दिघी-आळंदी वाहतूक विभागाकडून विद्यार्थ्यांमध्ये अपघात, सायबर गुन्हे, महिला अत्याचारांबाबत जनजागृती

आळंदी – दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या वतीने पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा बापू बांगर यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत गुरुवारी (दि. 14) राजमाता जिजाऊ काॅलेज, डुडुळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये अपघात, सायबर गुन्हे, महिला अत्याचार गुन्हे यासंदर्भात पीपीटी दाखवून जनजागृती करण्यात आली. यावेळी दिघी-आळंदी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, सहाय्यक … Read more

महिला अत्याचारावरील विधेयकासाठी विशेष अधिवेशन- गृहमंत्र्यांची

मुंबई : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने यंदाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात कायदा केला जाणार होता. त्यासंदर्भातील नवीन विधेयक अधिवेशनात मांडले जाणार होते. मात्र, करोनाच्या पार्श्‍वभूमिवर सरकारने अधिवेशनाचे कामकाज आटोपते घेतल्याने आंध्र प्रदेश राज्याच्या धर्तीवर महिलांवरील अत्याचार रोखण्याऱ्या विधेयकासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. महिला … Read more

इंदुरीकरांच्या समर्थनार्थ रविवारी अकोले बंद

सर्वपक्षीय बैठकीत घेतला निर्णय : ग्रामपंचायतींचे ठराव करणार गोळा अकोले  – अकोले तालुक्‍याचे भूमिपुत्र व प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ येत्या रविवारी (दि.23) अकोले तालुका बंदचा निर्णय आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. तसेच तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींचे ठरावही गोळा करण्यात येणार आहेत. याबाबत तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदनही देण्यात आले. अगस्ती देवस्थान ट्रस्टचे … Read more

अखेर जिल्हा रूग्णालयात इंदुरीकर महाराजांचा खुलासा

नगर  – गेल्या आठ दिवसांपासून हभप इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्य संदर्भात विषय राज्यात चांगलाच गाजला गेला.आज इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी तसेच सेवकांनी नगर येथे जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन गुपचूप खुलासा सादर केला आहे. दरम्यान या संदर्भामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बोलण्यास नकार दिला आहे तर संबंधित वकिलांनी दोन दिवसांनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी … Read more

वातावरण शांत होण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे 

तृप्ती देसाईंच्या आरोपावरुन अकोलेकर संतप्त अकोले  – निवृत्ती महाराजांनी दिलगिरी व्यक्‍त केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वातावरण शांत होण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे आहेत. यासाठी एकत्र येण्याची व याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व अकोले नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष के. डी. धुमाळ व त्यांचे समर्थक उद्या अकोले येथे बैठक घेण्याची … Read more

इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ तहसीलवर मोर्चा

टाळ मृदंगाच्या गजरात दिले निवेदन  जामखेड – समाजप्रबोधनकार निवृत्त महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ व त्यांच्यावर गुन्हा दाखल करु नये या मागणीसाठी जामखेड येथील भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने वारकऱ्यांसह आज जामखेड तहसील कार्यालयावर टाळ मृदुंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे इंदोरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडले … Read more

गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर यांना काळे फासणार 

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिले प्रभारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन नगर  – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कीर्तनातून महिलांचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात पीसीपीएनटीडी कायद्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा अकोले येथे त्यांच्या घरी जाऊन त्यांना काळे फासण्यात येइल तसेच येणाऱ्या अधिवेशनात गोंधळ घालून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे असा इशारा … Read more

स्मिता अष्टेकर सुपा पोलिसांच्या ताब्यात

इंदुरीकर महाराज, देसाई वादाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई सुपा – निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तृप्ती देसाई या आज नगरला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आल्या होत्या. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा अरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्यापूर्वी शिवसेनेच्या स्मिता आष्टेकर यांनी देसाई यांना नगरला आल्यास फटके देईल, असा इशारा दिला होता. … Read more

…तर मी दिलगिरी व्यक्त करतो

संगमनेर – सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकरांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहूकडून चौफेर टीका होत आहे. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर इंदुरीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, … Read more

इंदोरीकरांनी 25 वर्षांत अनेक चालीरीती बंद केल्या : ना. थोरात

संगमनेर  – इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याच समर्थन करता येणार नाही. मात्र गेल्या 25 वर्षांत त्यांनी केलेल्या प्रबोधनाच्या कामामुळे अनेक चुकीच्या चालीरीती बंद झाल्या. ते आज चालवीत असलेली शाळा असेल किंवा समाज प्रबोधन काम योग्य असल्याच सांगत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी इंदुरीकर महाराजांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला असला तरी समर्थन करणार नाही, असेही स्पष्ट केले. सम … Read more