विकास दुबेच्या फरारी साथीदाराला अटक

लखनौ – पोलीस चकमकीत ठार झालेला उत्तर प्रदेशातील गॅंगस्टर विकास दुबे याचा फरारी साथीदार बाल गोविंद दुबे ऊर्फ लालू याला पोलिसांच्या टास्क फोर्सने चित्रकुट येथे अटक केली आहे. त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. लालू हा कानपूर जिल्ह्याच्या बिकरू गावातील रहिवासी होता. विकास दुबे यांच्या हत्येनंतर तो आपली ओळख बदलून … Read more

…त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेश आज शिक्षा भोगतोय

नवी दिल्ली – गॅंगस्टर विकास दुबे याच्या विरोधात 64 गंभीर गुन्हे दाखल होते. तरिही त्याला जामीन मिळाला. याची शिक्षा आज संपूर्ण उत्तर प्रदेशला भोगावी लागत आहे, असे गंभीर ताशेरे सरन्यायाधीश बोबडे यांनी ओढले. एका गुन्हेगाराच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी त्यांनी ही टिप्पणी केली. संबंधित गुन्हेगाराने जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, इतक्‍या … Read more

विकास दुबेच्या आणखी एका साथीदाराला अटक

कानपुर – कानपूरमध्ये आठ पोलिसांची निर्घृण हत्या करणाऱ्या कुख्यात गॅंगस्टर विकास दुबे याच्या एका साथिदाराला पकडण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. शिवम दुबे असे त्याचे नाव असून हा साथिदार पोलिसांच्या हत्याकांडात सहभागी होता, असे समजते. पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनंतर शिवम दुबे फरार होता. यादरम्यान शिवम नातेवाईकांकडे लपून बसला होता. गुरुवारी संध्याकाळी … Read more

विकास दुबेच्या दोघा साथीदारांना न्यायालयीन कोठडी

ठाणे – गॅंगस्टर विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा गुंड अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा साथीदार सोनू तिवारी यांना शनिवारी मुंबई एटीएसमधील दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून अटक केली. या दोघांना ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. सुनवणीवेळी त्रिवेदीचे वकिल म्हणाले, या दोघांवरील गुन्हे उत्तर … Read more

अग्रलेख : धाक चांगला पण…

काही वर्षांपूर्वी “आन’ नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. त्यात खलनायक एका हवालदाराची व नंतर चकमकफेम अधिकाऱ्याची हत्या घडवून आणतो. त्यानंतर “घर में घुस के मारो’चा आदेश पोलीस दलातील सर्वोच्च पातळीवर जारी केला जातो. नंतर खलनायकाच्या टोळीचे एन्काउंटर सुरू होते. आणखी एक “सिंघम’ नावाचा चित्रपट होता. त्यात “पुलीसवालों की न दोस्ती अच्छी ना दुश्‍मनी. तुने … Read more

कानपूरजवळील चकमकीत विकास दुबे ठार

    कानपूर – आठ पोलिसांच्या हत्येला कारणीभूत असलेला उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे हा आज सकाळी कानपूरजवळील चकमकीत मारला गेला. त्याला उज्जैन येथून कानपूरला आणले जात होते त्यावेळी कानपूरजवळ त्यांची गाडी उलटली त्या संधीचा फायदा घेऊन तो पोलिसांवर गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असा दावा पोलिसांनी … Read more

विकास दुबेच्या चकमकीच्या शक्यतेची सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती याचिका

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. मात्र, त्याला सुरक्षित ठेवण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका त्याच्या प्रत्यक्ष हत्येपूर्वी काही तास अगोदरच सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. विकास दुबेच्या पाच साथीदारांच्या हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही … Read more

“आज पोलिसांच्या कामगिरीमुळे माझ्या आत्म्याला समाधान मिळालं…”

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कुख्यात गुंड विकास दुबेला ठार केल्यानंतर शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त केला जात आहे. विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी ३ जुलै रोजी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी ठार झाले होते. यानंतर कुटुंबीयांकडून वारंवार आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली … Read more

गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?

नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले. त्यानंतर आता या चकमकीसंबंधी राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा टि्वट केले आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. अपराधी का अंत हो … Read more

विकास दुबेने चौकशी दरम्यान दिली होती खळबळजनक माहिती

कानपूर : कानपूरमधील आठ पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला. कानपूरमधील … Read more