पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे स्ट्राँगरूम सील

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे तसेच टपाली मतपेट्या आज बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून कडेकोट बंदोबस्त असणारी ही स्ट्राँगरूम आज सील करण्यात आली. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक … Read more

पुणे | मतदान सुरू होण्याअधीच मतदार केंद्रावर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “मॉर्निंग वॉकवरून घरी जाण्यापेक्षा मतदान करूनच घरी जाऊ’ या विचाराने कोथरूड मतदारासंघातील मतदारांनी पहाटे साडेसहा वाजल्यापासून म्हणजेच मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधीच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच केंद्राबाहेर मोठी रांग लागली होती. हे चित्र बहुतांश केंद्रावर दिसून आले. कोथरूड म्हणजे जागरूक मतदार, त्याठिकाणी नेहमीच मतदारांचा … Read more

nagar | मतदानासाठी प्रशासन सज्ज

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या सोमवारी (दि.१३) होणाऱ्या मतदानासाठी श्रीगोंद्यात प्रशासन सज्ज झाले आहे. मतदारसंघात ३४५ मतदान केंद्र असून, २ हजार ५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा तालुक्यातील ११६ आणि नगर तालुक्यातील ४४ गावे असा एकूण १६० गावांचा … Read more

पुणे जिल्हा | मुळशी तालुक्यात 54.79 टक्के मतदान

पौड, (वार्ताहर) – मुळशी तालुक्यात शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. एकूण 54.79 टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली. तालुक्यात एकूण 226 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. माण, मांदेडे, आदरवाडी, भोईनी, शेडाणी, वळणे, दत्तवाडी, नांदीवली येथील विविध केंद्रामधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने, त्यात लागलीच दुरुस्ती करून मतदान सुरळीत करण्यात आले. अनेक ठिकाणी … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या निम्म्या जागांवरील मतदान प्रक्रिया पूर्ण

नवी दिल्ली  -लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, ६१ टक्क्यांहून अधिक मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. मतदानाची अंतिम टक्केवारी उद्या (बुधवार) जाहीर केली जाऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत ३ टप्प्यांत मिळून २८३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निम्म्या जागांवरील मतदान प्रक्रिया … Read more

सातारा | वाई विधानसभा मतदारसंघ प्रशासन मतदानासाठी सज्ज

वाई,(प्रतिनिधी) – वाई विधानसभा मतदारसंघाची प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झालेली असून आज एकूण ४५४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन वाई उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे. मतदान प्रक्रिया … Read more

satara | मतदान प्रक्रियेसाठी माण प्रशासन सज्ज

दहिवडी, (प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघाची पंचवार्षिक निवडणूक २०२४ आदर्श व शांततेत पार पडण्यासाठी मतदानासाठी आवश्‍यक असलेली प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. उज्वला गाडेकर यांनी दिली. या निवडणुकीत माणमध्ये ३ लाख ५० हजार ११ नागरिक मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी माण प्रशासन सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा … Read more

nagar | मतदान प्रक्रियेसाठी १८ हजार ६७० कर्मचारी

नगर,(प्रतिनिधी) – नगर आणि शिर्डी या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी दि. १३ मे रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी ३ हजार ७३४ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १८ हजार ६७० कर्मचारी लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांना येत्या रविवारी (दि..७) प्रशिक्षण दिले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदार संघासाठी एकाच दिवशी … Read more

पुणे | चार हजार मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- यापूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी संवेदनशील मतदान केंद्र निश्‍चित करून मतदानाच्या दिवशी तेथे कोणतेही गडबड होऊ नये साठी वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते. परंतु यंदा प्रथमच पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यांची लिंक पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाला उपलब्ध असणार … Read more

पुणे | पुणे बार असोसिएशनसाठी निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतपत्रिका मिळण्यास विलंब, वकिलांमधील वादावादी, मतदानावेळी हुल्लडबाजी अशा अभूतपूर्व गोंधळात वकिलांची शिखर संघटना पुणे बार असोसिएशन निवडणुकीतील मतदान प्रक्रिया बुधवारी (दि. २१) पार पडली. असोसिएशनच्या ७ हजार ९२३ सभासदांपैकी ३ हजार ९४७ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीतील त्रृटींमुळे मतदान दोनदा पुढे ढकलल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदारांचा उत्साह कमी राहिल्याचे चित्र … Read more