‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धे’त ‘पुनीत बालन ग्रुप’च्या आरती पाटीलला दोन कांस्य पदके

पुणे : ‘पुनीत बालन ग्रुप’ची पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्य पदके पटकावली. कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत … Read more

गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे मताधिक्याने माझा विजय

Shivajirao Adhalrao Patil ।

– महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन – २६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश मंचर – गेल्या ५ वर्षात झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी मुबई येथे सवांद साधताना सांगितले. शिरूर लोकसभा … Read more

रशियाच्या अध्यक्षपदावर पुन्हा व्लादिमीर पुतिनच ; तब्बल 88 टक्के मते पुतीन यांच्या पारड्यात

Vladimir Putin ।

Vladimir Putin । रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा आपल्याच नावाचा शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 88 टक्के मतांनी पुतीन यांनी दणदणीत विजय मिळवलाय. सलग पाचव्यांदा पुतिन रशियाची सत्ता हातात घेणार आहेत.  एका इंगेजी वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिलंय. रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालांनुसार, व्लादिमीर पुतिन यांनी 87.97 टक्के मतांसह रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय … Read more

पुणे जिल्हा : हाडशीच्या संघाने पटकाविला पिरंगुट करंडक

पिरंगुट – येथे पार पडलेल्या पिरंगुट करंडक 2024 फुल पीच क्रिकेट स्पर्धेत हाडशीच्या सुनील कळमकर स्पोर्टस क्लबने विजेतेपद मिळवले. तर पिरंगुट क्रिकेट क्लबला उपविजेतेपद मिळाले. हाडशी संघाला रोख एक लाख रुपये व चषक तर पिरंगुट संघाला रोख 70 हजार रुपये व चषक देण्यात आला. आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरविण्यात आले. पिरंगुट (ता. … Read more

पुणे जिल्हा : कस्तुरी चव्हाणने पटकावले सुवर्णपदक

नारायणगाव : येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयातील कस्तुरी संदीप चव्हाण विद्यार्थीनीला लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या 67 व्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षाखालील गटामध्ये 4 बाय 100 मीटर रिले क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. कस्तुरीने विक्रमी वेळेत प्रथम क्रमांकाने स्पर्धा पूर्ण केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक आणि क्रीडा शिक्षक बबन … Read more

पुणे जिल्हा : सिकंदर शेख याने जिंकली मानाची गदा

मोईतील पीरसाहेब महाराज यात्रेत रंगला कुस्तीचा आखाडा चिंबळी – मोई (ता. खेड) गावामध्ये पीरसाहेब महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. या कुस्ती स्पर्धेत शेवटची कुस्ती सिकंदर शेख विरुध्द मनजित खत्री यांच्यात झाली. आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते 3 लाख रुपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून लावण्यात आली होती. ही कुस्तीमध्ये सिकंदर शेख याने प्रतिस्पर्ध्याला चितपट … Read more

पुणे जिल्हा : भुगाव येथील गडकिल्ले स्पर्धेत प्रथमेश सांगळे प्रथम

पिरंगुट – भुगाव (ता. मुळशी) येथील गड किल्ले स्पर्धेत प्रथमेश सांगळे यांने वैयक्तिक किल्ला बनविणे स्पर्धेत प्रथम, तर विघ्नहर्ता मित्र मंडळाने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेते व सहभागी स्पर्धकांना शिवस्मारक देऊन गौरविण्यात आले. भुगावचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कालिदास शेडगे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले … Read more

पुणे जिल्हा : मुळशीच्या कन्येची बांगलादेशात सुवर्णपदकला गवसणी

54 किलो गटात स्पोर्टस सॅम्बो आणि कोम्बेट सॅम्बो स्पर्धेत यश पौड  – बांगलादेशला झालेल्या साऊथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धेत कोंढावळे (ता. मुळशी) येथील सानिया पप्पू कंधारे हिने दुहेरी सुवर्णपदकाला गवसणी घातली. 54 किलो गटात स्पोर्टस सॅम्बो आणि कोम्बेट सॅम्बो या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचा तिरंगा बांगलादेशात फडकवला. तसेच मुळशीचा डंकाही आशिया खंडात वाजविला. जोपर्यंत … Read more

#KheloIndia : खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा ठरला सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी

मुंबई : महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात १६१ (५६, ५५, ५०) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. यापूर्वी २०१९ पुणे आणि २०२० आसाम येथेही महाराष्ट्र विजेते ठरले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एका रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. … Read more

अलंकापुरीत जय्यत तयारी

* 144 ठिकाणी बाथरूमची सोय * शहरात 18 ठिकाणी 300 तात्पुरती शौचालये * एकूण 678 शौचालये * 140 मुतारी 20 पाणी टॅंकर एम. डी. पाखरे/ज्ञानेश्‍वर फड आळंदी  :  कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन तयारीला वेग आला आहे. गुरुवारी (दि. 17) ते बुधवारी (दि. 23) कालावधीत आळंदीतील उत्सव सोहळा … Read more