करंजी घाटात वाहतूक कोंडी दोन तास वाहनांची दुतर्फा गर्दी

पाथर्डी : नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाथर्डी आणि शेवगाव दोन्ही तालुक्यातून हजारो कार्यकर्ते नगरच्या दिशेने शेकडो वाहाने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने सोमवारी सकाळपासून करंजी घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार विखे यांनी … Read more

पुणे जिल्हा : आळेफाटा बायपास मार्गावर वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

आळेफाटा – जुन्नर तालुक्यातील आळेफाटा बायपास महामार्गावर शुक्रवारी (दि. 22) रात्री रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील असणारी बिबट्यांची संख्या ही दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने वारंवार रात्रीच्याच वेळी पुणे- नाशिक, कल्याण-नगर किंवा आळेफाटा बायपास या महामार्गाचे रस्ते ओलांडताना बिबट्यांचे अपघात होऊन अनेकवेळा मृत्यू होत असतात. मध्यरात्री 12च्या सुमारास … Read more

पिंपरी | आपले वाहन चोरीला गेल्‍यास परत मिळण्याची शक्‍यता कमीच

सहा वर्षांत चोरीला गेलेली ५७३३ वाहने अद्याप सापडली नाहीत ६९५९ दुचाकी, ५६४ चारचाकी, २५४ तीनचाकी, १२४ सायकलींची चोरी सीसीटीव्‍ही कॅमेरे बनलेत शोभेचे खांब गेल्या वर्षी सर्वाधिक ३८ टक्‍के वाहने शोधण्यात आली पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातून दररोज चार ते पाच वाहने चोरीस जात आहेत. चोरीला गेलेल्‍या वाहनांपैकी सर्वांत कमी म्‍हणजे १९ टक्‍के तर सर्वाधिक … Read more

अहमदनगर | बसस्थानक परिसरात रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा

टाकळीभान – मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज टाकळीभान येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावर बसस्थानक परिसरात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंडळाधिकारी प्रशांत ओहळ यांना निवेदन देण्यात आल्यावर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. या रास्तारोकोमुळे श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर दुतर्फा … Read more

PUNE: महापालिका उभारणार ट्रॅफिक पार्क; नागरिकांना मिळणार वाहन शिस्तीचे धडे

पुणे –  शहरातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम तसेच वाहतूकीबाबत जनाजगृती करण्यासाठी महापालिकेकडून फुले नगर येथील महापालिकेच्या इंद्रप्रस्थ उद्यानाच्या सुमारे साडेचार एकर जागेत ट्रॅफिक पार्क उभे केले जाणार आहे. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून तब्बल १५ कोटींचा खर्च करून सीएसआर अंतर्गत हे पार्क उभारले जाणार असून केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी मदत … Read more

PUNE: पावसामुळे वाहन घसरली; सकाळ सकाळ शहरात गोंधळ

पुणे – दाट धुक्यांमध्ये भुरभुर पावसाला सुरवात झाली आणि शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले आॅईल, कचरा यामुळे रस्ते निसरडे झाले. त्यामुळे सकाळी दुचाकी घसरून अपघात होण्याचा घटना वाढल्या. ठिकठिकाणी घटना घडू लागल्याने सोशल मिडियावर याबाबत संदेश पाठवून नागरिकांना जागृत केले जात होते. ऐन कामाच्यावेळी शहरातील विविध रस्त्यांवर हा गोंधळ सुरू झाला. सकाळी आठ वाजल्यापसून आॅफीस, शाळा, … Read more

PUNE: बीएच सीरीजला पुण्यात चांगला प्रतिसाद; गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढले प्रमाण

पुणे – ‘वन नेशन वन नंबर’ अंतर्गत भारत क्रमांकाच्या सीरीजला (बीएच) पुण्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) या सीरीजच्या नोंदीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांची नोंदणी हस्तांतरित (व्हेकल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर) करण्याचे टाळण्यासाठी २०२१ मध्ये रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने बीएच सीरीज सुरू केली होती. एखादे … Read more

सातारा – कासकडे जाणाऱ्या ३०० वाहनांची तपासणी

सातारा – रविवारी रात्री ९ नंतर यवतेश्वर, ता. सातारा येथे सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कासकडे जाणाऱ्या ३०० वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये सहा मद्यपी चालक आढळून आल्याने त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर अनेक तरुण नववर्षाचे … Read more

सातारा – अजिंक्य कॉलनीमध्ये ब्रेकफेल मिक्सर वाहनाचा थरार

सातारा  – येथील अजिंक्य कॉलनीत बुधवारी अचानक मिक्सर वाहनाचा हँडब्रेक सुटल्याने हे वाहन उताराने जाऊन हुंदाई वेरना कार आणि सात दुचाकींना धडकले. हे वाहन गुलमोहराच्या झाडाला धडकून थांबले. ते झाड मुळासकट उन्मळून कारवर पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी सचिन भोसले (रा. निकमवाडी, ता. वाई) याच्यावर … Read more

पुणे जिल्हा : तळेगावात कचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदी

आठ लाखांची तरतूद : समस्यांचे निराकारण होणार तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगांमधून गावातील कचरा व्यवस्थापनासाठी नुकतेच ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली आहे. वाहनाचे लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. आठ लाख वीस हजार रुपयांची खरेदी केली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनास मदत होेईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी दिली. तळेगाव ढमढेरे … Read more