nagar | आदेशाचे उल्लघंन झाल्यास परवाना होणार रद्द

नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी ‘कोरडा दिवस’चा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. अहमदनगर … Read more

सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धाराशिवकर वर गुन्हा

सातारा – आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खंड्या धाराशिवकर वर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (रा. न्यू विकास नगर, सातारा) याने त्याच्या राहत्या घरासमोर बेकायदेशीरपणे आठ ते दहा लोकांचा जमाव जमवून हलगी व फटाके वाजवून स्वतःची मिरवणूक काढून उच्च न्यायालयाच्या … Read more

#IPL2022 | धोनीचा सहभाग असलेली जाहिरात ‘या’ कारणानं सापडली वादाच्या भोवऱ्यात

मुंबई – आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा सहभाग असलेली एक जाहिरात सध्या वादात सापडली आहे. या जाहिरातीत धोनी एक बस ड्रायव्हर दाखवला गेला असून तो बस रस्त्यात मध्येच थांबवून आयपीएलचा सामना एका दुकानात लावलेल्या टीव्हीवर पाहात असून यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दाखवले गेले आहे. यावरच आता अनेकांनी आक्षेप घेतल्यावर … Read more

Bullock Cart Race: जाणून घ्या बैलगाडा शर्यतींसाठी अटी काय? उल्लंघन झाल्यास 5 लाख दंड, 3 वर्ष सक्तमजुरी

मुंबई – बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी या निर्णयाचं बैलगाडा प्रेमींकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. … Read more

पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रामुळे आचारसंहितेचा भंग

कोलकता  – केंद्रीय योजनांच्या जाहिराती आणि करोना लसीकरण प्रमाणपत्रांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर तृणमूल कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या छायाचित्राचा वापर निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा असल्याची तक्रार त्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच बंगालमधील सत्तारूढ तृणमूलच्या शिष्टमंडळाने बुधवारी … Read more

…आणि अमेरिकेच्या हिंसक आंदोलनात झळकला तिरंगा; शिवसेना खासदार संतापल्या

मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत जो बायडेन यांचा विजय निश्‍चित झाल्यावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेच्या परिसरात गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ घातला आणि पोलिसांबरोबर त्यांचा जोरदार हिंसाचारही झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच या हिंसाचारातील एका आंदोलकाच्या हातात चक्क भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून … Read more

लक्षवेधी : “कुरापतीस्तान’च्या सीमापार कुरापती सुरूच…

-स्वप्निल श्रोत्री पाकिस्तान हे अपयशी ठरलेले राष्ट्र असून पाकिस्तान समोर भारत द्वेषाशिवाय कोणताही दृष्टिकोन नाही. ज्या दहशतवादाच्या बळावर पाकिस्तान आज भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, तोच दहशतवाद पाकिस्तानचा भविष्यात घात करणार हे निश्‍चित आहे. कोणताही देश विकसित तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा त्याच्या आजूबाजूचे देश विकासाच्या वाटेवर असतील. जर शेजारील देशांत अशांतता, अनागोंदी आणि … Read more

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात देशाने आणखी एक सुपुत्र गमावला

कोल्हापूर : भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यात आपला आणखी एक सुपूत्र गमावला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा याठिकाणचे संग्राम शिवाजी पाटील यांना पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आले. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आल्याने पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान … Read more

#IPL2020 : बायोबबलचे उल्लंघन केल्यास कोटींचा दंड

दुबई – करोनाचा(कोव्हिड-19) धोका जगभरात अद्याप कायम असल्याने अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी खास बायोबबल सुरक्षा तयार करण्यात आली आहे. स्पर्धेतील सहभागी संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच संघांशी संबंधित कोणाकडूनही त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित संघाला 1 कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे.  याबाबत बीसीसीआयने समितीसह सर्व संघांना त्याची सूचना दिलेली आहे. जर एखादा खेळाडू या … Read more

गुगल पे कडून नियमांचा भंग झाल्याची तक्रार

दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआय आणि केंद्र सरकारला बजावली नोटीस नवी दिल्ली – “गुगल पे’कडून डाटा लोकलायजेशनशी संबंधित रिझर्व बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग झाल्याची तक्रार असलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आहे. त्या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व बॅंकेकडून प्रत्युत्तर मागितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन.पटेल आणि न्या. प्रतीक जालान … Read more