अकोल्यात करोनामुळे आणखी दोघांचा बळी

मुंबई : अकोला  शहरात करोनामुळेआणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दोन रुग्णांचा १९ मे रोजी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३ जणांचे मृत्यू झाले आहेत. शहरात शुक्रवारी आठ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३४९ वर पोहोचली. सध्या १२० … Read more

अकोल्यात आतापर्यंत २७९ पॉझिटीव्ह, प्रत्यक्षात ११५ रुग्णांवर उपचार सुरु

अकोला: आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१४ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आधीच मयत झालेल्या एकाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला तर आधीपासून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. असे दोघे जण आज मयत झाले. तर काल (दि.१८) आणखी २३ जणांना डिस्चार्ज … Read more

लॉकडॉऊनच्या काळातही जनतेला नागरी सेवा उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच जिल्हयातही लॉकडाऊन सुरु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचेही सहकार्य मिळत आहे. या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसोबतच नागरी सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता

पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तत्काळ मिळावे व उपचार, उपाययोजनांना गती मिळावी यासाठी अमरावतीत लवकरात लवकर लॅब सुरू करण्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून, सोमवारपर्यंत ही लॅब कार्यान्वित होईल, अशी माहिती … Read more

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपविभाग करून सूक्ष्म नियोजन आवश्यक -पालकमंत्री यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांची माजी आमदार बी. टी. देशमुख यांच्याशी चर्चा अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नेते व माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले. त्यानुसार कंटेन्मेंट झोन व जोखमीच्या क्षेत्रात उपविभाग तयार करून सर्वेक्षण, तपासणी यांची … Read more

नागपूरमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात नागपूरच्या लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पराज मेश्राम असे या व्यक्तीचे … Read more

नागपुरात करोनाचे आणखी चार रुग्ण आढळले

नागपुर: नागपुरात करोनाचे आणखी चार रुग्ण सापडल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यासोबत नागपुरातील करोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्वजण सतरंजीपुरा येथे करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामधील तिघांना आमदार निवासात विलगीकरणात … Read more

चंद्रपुरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला

मुंबई : राज्यतील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे म्हणत असतानाच आता विदर्भातील चंद्रपूरमध्ये पहिल्या कोरोना बाधिताची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपुरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला आहे, तर महाराष्ट्राची रुग्णसंख्या ही आता ३ हजार ८१ इतकी झाली आहे. १६५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही … Read more

पीडित तरुणीवरील उपचाराचा खर्च सरकारने करावा – चित्रा वाघ 

वर्धा  – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कामावर जाणाऱ्या प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याची धक्‍कादायक घटना घडली होती. या प्रकरणाविरोधात हिंगणघाटमध्ये मंगळवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित तरुणीला जिवंत जाळले होते. पीडित तरुणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ … Read more

तरुणीला जिवंत जाळल्याच्या विरोधात हिंगणघाटात आज सर्वपक्षीय बंद

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कामावर जाणाऱ्या प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याची धक्‍कादायक घटना घडली होती. या प्रकरणाविरोधात हिंगणघाटमध्ये मंगळवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित तरुणीला जिवंत जाळले होते. पीडित तरुणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली. पीडित तरुणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. सोमवारी … Read more