मिरजगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हेंटिलेटरवर; शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवले

कर्जत – सर्वसामान्य नागरिकांना मोफत उत्तम रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली गेली असली तरी, अपुऱ्या सोयीसुविधा आणि प्रचंड निष्क्रियतेमुळे माफक दराची सेवा मिरजगाव परिसरातील लोकांना महागात पडत आहे. येथे नुकत्याच झालेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलांना अक्षरशः जमिनीवर झोपविण्यात आले. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे. येथील आरोग्य … Read more

“मोदी अन् पीएम केअरमधील व्हेंटीलेटर, दोन्हीही फेल”

नवी दिल्ली – करोना संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून राज्यांना व्हेंटीलेटरसह आरोग्य साहित्य देण्यात आलं होतं. मात्र यापैकी बरेच व्हेंटीलेटर बंद आहेत. यावरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल … Read more

राजीव सातव प्रकृती खालावल्याने पुन्हा व्हेंटिलेटरवर; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते घेणार भेट

पुणे : काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच राजीव सातव कोरोनामुक्त झाले होते. परंतु सातव यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज दुपारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जहांगीर रुग्णालयात … Read more

जिद्दीला सलाम! 89 वर्षांच्या आजोबांची करोनावर मात

संगमनेर  -सध्याच्या कठीण काळात जिथे आपण सगळीकडे नकारात्मक परिस्थितीचा अनुभव घेत आहोत. त्याच परिस्थितीत संगमनेरमध्ये नुकत्याच चालू झालेल्या बहुराष्ट्रीय साखळी असलेल्या मेडिकव्हर (तांबे) येथे 89 वर्ष वयाच्या आजोबांना नवीन आयुष्य मिळाले. घसरत जाणारा ऑक्‍सिजन आणि त्याच बरोबर पूर्वीपासून असलेला मेंदूरोग या परिस्थितीमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला पूर्ण सहकार्याची ग्वाही आणि मग डॉ. सुशांत गिते यांच्या देखरेखीखाली, … Read more

मुंबई महापालिका खरेदी करणार 200 व्हेंटिलेटर

मुंबई : मुंबई महापालिकेने 200 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 100 व्हेंटिलेटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली, आता ती पूर्ण झाली असून लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. हे व्हेंटिलेटर … Read more

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 135 हॉस्पिटल्समध्ये 553 व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 135 हॉस्पिटल्समध्ये 553 व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. तर केवळ 9 व्हेंटिलेटर वापराविना पडून असल्याचे आढळून आले आहे. हे व्हेंटिलेटर अन्य खाजगी रुग्णालयांना वापरासाठी उपलब्ध करून देता येतील. शिरूर ग्रामीण रुग्णालयामध्ये 3, मावळ ग्रामीण रुग्णालय 2 आणि खेड तालुक्यातील चांदोली ग्रामीण रुग्णालयांमध्ये 2 व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत. तसेच सासवडमधील माने … Read more

सोलापूरातील पीएम केअरमधील 8 व्हेंटिलेटर धूळखात

सोलापूर – सोलापूर शहरात करोना संसर्गामुळे शहर आणि जिल्ह्यात दररोज मृतांचा आकडा वाढतो आहे. याशिवाय सोलापुरात ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता हा एक तिसराच गहन मुद्दा आता सतावू लागला आहे. त्यामुळे सोलापूर शहर व्हेंटिलेटरग्रस्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोलापूर शहरात रुग्णालयांमध्ये सध्या कोविड व नॉन कोविड अशा आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील … Read more

ईएसआयसी रुग्णालयात 5 व्हेंटिलेटर सुरू

बिबवेवाडी – येथील ईएसआयसी (एम्प्लाइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन) रुग्णालय पालिकेने करोना रुग्णांवर उपचारांसाठी अधिगृहित केले आहे. पण, येथील दुरवस्था आणि गैरसोयींबद्दल “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच येथे 5 व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णालयात ऑक्‍सिजनचे 25 बेड्‌सदेखील आता उपचारासाठी देण्यात आले आहेत. याबाबत नगरसेविका मानसी देशपांडे म्हणाल्या, “शहरात दवाखान्यांची अवस्था नाजूक असून पुढील काळात ऑक्‍सिजनचा … Read more

‘वायसीएम’मधील आठ व्हेंटीलेटर वापराविना

आयसीयू-2 मध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी 15 बेड राखीव पिंपरी – गेल्या आठवड्यात वायसीएम रुग्णालय कोविड रूग्णांसाठी समर्पित करण्यात आले. मात्र येथील आयसीयू-2 हा नॉन कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवला आहे. या आयसीयू मधील आठ व्हेंटीलेटर वापराविना पडून आहेत. करोनाची दुसरी लाट सध्या जोरदार सुरू असून पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित येण्याचे प्रमाण खूपच जादा आहे. तर … Read more

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटर वाढवा; राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वाढतोय मृत्यूचा धोका पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये साधे बेड उपलब्ध होत आहेत. गंभीर रुग्णांना ऑक्‍सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची अधिक गरज आहे. हे बेड उपलब्ध होत नसल्यामुळे करोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो आहे. ही बाब विचारात घेऊन महापालिकेच्या नव्याने झालेल्या … Read more