nagar | सोनई गावात मोफत टँकरने पाणी पुरवठा

नेवासा, (प्रतिनिधी) – सोनई (ता.नेवासा) येथे भारतीय जनता पार्टीचे युवानेते ऋषिकेश शेटे यांच्यावतीने टंचाईग्रस्त भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा मोहीम सुरू करण्यात आली. पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या महिला मंडळींच्या चेहऱ्यावर हसू फुलले असून पाण्याची टंचाई असेपर्यंत मोफत पाणी पुरवठा करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. सोनई गावामध्ये मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ दत्तू मस्के, सारंग फोपसे व राजाभाऊ … Read more

पुणे जिल्हा | भोरमध्ये १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

भोर, (प्रतिनिधी) – टँकरसाठी भोर तालुक्यातील पश्चिमेकडील मांढरदेव डोंगर रांगेतील वरवडी खुर्द, ,वरवडी डायमुख, हिरडस मावळ खोऱ्यातील उंबर्डे, शिळिंब, राजीवडी, वारवंड, पऱ्र्हर बु. , नानावळे (शिंदेवस्ती), जयतपाड हुंबेवस्ती, नीरा देवघर धरण क्षेत्रातील शिरवली हिमा, कुडली खुर्द, धानवली हायवे लगतच्या गावामधील शिंदेवाडी, ससेवाडी, करंदी खेबा , मोरवाडी (पाचलिंग) येथे पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारे केला जात आहे. करंदी … Read more

पुणे | विमानतळाला टॅंकरने पाणीपुरवठा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेची वाघोली, विमाननगर तसेच विमानतळाला पाणी पुरवठा करणारी जागतिक पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी सोमवारी दुपारी रावेत परिसरात फुटली. त्याचा फटका वाघोली, विमाननगर तसेच विमानतळाच्या पाणी पुरवठ्यावर झाल्याने महापालिकेला विमानतळाला गेल्या दोन दिवसांपासून टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. दरम्यान, ही जलवाहीनी दुरूस्त करण्यात आली असून गुरूवार दुपारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा … Read more

पुणे जिल्हा | आंबेगावात बेअरवेलचा धडाका

लाखणगाव, (वार्ताहर) – गेल्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढला असून शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला असल्याने आंबेगाव तालुक्यातील विविध गावात पाणी उपलब्ध होण्यासाठी बोअरवेल घेण्याची धडपड सुरू आहे. तालुक्याच्या पश्चिम भाग, पूर्व भागातील दोन्ही धामणी परिसरातील दुष्काळी गावे आणि सातगाव पठार भागातील अनेक गावांमध्ये शेतकरी शेतात, घरासमोर बोअरवेल घेताना दिसत आहेत. अनेकांच्या बोअरवेलला … Read more

पुणे जिल्हा | तहानलेल्या जेजुरीकरांसाठी जलदूत धावले

जेजुरी, (वार्ताहर)- जेजुरी शहरामध्ये प्रचंड दुष्काळामुळे उदभवलेल्या तीव्र पाणीबाणीचा सामना करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी गावकऱ्यांसाठी टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. उन्हाळी पिकांना पाणी न देता गावकऱ्यांना पाणी देत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने जलदूतच धावून आले आहेत. चार दिवसांनंतर खंडेरायाचा सोमवती यात्रा उत्सव आहे. त्यावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक … Read more

पुणे जिल्हा | आणे पठारावर तीव्र पाणीटंचाई

बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पठार भागावर असलेले आणे, नळावणे, आनंदवाडी, पेमदरा येथील जलसाठे कोरडे पडले आहेत. येथील गावांना दोन दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. काही भागात विहिरी, कूपनलिका, तलावांतील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. नदीवरील बंधारे तर केव्हाच उघडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे शेतीपिके … Read more

satara | देऊर तलावातील पाणीपुरवठा विहीर अखेर कार्यान्वित

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागावर ‘दुष्काळी’ हा शिक्का कायमच बसला असून, या भागात सध्या 50 रुपये प्रतिबॅरल या दराने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या भागातील विहिरी कोरड्या पडल्याने, सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. या परिस्थितीत देऊर ग्रामपंचायतीने तळहिरा पाझर तलावातील विहिरीचे 2016 पासून रखडलेले काम पूर्ण करून, गावाला … Read more