राज्याला पुन्हा बसणार अवकाळीचा फटका ; ‘या’ जिल्ह्यांना यलो अर्लट जारी

Unseasonal rain ।

Unseasonal rain । राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा फटका बसणार आहे. हवामानशास्त्र विभागाने आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाजही वर्तवलाय. मागच्या २४ तासांमध्ये जळगावमध्ये उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, … Read more

मुंबईत पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट !

मुंबई – राज्यात मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. परंतु आठवडाभरातच पावसाने उसंत घेतली. त्यानंतर मुंबईकरांना उकाड्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु मुंबईत पुढील चार दिवसांत पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या 23 जून आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्‍यता आहे. या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. … Read more

देशात अन् राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून होणार सक्रिय; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

नवी दिल्ली : राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पण अद्याप काही सक्रीय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे पूर्णपणे थांबली आहेत.  त्यातच आता राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय … Read more

उष्णतेपासून लवकरच दिलासा; हवामान खात्याने व्यक्त केली शक्यता

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताला सोमवारपासून उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. हवामान खात्यानुसार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण असेल. येथील नागरिकांना उष्णतेची लाट आणि कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. 3 मेपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम राजस्थानमध्ये उष्मा कमी होईल, … Read more

26 ऑक्टोबरपासून पुन्हा बरसणार परतीचा पाऊस, सतर्कतेचं आवाहन

नवी दिल्ली: देशातून सध्या नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच राजस्थानातून देशाबाहेर जात आहे. देशात काही ठिकाणी 26 ऑक्टोबर पासून देशाच्या काही भागात पुन्हा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. देशात काही ठिकाणी उत्तरपूर्व म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. देशात ईशान्य मोसमी वारे म्हणजेच परतीचा मान्सून वाऱ्यांमुळे 26 … Read more

औरंगाबादसह मराठवाड्यात रात्रभर पावसाची रिपरिप

औरंगाबाद: 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातून मान्सूनचे माघार घेतली असली तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या ठिकाणीही काल 16 ऑक्टोबर रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहिल, असा अंदाज … Read more

नांदेडला पावसाचा तडाखा, 2 महिला वाहून गेल्या

Maharashtra Rain Update

नांदेड – जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव (नसरत) येथे सोमवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. बैलगाडीत घराकडे निघालेल्या पाच जणांपैकी दोन महिला सावरगाव येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. अन्य तीन जण झाडाला पकडून राहिल्यामुळे बचावले आहेत. सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. पावसामुळे पाणी वाढल्यामुळे ते आपल्या बैलगाडीसह घराकडे येथ … Read more

13 जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईसह कोकण किनारपट्टी क्षेत्रात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काल मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. … Read more

उकाडा वाढतोय! तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा

पुणे – राज्यात गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. परिणामी पुण्यासह बहुतांश ठिकाणी उकाडा वाढला असून, नागरिकांनी उन्हापासून सावधता बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, या भागांमध्ये तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तर विदर्भात तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. विभागातर्फे बुधवारी (दि.21) चंद्रपूर येथे सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस … Read more

पाषाण येथे सर्वाधिक अवकाळी पाऊस

पुणे – शहर परिसरात यंदा 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत सरासरी 22.4 मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतमलाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. देशाच्या किनारी भागात सातत्याने तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याची चक्रीय स्थिती यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे गेल्या … Read more