शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी परतला

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यात हैदोस घातल्यानंतर आता पावसाने रविवारी निरोप घेतला आहे. याविषयीची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असून पाऊस परतल्याने आता दिवाळीत पाऊस नसणार आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतला आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातून देखील मान्सून परतला आहे. … Read more

अंधेरी पोटनिवडणूक:“…म्हणून मी काही बोलत नाही, काय अर्थ आहे..सगळं संपलं,”- गुलाबराव पाटील

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाविरोधात सुरु असलेल्या संघर्षाला भाजपच्या मागहर घेण्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार न देता, भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही अप्रत्यक्षपणे ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई होती. पण भाजपाने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला … Read more

Cincinnati Open 2022 : जोकोविच ‘या’ कारणामुळे ‘सिनसिनाटी ओपन’मधून आऊट…

सिनसिनाटी – सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या सिनसिनाटी ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याने कोविड-19 लसीचा एकही डोस न घेतल्याने त्याला अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी मिळालेली नाही. तसेच न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वर्षातील शेवटच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा यूएस ओपनमध्येही प्रवेश मिळण्याची शक्‍यता नाही. तब्बल 21 वेळा ग्रॅंड स्लॅम विजेता जोकोविच हा … Read more

ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसनचा धक्कादायक निर्णय,”जागतिक बुद्धिबळ…”

नवी दिल्ली – ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसन याने धक्कादायक निर्णय जाहिर करताना पुढील वर्षी होत असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेतली आहे. तब्बल पाच वेळा कार्लसनने ही स्पर्धा जिंकली असून सहावे विक्रमी विजेतेपद पुन्हा एकदा त्याच्यापासून दूरच राहणार आहे. मला आता काही मिळवायचे नाही. याबाबत मी माझ्या संघाशी, जागतिक बुद्धिबळ महासंघाशीही याबाबत चर्चा केली आहे. जागतिक … Read more

Sri Lanka Crisis : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या ‘एक दिवस’आधी श्रीलंकेला आणखी एक राजकीय धक्का

कोलंबो – सध्या श्रीलंका आर्थिक संकटाबरोबरच राजकीय अस्थिरतेशीही झुंजत आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला असून त्यांनी राजीनामाही दिला आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे त्यांचा पदभार संभाळत आहेत. देशातील नव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 20 जुलै रोजी नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. दरम्यान, श्रीलंकेला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रपतीपदाच्या … Read more

भारतीय बॅडमिंटन संघटनेला पत्र लिहित सायनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यावर भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात सर्वकाही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी 15 ते 20 एप्रिलदरम्यान होणार असून सायनाने का माघार घेतली याचे उत्तर भारतीय बॅडमिंटन संघटनेकडेही नसल्याने … Read more

#INDvWI ODI Series | पहिल्या सामन्यातून राहुलची माघार

नवी दिल्ली – भारतीय संघ येत्या रविवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला असून पहिल्या सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला विश्रांती मिळाल्याचे सांगितले जात आहे. या मालिकेसाठी अहमदाबादला दाखल झाल्यावर संघातील तीन कएळाडूंसह चार सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे … Read more

महिला हॉकी संघाची आशियाई स्पर्धेतून माघार

सेऊल – आशियाई चॅलेंजर महिला हॉकी स्पर्धेत एका खेळाडूला करोनाची बाधा झाल्यामुळे या स्पर्धेतून भारताच्या महिला हॉकी संघाने माघार घेतली आहे. संघातील एक महिला खेळाडू करोनाबाधित झाल्यामुळे सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफला विलगीकरणात पाठवण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी दक्षिण कोरियाविरुद्धचा सामनाही रद्द करावा लागला होता. गुरुवारी भारतीय संघाचा चीनशी सामना होणार होता. मात्र, करोनाच्या धोक्‍यामुळे … Read more

“हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे “– राजू शेट्टी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून नव्याने पारित केलेले कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी देशवासीयांची माफी मागत शेतकऱ्यांना आपल्या घरी परतण्याचे आवाहन केलेले आहे.  दरम्यान, पंतप्रधानांच्या या घोषणेवर देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया देत पंतप्रधानांच्या निर्णयाचे … Read more

#T20WorldCup | पराभवानंतर भारताला आणखी एक धक्‍का, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

दुबई – भारतीय संघाला पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर आणखी एक धक्‍का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला या सामन्यात उजव्या हाताला चेंडू लागला होता. त्याच्या हाताचे स्कॅनिंग करण्यात आले असून त्याला या दुखापतीतून पूर्ण बरा होण्यास खूप काळ लागणार असल्यामुळे आता उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 चेंडूत 11 धावा केल्या. हातावर चेंडू … Read more