“टीईटी’तील घोटाळेबाज उमेदवार मोकाट का ?

  राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) निकालात फेरफार करुन 7 हजार 874 उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. या घोटाळेबाज उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी परीक्षा परिषदेला मुहुर्तच सापडत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान घोटाळेबाज उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे कार्य नव्या शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हातूनच घडण्याची अधिकारी वाट पाहत असल्याची शक्‍यताही नाकारता … Read more

राष्ट्रपती 25 जुलैला शपथ का घेतात?; वाचा सविस्तर कसा असतो शपथविधी सोहळा

नवी दिल्ली : 26 जानेवारी 1950 रोजी देशात प्रजासत्ताक लागू झाला. त्याच दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती झाले. तोपर्यंत देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. 1951-52 मध्ये पहिल्यांदा लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका झाल्या. 13 मे 1952 रोजी विजयी होऊन डॉ. राजेंद्र प्रसाद पुन्हा या पदावर पोहोचले. 1957 मध्ये डॉ.प्रसाद … Read more

जाणून घ्या का झाले श्रीलंकेचे आर्थिक ‘दहन’?

 1948 ला ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाल्यानंतर श्रीलंका आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाकडे वाटचाल करीत आहे. अत्यंत मोठमोठाले पायाभूत सुविधांसाठीचे प्रकल्प श्रीलंकेने चीनच्या मदतीने सुरू केले. आता एवढ्या अवाढव्य प्रकल्पांची देशात खरंच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे प्रोजेक्‍ट्‌स करण्यासाठी राजपक्षे कुटुंबाने आग्रह धरला या कुटुंबाचा गेली 20 वर्ष श्रीलंकेतील राजकारणावर मोठा प्रभाव … Read more

पुणे जिल्हा : …म्हणूनच लाखो मतांच्या फरकाने निवडून येतात ‘अजित पवार’ 

त्यांच्या जनता दरबारातून येथे प्रचिती दिगंबर पडकर जळोची – राज्याच्या राजकारणातील उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. राज्याच्या राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान त्यांची प्रशासनावरील असणारी पकड वाखाणण्या जोगी आहे. आपल्या मतदार संघातील  नागरिकांची विविध कामे व समस्यांचा निपटारा जागच्या जागेवर करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.आपल्या मतदार संघातील नागरिकांना … Read more

‘जागतिक हिंदी दिवस’ 10 जानेवारीला का साजरा केला जातो?

नवी दिल्ली : भारत हा अनेक भाषांचा समृद्ध देश आहे, पण भारत मुळात हिंदी भाषेसाठी ओळखला जातो. हिंदीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभर पाहायला मिळतील. 10 जानेवारी हा दिवस हिंदी प्रेमींसाठी खूप खास आहे. हिंदीच्या लोकप्रियतेमुळे जगभरात 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. जगभरात हिंदीचा प्रचार करणे हा या दिवसाचा उद्देश … Read more

फिट दिसणाऱ्या तरुणांना का येतो हार्ट अटॅक?

नवी दिल्ली: भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनानंतर तरुण वयातील आणि फिट दिसणाऱ्या तरुणांना हार्टअटॅकचा बळी का व्हावे लागते असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भारतात तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे असेही या निमित्ताने समोर आले आहे. चाळिशीच्या आसपास तंदुरुस्त शरीर आणि सुखी जीवन हे … Read more

Tribals migrate | आदिवासींचे स्थलांतर का होते ?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमधील निम्मी आदिवासी लोकसंख्या स्थलांतरित ( Tribals migrate ) झाली आहे. भारतातील अदृश्य अशा स्थलांतरित लोकसंख्येवर करोनाच्या साथीमुळे संकटांचे डोंगर निर्माण झाले. आर्थिक ताणामुळे स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये आदिवासींचे प्रमाण मोठे आहे आणि आता बहुसंख्या आदिवासींनी स्थलांतर मान्य केलेले आहे. नागरी भागात वेगाने होणार विकास आणि … Read more

अग्रलेख : लॉकडाऊनची भीती कशाला?

गुजरातच्या राजकोटमध्ये दुर्घटना घडली आहे. करोनाच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच जणांचा त्यात मृत्यू झाला. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असताना त्यांचा मृत्यू झाला. काय दक्षता घेतली ते दिसतेच आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत गुजरातमध्ये अशीच दुर्घटना घडली होती. त्यावेळीही काही लोक प्राणास मुकले. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना घडल्या. रुग्णालयात माणूस प्राण वाचवण्यासाठी जातो. आपल्याकडे लवकर प्राणमुक्‍त होण्याची … Read more

बारामतीचा आलेख अचानक का घसरला?

बारामती – बारामती पॅटर्नचा अवलंब करून नांदेडमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आम्हाला यश मिळाले. बारामती पॅटर्नमुळे एकीकडे आमचा आकडा कमी झाला मात्र बारामतीचाच आकडा पुन्हा वेगाने वाढू लागला आहे, असे काय झाले की बारामतीचा आलेख एकदमच घसरला, असा सवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया यांनी केला. बुधवारी (दि.9) त्यांनी अचानक बारामतीला भेट … Read more

मायक्रोफायनान्सच्या फेऱ्यामध्ये महिला का अडकताहेत; उपाययोजनेसाठी अभ्यासगट नियुक्त करणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कोल्हापूर(प्रतिनिधी) : अलीकडच्या काळात मायक्रो फायनान्सच्या दुष्टचक्रात महिला अडकलेल्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच अभ्यासगटाची नियुक्ती करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, देशामध्ये बचतगटांची चळवळ साधारणता ३० ते ३५ वर्षे सुरू झाली. बचत गटामार्फत महिला … Read more