सातारा – विकासात कोरेगाव मतदारसंघ देशपातळीवर अग्रेसर

कोरेगाव – कोरेगाव मतदारसंघ विकासात केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशपातळीवर सदैव अग्रेसर राहणार आहे. प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीत दर्जेदार विकासकामे सुरू आहेत. भोसे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. भोसे, ता. कोरेगाव ते भोसे फाटा या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या … Read more

बोरगावच्या सर्वांगिण विकासासाठी कायम कटिबद्ध : आ. बाळासाहेब पाटील

कोरेगाव – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या प्रत्येक गावाला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. बोरगाव येथे आजवर विविध विकासकामे झालेली आहेत. ग्रामदैवत श्री बाळसिध्दनाथ मंदिरासमोर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सभागृहामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव येथे विविध विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि … Read more

सातारा – वर्णे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द

कामेरी – वर्णे व परिसरातील  सर्व वाड्या-वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी दिली. वर्णे (ता.सातारा) येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या ४७ लाख रूपयांचा विविध विकासकामांचा भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच रमेश पवार, अरूणा बर्गे व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, यापूर्वी ही या गावात … Read more

चमचा म्हणून ठेकेदाराने काम करू नये

सातारा – सातारा शहरामध्ये होत असलेल्या विकासकामांचे सारे श्रेय हे सातारकरांचे आहे. ही सर्व कामे दर्जेदार झाली पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. ठेकेदाराने ठेकेदाराप्रमाणे काम करावे, कोणाचा चमचा होऊ नये, अशी खरमरीत टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता केली. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील विविध विकासकामांची शनिवारी सुमारे दोन तास पाहणी … Read more

“अमृत भारत स्टेशन’मध्ये फलटण स्थानकाचा समावेश

फलटण – भारतीय रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अलीकडेच अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फलटणचा समावेश व्हावा म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातत्याने रेल्वे मंत्री अश्‍विन वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. आज त्यास यश आले. संबंधीत विभागाचे पत्र रेल्वे कार्यालयास दिले गेले. सध्या, या योजनेत भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 1275 स्थानके … Read more

जिल्ह्याचा विकास आराखडा करणार : मंत्री विखे

नगर – जिल्ह्याला तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचा मोठा ठेवा लाभलेला आहे. त्याबरोबर येत्या काही दिवसांत जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग मोठ्या संख्येने होत असल्याने राज्यासह अन्य राज्यांशी जोडणारे रस्ते होणार आहे. त्याचा फायदा घेवून पर्यटन व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तसेच जिल्ह्यात औघोगिकरण वाढविण्याचा प्रयत्न करून रोजगार निर्मितीला चालणार देण्यासाठी लवकरच जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय आज झालेल्या … Read more

अपप्रवृत्तींना भीक घालणार नाही : आ. काळे

कोपरगाव -कोपरगाव मतदारसंघाचा होत असलेला विकास आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटत असल्याचे काहींना सहन होत नाही. त्यामुळे विकासात राजकारण आणून विकासालाच आडवे येण्याचा प्रयत्न होत असला, तरी विकासाआड येणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना आजपर्यंत कधीही भीक घातली नाही व यापुढेही घालणार नाही, अशा शब्दांत आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. तालुक्‍यातील डाऊच बुद्रुक येथे जलजीवन … Read more

जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित काम करू या

श्रीनिवास पाटील यांचे आवाहन; पुसेगावला सेवागिरी कृषी व पशूपक्षी प्रदर्शनाचे उद्‌घाटन पुसेगाव – “”जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू या. मी आणि खा. रणजित मिळून दोघांनी जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न जवळ जवळ मिटवत आणला आहे. केवळ खटावच नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भर घालण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षविरहीत व प्रामाणिकपणे काम केले तर जिल्ह्यातील … Read more

देशाच्या जिडीपीने गाठला मागील सहावर्षातील नीचांक

 नवी दिल्ली : सध्या देशात मंदीचे सावट असून दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे जिडीपी संदर्भातील आकडेवारी हि चिंता वाढवणारी आहे. कारण या मध्ये जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. मागील सहा वर्षातील जिडीपीचा हा नीचांक असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी या काळात जीडीपीमध्ये 8.2 टक्के वाढ … Read more