यांना जामीन मंजूर ;परंतु

मुंबई: शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला … Read more

वरवरा राव 7 जानेवारीपर्यंत हॉस्पिटलमध्येच

मुंबई  – एल्गार परिषदेप्रकरणी माओवाद्यांशी संबंध असलेल्याचा आरोप असलेले कार्यकर्ते-कवी वरवरा राव यांना पुढील वर्षी 7 जानेवारीपर्यंत नानावटी रुग्णालयातच ठेवण्यात यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. वरवरा राव यांना खासगी रुग्णालयात ठेवण्याची मुदत आज संपत होती. ही मुदत आज न्यायालयाने वाढवली. विविध व्याधी असलेल्या वरवरा राव यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार गेल्या महिन्यापसून खासगी … Read more

भीमा-कोरेगाव: वरवरा राव यांच्यावर नानावटी रूग्णालयात उपचार करण्यास HCची परवानगी

मुंबई – भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत असलेले तेलगू कवी-लेखक वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रुग्णालयाच्या नियमानुसार वरवरा राव यांना भेटण्यास त्यांच्या पत्नी हेमलता यांना परवानगी देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. राव हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली आहे. हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात … Read more

वरवरा राव यांना चांगल्या उपचारांची गरज

प्रकृती गंभीर : कुटुंबीयांची केंद्र, राज्य सरकारकडे मागणी पुणे – कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी आणि कवी वरवरा राव न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना लवकरात लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली आहे. राव यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ऑनलाइन पत्रकार … Read more

कोरेगाव-भीमा येथे लोटला जनसागर

शिक्रापूर – पेरणेफाटा (ता. हवेली) येथे भीमा नदीच्या तीरावर असलेल्या ऐतिहासिक विजय रणस्तंभास 202व्या शौर्यदिनी मानवंदना देण्यासाठी बुधवारी (दि. 1) विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो समाजबांधवांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. पेरणे फाटा (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. 31) मध्यरात्रीपासून भीमसैनिकांनी मानवंदनेसाठी गर्दी केली होती. दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने … Read more

वरवरा राव यांची हार्ड डिस्क पाठवणार एफबीआयकडे

पुणे : एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी असणाऱ्या संबंधांच्या आरोपावरून अटक केलेले तेलगू कवी वरवरा राव यांच्या जप्त केलेल्या पण खराब झालेल्या हार्डडिस्कमधील माहिती मिळवण्यासाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा एफबीआयची मदत घेण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. राव यांच्या निवास्थानावर ऑगस्ट 2018मध्ये छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ही हार्ड डिस्क जप्त करण्यात आली. या हार्ड डिस्कमधून माहिती … Read more

वरवरा राव यांना कर्नाटक पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे – माओवादी संघटनांशी संबंधांच्या संशयावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना बुधवारी कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटकमधील तुंकुर जिल्ह्यात 2005मध्ये माओवाद्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना राव यांचा ताबा घेतला आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात राव यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च … Read more

वरवरा राव यांच्या जामीनला विरोध

न्यायालयात पोलिसांचा लेखी युक्‍तिवाद पुणे – भावाच्या पत्नीच्या निधनानंतरच्या विधींसाठी तात्पुरता जामीन देण्यासाठी कवी, लेखक वरवरा राव यांनी केलेल्या मागणीला पोलिसांनी विरोध केला आहे. जामीन दिल्यास ते भूमिगत होण्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जामिनाची मागणी फेटाळण्यात यावी, असा लेखी युक्तिवाद न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. सध्या राव हे येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या … Read more