काळजाचा थरकाप उडवणारी घटना; पोटदुखीमुळे पाच दिवसाच्या बाळाने फोडला टाहो ; आई-वडिलांकडून चिमुरड्याला बिब्बा गरम करुन चटके

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी घटना उघडकीस आली आहे.  पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत होते. मात्र त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यापेक्षा जन्मदात्या आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले, ज्यात बाळाची प्रकृती आणखी बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. घाटंजी तालुक्यातील … Read more

मोठी बातमी ! माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक : तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. गावित यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. माणिकराव गावित यांच्या पार्थिवावर … Read more

माणुसकीला काळीमा! गर्भवती श्वानाची चाकू भोसकून हत्या; वर्ध्यातील संतापजनक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

वर्धा : जिल्ह्यामध्ये  एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका माथेफिरूने गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून श्वानाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांवर काही माथेफिरू हल्ला करत असल्याचे प्रकार समोर आले असून या हल्ल्याचा पुरावा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वर्धा येथील देवळी शहराच्या ठाकरे चौकात एका श्वानावर माथेफिरुने चाकूने … Read more

मद्यप्राशन करून शिक्षक पोहचला शाळेत; वर्गातच लघुशंका करत विद्यार्थ्यांना…

अमरावती : शाळा म्हणजे विद्येचं माहेरघर असते. इथूनच भविष्यातील पिढी निर्माण होत असते. मात्र या विद्येच्या माहेरघराच मद्यालय झाले तर…होय अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील एका शिक्षकाने मद्य प्राशन करून शाळेत प्रवेश केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर शाळेतील सर्व  विद्यार्थ्यांना घरी पाठवून वर्गातच झोप काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. धारणी तालुक्यातील … Read more

धक्कादायक! करोना पॉझिटिव्ह आमदाराचे शंभर कार्यकर्त्यांसह नागपुरात आंदोलन; नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी भाजप  नेते चांगलेच  आक्रमक झाल्याचे दिसत आहे.नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदार कृष्णा खोपडे हे देखील आज शेकडो  कार्यकर्त्यांसह  लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे खोपडे स्वतः … Read more

कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरु

मुंबई : देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे देशात लोकांनी या महामारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यातच कुंभमेळ्यात कोरोनाचा महाउद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेण्याचे काम वर्धा जिल्हा मुख्यालयामार्फत सुरू झाले आहे. पोलिसांनीही कुंभमेळ्यात गेलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून केले आहे. वर्षभरापूर्वी … Read more

नियम पाळा;कोरोना टाळा ! बुलडाण्यात एकाच गावात तब्बल 155 जण कोरोनाबाधित;धार्मिक कार्यक्रमातून संसर्ग?

बुलडाणा : कोरोनाचे नियम न पाळल्यास याचे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार यांचे उदाहरण आता सर्वांसमोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोट्याशा गावात 155 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवासांपूर्वी गावात सात दिवासांच्या धार्मिक कार्यक्रमाचे गावकऱ्यांनी आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त … Read more

अकोला कारागृहात आतापर्यंत ६८ कैदी कोरोना बाधित

अकोला: अकोला जिल्हा कारागृहातील ६८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यातील बरीच संवेदनशील आहेत. तुरुंगातच आयसोलेशन वॉर्ड बनविण्यात आला आहे. कैद्यांची काळजी घेण्यासाठी सर्व व्यवस्था केली असल्याचे, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, यांनी सांगितले.  दोन दिवसांपुर्वी १८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर रविवारी आलेल्या अहवालात सुमारे ५० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन … Read more

यवतमाळमध्ये करोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद

मुंबई : एकीकडे राज्यात करोनाने थैमान  घातले आहे. त्यातच आतापर्यंत एकही मृत्यू न झालेल्या यवतमाळमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १२५ पर्यंत गेला असून यापैकी ९९ जण बरे होऊन घरी गेले … Read more

अरुण गवळीला पाच दिवसात नागपूर कारागृहात शरण येण्याचे आदेश

मुंबई : कुख्यात गुंड अरूण गवळीला नागपूर उच्च न्यायालयाने  दणका दिला असून पाच दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचा आदेश दिला आहे. अरुण गवळीने २४ तासांत मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्याची परवानगी मागावी. ती परवानगी एका दिवसात मंजूर करावी आणि त्यानंतर तीन दिवसात अरुण गवळीने नागपूर गाठावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. यापुढे पॅरोलला … Read more