विरार, मंदिरात जात असताना बिल्डरची धारदार शस्त्राने वार करत हत्या

विरार – विरारमधील एका बिल्डरची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेचा माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निशांत कदम, वय 31 असे खून झालेल्या बिल्डरचे नाव आहे. विरारमधील पूर्वेतील सहकार नगरमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांची एन के एन्टरप्राइजेस … Read more

विरार : उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला फेकले; उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू

विरार – विरार मध्ये एका उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीवरून नवजात बालिकेला खाली फेकून दिल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या बाळाला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे येथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा प्रकार विरारमधील पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीत … Read more

विरार दुर्घटना! आगीत होरपळून पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच हृदयविकाराच्या धक्क्याने पत्नीचा मृत्यू

विरार – विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीत आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच एका रुग्णाच्या पत्नीला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय कुमार दोषी यांच्यावर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात … Read more

विरार अग्नितांडव! मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून २ लाखांची आर्थिक मदत जाहीर

वसई : वसई-विरार येथे करोना रुग्णालयाला लागलेल्या आगोत 13 जणांचा मृत्यू झाला. विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग सुरुवातीला पसरली. तेथे करोना बाधितांवर उपचार सुरू होते. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपात्कालीक निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. तर यात गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. … Read more

भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने टाकली धाड

विरार : भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीने धाड टाकली. ईडीने विवाशी संबंधित पाच ठिकाणी धाडी टाकल्या. सकाळपासून विरारमध्ये ईडीच्या धाडी सुरु होत्या. मनीलॉन्ड्रिंगच्या संबंधातून या सगळ्या धाडी टाकल्या जात असल्याचे समजते. भारतभर गाजलेल्या पीएमसी घोटाळ्यात 5 ते 6 हजार कोटींचे मनीलॉन्ड्रिंग झाले होते. यातले काही पैसे विवाशी संबंधित संस्थेमध्ये गुंतवण्यात आले होते. हा सगळा … Read more

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या पगारातून 10 हजार रुपये कपात करण्याची शिक्षा

विरारमधील दोन भावांच्या मृत्यूचे प्रकरण पुणे – विरारमधील दोन भावांच्या मृत्यू प्रकरण कामात हलगर्जीपणा केल्याने विरार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सध्या येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पोलीस आयुक्त डॉ के.व्यंकटेशम यांनी मासिक पगारातून दरमहा 10 हजार रुपये इतकी रक्कम 2 वर्षे कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे. विरारमध्ये … Read more

गावाकडे पायी जाणाऱ्यांना टेम्पोने चिरडले ; 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई : करोनामुळे सर्व देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यात सर्वच सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आहे. त्यामुळे काहींनी आपल्या गावी परत जाण्यासाठी पायी चालत जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु, अशाच पायी जाणाऱ्यांना टेम्पोने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीतील भारोल परिसरात भरधाव टेम्पोने ७ जणांना चिरडले. या … Read more

अल्पवयीन मुलीशी विवाह; मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल

पालघर : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल मुंबईतील तरूणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, निखील गोखील हा माझगाव येथील रहिवासी आहे. त्याने अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पालघरमधील विरार येथील एका युवतीशी विावाह केला. तिच्यावर फेब्रुवारी 2018 ते गेल्या वर्षी मे पर्यंत तिच्यावर वेळोवेळी … Read more