पुणे जिल्हा | इंद्रायणी प्रदूषणाकडे रॅलीद्वारे वेधले लक्ष

आळंदी, (वार्ताहर) – इंद्रायणी नदीचे पाणी 1975 मध्ये पिण्याजोगे होते व सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी रासायनिक युक्त व इतर प्रदूषणाने जलप्रदूषित होऊन ते पिण्या योग्य राहिले नाही. इंद्रायणी नदीजल प्रदूषणाकडे शासनाचे लक्ष जावे यासाठी हा प्रयत्न आहे. दर तीन महिन्यांनी इंद्रायणी नदी संवर्धन जनजागृती व स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवणार आहोत, अशी माहिती मी सेवेकरी … Read more

पुणे जिल्हा | इंद्रायणी नदीची मरणासन्न अवस्था

आळंदी, (वार्ताहर) – इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषणामुळे वारंवार मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) येत असतो. काही दिवस उलटून गेल्यावर नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येतो. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले असून नदीची मरणासन्न अवस्था झाली असून यास जबाबदार असलेल्यांवर फक्त कारवाई करणार एवढेच टुमणे राज्यसरकार लाऊन आळंदीकरांसह भाविकांची घोर फसवणूक करीत असल्याची … Read more

पुणे जिल्हा : इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे उपोषण पाचव्या दिवशी सुरूच

आळंदी – आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दि. 15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे. महाद्वार चौकात हभप मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे. राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी … Read more

PUNE: सिंचन प्रकल्प कमी वेळेत पूर्ण करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे – राज्याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सिंचन प्रकल्प कमी वेळेत पूर्ण केले पाहिजेत. मुख्य सिंचन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच, प्रकल्पात साठविले जाणारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे कालवे, वितरिकांची कामे केली पाहिजेत. जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे करून पाणी गळती थांबवावी. नवीन प्रकल्पांमध्ये केवळ नलिकेद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामांचा समावेश करावा, अशा सूचना … Read more

Alandi : इंद्रायणीतील जलप्रदुषण रोखण्यासाठीच्या उपायोजना कालबद्धरित्या पूर्ण कराव्यात- जिल्हाधिकारी देशमुख

पुणे :- इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या उपाययोजनांना गती देऊन त्या कालबद्ध रितीने पूर्ण कराव्यात. या उपाययोजनांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी … Read more

केमिकलयुक्‍त, मैलामिश्रित पाण्याने मुळा नदीपात्र गुदमरतेय

कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सांगवी – एकीकडे महापालिका मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी करोडो रुपये खर्च करताना दिसते; तर दुसरीकडे कंपन्यांचे फेसाळलेले प्रदूषित पाणी, तसेच ड्रेनेज लाईनचे मैलायुक्त पाणी थेट नदीपात्रात येत आहे. यामुळे पिंपळे निलख परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून, मुळा नदीपात्रात जलपर्णीची चादर पसरली आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकावी आणि प्रदूषित पाणी मुळा नदीपात्रात सोडणाऱ्या … Read more

मानवनिर्मित प्रदूषण अन्‌ ‘उजनी’चे मरण; अनेक जलीय परिसंस्था संकटात!

पाण्याला दुर्गंधीयुक्त हिरवातवंग ‘उजनी’च्या मरणकळा : अक्षय आखाडे पुणे – सोलापूर-पुणे तसेच नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या उजनी जलाशयाच्या पाण्यावर दुर्गंधीयुक्त हिरवट तवंग आल्याने हे पाणी पिण्यासाठी सोडाच, पण हात धुण्यालायक राहिले नाही, असा निर्वाळा गेल्या दोन वर्षांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने दिला आहे. एकेकाळी स्वच्छ, निर्मळ असलेल्या जलाशयात पुणे परिसरातील सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी, कोणतीही प्रक्रिया … Read more

५६ कोटी रुपये सांडपाण्यात! पुणे पालिकेच्या कारभाराचा आणखी एक नमुना

सांडपाणी वाहिन्या चेंबरला जोडल्याच नाहीत : वर्षभरानंतरही ठेकेदारावर कारवाईदेखील नाही सिंहगड रस्ता – नाल्यांद्वारे नदीत जाणारे सांडपाणी थेट मैलापाणी केंद्रात वाहून नेण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु, या वाहिन्या चेंबरला जोडण्याचा विसरच पालिकेला पडल्याने या वाहिन्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत जाऊन जल प्रदूषण होत आहे. पटवर्धन बाग परिसरातील अर्धवट कामामुळे हा महानगरपालिकेच्या … Read more

जलप्रदूषण रोखण्यासाठी सूर्योदयापूर्वीच चंद्रोदय

दक्षिण गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचे कौतुक नाशिक – जलप्रदूषण ही समस्या देशभरात पसरलेली असताना एक जलरक्षक मात्र, आपल्या कार्याने त्यावर नियंत्रण राखण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे. चंद्रकिशोर पाटील असे या जलरक्षकाचे नाव आहे. नाशिकच्या गोदातिरावर सूर्याचा उदय होण्यापूर्वीच चंद्रोदय होतो. हाच चंद्रकिशोर सध्या सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या पोस्टमुळे कौतुकाचा विषय बनला आहे. … Read more

नदी प्रदूषणाबाबत ‘एमपीसीबी’कडून पिंपरी-चिंचवड महापालिकेविरोधात खटला दाखल

पिंपरी – पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांमध्ये प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या 32 एमएलडी सांडपाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) महापालिकेला वारंवार विचारणा करण्यात आली. त्यानंतरही याबाबत ठोस कार्यवाही न झाल्याने महापालिकेविरोधात मंडळाने मुख्य न्यायदंडाधिकारी (पुणे) यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रात 32 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया … Read more