शिरुर तालुक्‍यातील 39 गावांतून वळसे पाटलांना मताधिक्‍य

28 हजार 624 मतांची आघाडी : एकजुटीने काम केल्याचा फायदा मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि विजयी उमेदवार आमदार दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या 39 गावांमधून 28 हजार 624 मतांचे मताधिक्‍य देत या गावांनी वळसे पाटील यांना भक्कम साथ दिली आहे. आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मानसिंग पाचुंदकर … Read more

पावसामुळे धुराडी पेटेना

जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर गळीतासाठी उसाचा प्रश्‍न पुणे – विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. मात्र, वादळी पावसाने यंदा कारखान्यांचे धुराडे हे अजून तीन आठवडे पेटणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा गळीत हंगामावर ऊस टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. महापूर, दुष्काळ, रोगराईचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे राज्यातील कारखान्यांच्या गाळप … Read more

निवडणुकीचे कारण; शेतकऱ्यांचे पुन्हा मरण

पंचनामे सादर करण्यासाठी ५ दिवसांची मुदत पुणे – जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, पण प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून तो भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. यंदा नैऋत्य मोसमी पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले असून, मागील महिनाभरापासून … Read more

तुलनात्मक विकासकामांवर मतदारांचा निर्णायक कौल

शिरूर – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरूर तालुक्‍यातून आमदार बाबूराव पाचर्णे यांना पूर्णपणे नाकारले आहे. विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या आमदारकीच्या काळातील विकासकामे व त्यांनी केलेले योग्य नियोजन याचाच विजय असल्याचे शिक्‍कामोर्तब झाले आहे. शिरूर विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे मत सर्वच जाणकारांचे होते. परंतु ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाली आहे. माजी आमदार पाचर्णे यांच्या … Read more

विकासकामांचाच मुद्दा कळीचा ठरला

शिरूर- हवेली मतदारसंघात मतदारांमध्ये परिवर्तनाचीच लाट मांडवगण फराटा – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा प्रचार करून निवडणुकीत विजय मिळवता येतो का, हा कळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मतदारांचा विचार करत नाहीत का, असाही प्रतिप्रश्‍न निर्माण होत आहे. या दोन्ही घटनांचा दोन निवडणुकांत चांगलाच अनुभव विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दोन्ही दिग्गज उमेदवारांना घेतला आहे. बाबूराव पाचर्णे आणि … Read more

‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल’, बारामतीमध्ये रंगली पोस्टरची चर्चा

बारामती – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकर यांचा तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर आता पोस्टरबाजीला उधाण आले आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये झळकले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ … Read more

पक्षांतर करणाऱ्यांवर आत्मचिंतनाची वेळ

हवेलीतून अशोक पवारांना मताधिक्‍य : आयाराम-गयारामांना जनतेने नाकारले थेऊर – हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागांमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप- शिवसेनेमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय भवितव्याच्या कोलांटउड्याला जनतेने थारा दिला नसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य जनतेने राष्ट्रवादीच्या पारड्यात भरभरून आपली मते टाकल्याने हवेलीमध्ये आमदार … Read more

इंदापूरच्या निवडणुकीत ‘शरयू’चा वाटा

फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्याकडून प्रभावी प्रचार भवानीनगर – इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत मातब्बर नेतेमंडळी आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना सोडून गेले तरी भरणे हे विजयी झाले. या विजयात शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केलेल्या दमदार प्रचारामुळे आणि सर्वसामान्य जनतेने भरणे यांच्या आजपर्यंत केलेल्या कामाला न्याय दिला. त्यामुळे आमदार भरणे हे … Read more

मुळशीत शिवसेनेच्या मतदानात घट

पिरंगुट – भोर विधानसभा निवडणुकीत मुळशी तालुक्‍यात शिवसेनेच्या मतदानात घट झाली. 2014च्या तुलनेत यावेळी शिवसेना उमेदवारास केवळ 1591 मतांची आघाडी मिळाली आहे. तर कॉंग्रेसला गतवेळीपेक्षा जवळपास 21 हजार 146 अधिक मते मिळाली आहे. त्यामुळे एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेला आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. राज्यातील दुर्गम असा भोर विधानसभा मतदारसंघ आहे. यामध्ये भोर, वेल्हा आणि मुळशी या … Read more

सावधान! ‘नोटा’चा वापर वाढलाय

दौंडच्या जागेवर रमेश थोरात यांना ‘नोटा’चा फटका : राहुल कुलांना तारले  पुणे – जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत 14 हजार 994 मतदारांनी “नोटा’चा  वापर केला आहे. हे प्रमाण सरासरी पाऊण टक्‍का आहे. दहा मतदारसंघात दौंड आणि इंदापूर मतदारसंघ वगळता आठ मतदारसंघात मतदारांनी एक हजारी टप्पा ओलांडला आहे. त्या तुलनेत पुणे शहरातील आठ विधानसभा … Read more