पुणे | मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस 50 लाखांचा निधी मंजूर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजेनेच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांच्या खर्चास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासनाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या योजनेच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने यास मान्यता देताना मात्र अटी घातल्या असून त्या अटींचे पालन करून हे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुळशी तालुका … Read more

पुणे जिल्हा | पुरंदवासीय पाण्याविना कासाविस

वाल्हे, (वार्ताहर) – मागील वर्षांपासून केंद्रशासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी या योजना पूर्णत्वास गेल्या नसल्याने, तसेच, मागील वर्षाचा अल्प पाऊस, आटलेले पाणवठे व पावसाळ्यापासूनच, दुष्काळी परिस्थितीने दिलेला तडाखा; यामुळे पुरंदर तालुक्यातील गावांना, वाड्यावस्त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.सद्यःस्थितीत सुरू असलेल्या अपुर्‍या टँकरच्या संख्येमुळे दुष्काळाची छाया अधिक गडद … Read more

पिंपरी | कामशेतमध्‍ये चार दिवसांपासून पाणीबाणी

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत शहरातील काही भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. तर काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांसह ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे वारंवार कोलमडत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून अशुद्ध, तर कधी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गावातील काही भागात चार दिवस पाण्याची … Read more

पुणे | कमी दाबाने पाणी येण्याच्या तक्रारींवर उतारा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुमारे १,३५० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यासोबत सुमारे ७०० प्रेशर सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यामुळे प्रत्येक जलवाहिनीतून कोणत्या भागात किती दाबाने पाणी देण्यात आले याची आॅनलाइन नोंद ठेवण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत सुमारे ३०० सेन्सर्स बसवण्यात आले असून उर्वरित सेन्सर पुढील काही दिवसांत बसविण्यात येणार … Read more

पुणे | समान पाण्याचा दिवस कधी उजाडणार?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकरांना समान पाणी देण्यासाठी २०१७ मध्ये समान पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. पण, दोन वेळा मुदतवाढ देऊनही योजनेचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे पुणेकरांंना पुरेसे पाणी मिळणार तरी कधी? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. तब्बल २,५१५ कोटी रुपयांच्या या योजनेच्या कामाला दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर मार्च-२०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल, असे … Read more

पुणे | पुण्याचे बजेट दहा हजार कोटींचा टप्पा गाठणार

पुणे, {प्रभात वृतसेवा}- शहराच्या विकासाची दिशा ठरविणारे महापालिकेचे २०२४-२५ चे अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार गुरुवारी सादर करणार आहेत. वेतनाचा वाढलेला खर्च, मोठ्या प्रकल्पांची स्थिती पाहता अंदाजपत्रक दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. यंदाही अंदाजपत्रकात प्रशासनाने कोणतीही करवाढ केलेली नाही. त्यामुळे सलग आठव्या वर्षी पुणेकरांवर कोणतीही करवाढ असणार नाही. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे … Read more

satara | खंडाळ्याचा पाणीप्रश्न पूर्णपणे मिटणार

खंडाळा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून खंडाळा शहरासाठी 38.33 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाली आहे. त्यामुळे खंडाळकरांचा पाणीप्रश्न पूर्णपणे मिटणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. शामराव गाढवे यांनी खंडाळा येथे शासकीय विश्रामगृहात मंगळवारी (दि. 27) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. खंडाळ्याची सध्याची पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या काळातील आणि अपुर्‍या … Read more

पुणे | मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे आदेश

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यादृष्टीने पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची … Read more

सातारा – एकाही गावाला पाणी टंचाई भासू देणार नाही

कोरेगाव – विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या एकाही गावाला पाणी टंचाई भासू देणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना केली जाणार असून जेथे जेथे आवश्यक आहे तेथे नव्याने कूपनलिका घेतल्या जातील. पाणीपुरवठा योजनांना अखंडीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसविले जातील, अशी घोषणा आमदार महेश शिंदे यांनी केली. कोरेगाव औद्योगिक वसाहतीतील प्रियांका मल्टीपर्पज हॉलमध्ये शुक्रवारी … Read more

पुणे जिल्हा : चाकणकरांची तहान अखेर भागणार; माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती

चाकण – चाकण शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविणे या 169.76 कोटींच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे 4 डिसेंबर रोजी मंत्रालयामध्ये नगरविकास विभागाच्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीसमोर सादरीकरण होऊन प्रकल्पास अंतिम मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची या प्रस्तावावर सही घेऊन येत्या आठवड्याभरात मंजुरीचा शासन निर्णय पारित होणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी … Read more