पुणे जिल्हा | वारकरी शिक्षण संस्थेसाठी पाच कोटींचा निधी देणार

आळंदी, (वार्ताहर) – वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. संस्थेला 100 वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत करण्याचे कार्य होत आहे. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा … Read more

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 :00 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना … Read more

वारकऱ्यांना आता विमा संरक्षण मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई –  आषाढी एकादशीनिमित्त अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. याच दरम्यान राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सरकारच्या खर्चातून हे विमा संरक्षण दिले … Read more

Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथ करातून सूट; स्टिकर्स, पासेस घेण्याचे आवाहन..

पुणे :- आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांच्या व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना १३ जून ते ३ जुलै या कालावधीत पथकरातून सूट देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना आपल्या वाहनास पथकरातून सूट मिळणेबाबतचा पास हवा … Read more

ऐन पालखी सोहळ्यात महावितरणचे अघोषित भारनियमन ! राज्यभरातून आलेले भाविक, आळंदीकर घामाघूम

पिंपरी -शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो नागरिक संत ज्ञानेश्‍वरांच्या अलंकापुरीत दाखल झाले आहेत. प्रत्येक धर्मशाळा, हॉटेल आणि स्थानिक नागरिकांच्या घरी देखील भाविक व वारकरी वास्तव्यास आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीतून संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी घेऊन पंढरीला जातात. प्रशासनाकडून यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. महावितरणने देखील आपण वारीसाठी सज्ज … Read more

आळंदीत वैष्णवांचा मेळा ! आतुरता प्रस्थानाची..इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजला

आळंदी -संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा रविवारी (दि. 11) 4 वाजता होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तसेच सोहळ्यासोबत पायी पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. घाट परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे. वैष्णवांचा मेळा आळंदीत दाखल झाला आहे. वारकऱ्यांना आता प्रस्थान सोहळ्याची आणि विठ्ठल भेटीची आस लागली आहे. पालखी प्रस्थान … Read more

पालखी स्वागताचा मान आयुक्‍तांनाच

पुणे – निवडणुका रखडल्याने महापालिका प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार हेच कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आयुक्तच पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महापालिका आयुक्तास ही संधी मिळालेली आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी असताना पालख्यांच्या स्वागताचा मान महापौरांना असतो. मात्र, 15 मार्च 2021 पासून महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती असल्याने आयुक्त कुमार यांना ही संधी … Read more

आम्ही ज्याचे दास। त्याचा पंढरीये वास । तुकोबारायांच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात पंढरीच्या दिशेने प्रस्थान

देहूगाव, -आम्ही ज्याचे दास। त्याचा पंढरीये वास ।। या अभंगाचे स्मरण करत तीर्थक्षेत्र देहूतून तुकोबारायांची पालखी घेऊन पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो भाविकांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने राज्याच्या काना-कोपऱ्यातून वैष्णवांचे मेळे देहूनगरीत दाखल होत होते. विविध धार्मिक कार्यक्रम, हरिनाम, टाळ-मृदंगाच्या गजराने देहूनगरी दुमदुमली अन्‌ पालखी सोहळ्यास शनिवारी प्रारंभ झाला. पालखी सोहळ्याची … Read more

तुकोबांच्या पालखीचे नामघोषात प्रस्थान ! ‘तुकाराम तुकाराम’च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

देहूगाव (रामकुमार आगरवाल) -पंढरीसी जा रे आल्यानो संसारा। दीनांचा सोयरा पांडुरंग ।।1।। वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उताविळ।।2।।… जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढीवारीसाठी शनिवारी (दि. 10) प्रस्थान ठेवले. टाळ, मृदंग आणि खांद्यावर पताका घेऊन ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिराच्या भजनी मंडपामध्ये दुपारी सव्वादोनच्या सुमारास लाखो … Read more

विठ्ठलाचे मंदिर उघडा, अन्यथा लाखभर वारकरी पंढरीत आंदोलन करतील

पंढरपूर – दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचे आंदोलन सर्वश्रुत आहे, तर सर्व धर्मियांना प्रवेश देण्यासाठी विनोबा भावे यांचेही आंदोलन जनता विसरलेली नाही. आता मात्र करोनामुळे साडेपाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे … Read more