पुणे जिल्हा : चिंबळीत भीषण पाणीटंचाई

दिवसाआड पाणीपुरवठा पण तोही दूषितच चिंबळी : खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दक्षिण भागातील चिंबळी येथे पिण्याच्या पाण्याची भीषणटंचाई जाणवत असून दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा कमीदाबाने आणि काहीकाळच होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. चिंबळी येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावठाण हद्दीत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून इंद्रायणी नदीकाठच्या विहीचे पाणी आणून सार्वजनिक नळजोड करून पाणीपुरवठा … Read more

पुणे जिल्हा | दूषित पाणी शेतीसाठी विष ठरणार

लोणी काळभोर, (वार्ताहर)- ऐन पाणी टंचाईच्या काळात जुना मुठा उजव्या कालव्यातील दूषित पाणी शेतक-यांच्या दृष्टीने “अमृत” ठरले आहे. मात्र हे पाणी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शुद्ध करुन पुणे महानगरपालिकेने द्यावे अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे. असे न झाल्यास आगामी काळात हे पाणी “विष” ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये सन … Read more

पुणे जिल्हा | वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीटंचाईची झळ

थेऊर, (वार्ताहर)- दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पूर्व हवेलीतील काही गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी झाडे कोसळल्याने तर काही भागात झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे हवेलीतील पूर्व भागातील नागरिकांचे हाल झाले आहेत. आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी, … Read more

पुणे जिल्हा | भोर तालुक्यात पाणी टंचाईचा फटका जनावरांना

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रातील असणाऱ्या गावांना पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरे, गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. सध्या नीरा देवघर धरणांमध्ये फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे हिरडस मावळातील गावांना पाण्याच्या … Read more

पुणे | पोषण आहारापासून दुष्काळग्रस्त विद्यार्थी वंचित?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील दुष्काळग्रस्त भागामधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मे- जून या उन्हाळी सुटीतही शिजवलेला पोषण आहार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता व पाणीटंचाईची समस्याही दिवसेंदिवस भीषण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी विद्यार्थी पोषण आहार योजनेपासून वंचित राहण्याचा अधिक … Read more

पुणे | ज्वलंत प्रश्‍नांवर मोदी काहीच बोलत नाहीत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्‍यातील पाणीटंचाई, शेतकरी आत्‍महत्‍या यासारख्या ज्वलंत प्रश्‍नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. गेल्या १० वर्षांच्या सत्ता काळात देशातील जनतेसाठी त्यांनी काय-काय केले हे देखील सांगत नाही, कारण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्‍यामुळे नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकारच नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर केली. लोकसभा … Read more

पुणे जिल्हा | पुरंदवासीय पाण्याविना कासाविस

वाल्हे, (वार्ताहर) – मागील वर्षांपासून केंद्रशासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी या योजना पूर्णत्वास गेल्या नसल्याने, तसेच, मागील वर्षाचा अल्प पाऊस, आटलेले पाणवठे व पावसाळ्यापासूनच, दुष्काळी परिस्थितीने दिलेला तडाखा; यामुळे पुरंदर तालुक्यातील गावांना, वाड्यावस्त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.सद्यःस्थितीत सुरू असलेल्या अपुर्‍या टँकरच्या संख्येमुळे दुष्काळाची छाया अधिक गडद … Read more

पुणे जिल्हा : नियोजनाअभावी राज्यात पाणीटंचाई – खासदार सुळे

Supriya Sule on BJP ।

इंदापूर  – सध्या राज्यात 37 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यासाठी राज्य सरकारचे नियोजन नाही. मागील वर्षी डिसेंबर पासून मी शासनाला पाणी नियोजनाबद्दल सांगत होते; मात्र त्यांनी त्यावेळी लक्ष दिले नाही. आज उजनी धरणात देखील उणे चाळीस टक्के पाणी आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतीसाठी, जनावरांसाठी व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी राज्य सरकार … Read more

पुणे जिल्हा | दुष्काळ सदृश खेडमध्ये परिस्थिती

चाकण, (वार्ताहर) – गेल्या 20 ते 22 दिवसांपासून शिरूर व दौंड तालुक्यासाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून दररोज एक हजार क्युसेकने पाणी सोडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी अत्यंत घटली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल अशी भीती धरण परिसरातील शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणाच्या पश्‍चिम भागात पाण्याची … Read more

पुणे जिल्हा | वीसगाव खोऱ्यातील तीन गावांना मोठी पाणी टंचाई

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील वरोडीखुर्द, वरोडीबुदुक व वरोडी डायमुख, या तीन गावांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे, उन्हाचा तडाखा वाढल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाणी, स्वयंपाकघरात लागणारे पाणी, कपडे धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली … Read more