आज महिलांना मेट्रोचा मोफत प्रवास

पिंपरी – जागतिक महिला दिनानिमित्त आज (दि. 8) भाजपाच्या वतीने शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो प्रवास करण्याची संधी असणार आहे. महिला दिनाच्या दिवशी मेट्रोची पहिली सफर सकाळी साडेसात वाजता सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली. याबाबत माहिती देताना महापौर ढोरे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 : क्रीडाक्षेत्रातील करिअर-महाराष्ट्रातील महिलांसमोरील आव्हान व जबाबदारी….

गेली अनेक वर्ष सातत्याने महाराष्ट्रातील महिला खेळाडूंची विविध खेळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. राष्ट्रकुलच नव्हे तर इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांचा पदक विजेत्यांमध्ये सहभाग होता. त्याच बरोबर आतापर्यंत झालेल्या चारही खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत अशी अनेक नावे घेता येतील … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 : शहरात मुलींचा जन्मदर कमीच

प्रकाश यादव पिंपरी  – औद्योगिक, कामगारनगरी ते स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटीकडे वाटचाल करत असताना पिंपरी-चिंचवड शहरात मुलींचा जन्मदर मात्र मुलांच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी जन्माला आलेल्या एकूण शिशूंमध्ये एक हजार मुलांमागे सरासरी 80 मुली कमी आहेत. तथापि, समाजात अजूनही मुली नकोशा झाल्या आहेत की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 : विकासकामातून जनसेवेचा वसा

माझ्यासाठी समाजकारण म्हणजे वंचितांना मदत आणि प्रभागाचा विकास करणे होय. हा जनसेवेचा वसा मी व माझे पती दोघेही मिळून सुरू ठेवू. आमच्या कुटुंबाची समाजकारणातून जनसेवा करण्याची पंरपरा आहे. यासाठी मी आणि माझे पती कटिबद्ध आहे. – माया संतोष बारणे.   पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमधील नागरिकांनी एका महिलेच्या हाती कारभार देत तिला नगरसेविका केले. त्याच महिलेने … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 :सुखी जीवनासाठी समाजकार्याचा वसा घेतलेल्या जयश्री सातव पाटील

आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजातील गोरगरीब लोकांना नेहमी मदतीचा हात पुढे करून त्यांचे जीवनही सुखी करण्यासाठी अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणून वाघोली येथील जयश्री राजेंद्र सातव पाटील यांचे कुटुंबीय. महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी अविरतपणे कार्य करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व इतर क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या जयश्री राजेंद्र … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 : प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारीयशस्वी उद्योजिका अर्चना आंधळकर

घरची व्यावसायीक पार्श्‍वभूमी तसेच सासर व माहेरकडून मिळालेल्या पाठिंब्यावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अर्चना विशाल आंधळकर यांनी गृहीणी ते यशस्वी उद्योजिका असा खडतर प्रवास करीत यश मिळवून समाजात आदर्श निर्माण केला आहे. जिद्द चिकाटी, इच्छाशक्तीच्या बळावर आंधळकर यांनी समर्थ बालाजी फरसाणचा ब्रॅंड रुजविण्यात यशस्वी झाल्या आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त अर्चना विशाल आंधळकर यांच्याशी साधलेला संवाद. … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 : संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सुजाता पांडकर

प्रतिकूल परिस्थिती, जबाबदारीचे भान, वास्तवता ओळखल्यास माणूस संघर्षाच्या वाटेवर परिपक्‍व होत असतो. यातच उपक्रमशील शिक्षिका सुजाता पांडकर यांचे नाव अग्रकमाने येते. बारामतीतील नावाजलेली शिक्षण संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे (कै) गजाननराव भीवराव देशपांडे विद्यालयाचे कन्या विभागाच्या विज्ञान, गणिताच्या शिक्षिका सुजाता सतीश पांडकर यांनी शिक्षण क्षेत्रात नावीन्यता, प्रयोगशीलता जोपासली.  23 वर्षांत या प्रवासात माहेर, सासरच्या लोकांनी तोलामोलाची … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 :जागर स्त्रीत्वाचा

स्त्रीत्वाचा अधिकृतपणे जागर करण्याचा आजचा दिवस. महिलांनी स्वतःच्या हक्‍कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत घेलेल्या निर्णयानुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्‍चित … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 : आकाशात चमचमणाऱ्या तारका

नेमेची उन्हाळा पावसाळा तसे आला मार्च महिना आणि महिला दिन.आता सुरू होतील महिला सबलीकरणाच्या गप्पा. एका दिवसापुरत्या.अशाच एका महिला दिनाच्या कार्यक्रमात एका गल्ली नेत्याने व्यक्‍त केलेले मत बघा, म्हणे जसा बैल पोळा तसा आजचा तुमचा दिवस. काय हा विचार अन्‌ बोलणं. खरं तर अशा अनेक महिला आसपास दिसत असतात ज्या प्रेरणा देतात, काहीतरी करण्यास, स्वतःला … Read more

#INTERNATIONALWOMENDAY2022 : प्रेरणादायी आदर्श शिक्षिका सौ. विजया जगदाळे

भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत असतात. संकट कितीही मोठे असले तरी आपले ज्ञानार्जनाचे काम करत समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम शिक्षकांमधून होत आहे. बिदाल (पुनर्वसन) ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहरा बदलून या शाळेची वेगळी ओळख निर्माण करण्यात उपशिक्षिका सौ. विजया संजीवन जगदाळे यांचा मोलाचा वाटा आहे. उत्कृष्ट खेळाडू ते आदर्श … Read more