पुणे जिल्हा: ऑनलाइन लाइक, रिव्ह्यू देण्याच्या बहाण्याने 18 लाखांना गंडा

वाघोली -वाघोलीतील आयव्ही इस्टेट परिसरात राहणार्‍या 59 वर्षीय व्यक्तीला टेलिग्राम अ‍ॅपवर मेसेज करून हॉटेलला लाइक व रिव्ह्यू देण्याच्या ऑनलाइन टास्कद्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सुमारे 18 लाख 42 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय फिर्यादीच्या टेलिग्राम अ‍ॅप वर वर्क फ्रॉम होम जॉबबाबत … Read more

G 20 साठी दिल्लीतील कंपन्यांचा मोठा निर्णय ! कर्मचाऱ्यांना करावं लागणार असं काम

नवी दिल्ली – दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जी 20 परिषदेच्या काळात दिल्ली,नॉयडा आणि गुरुग्रामच्या आसपासच्या भागातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा जाहीर केली आहे. परिषदेचा मुख्य कार्यक्रम 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या शिखर परिषदेला 29 राष्ट्रांचे प्रमुख तसेच युरोपियन युनियनचे उच्च अधिकारी आणि 14 आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार … Read more

work from home : वर्क फ्रॉम होम मुळे उत्पादनक्षमतेत घट

वॉशिंग्टन – करोना महामारीच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्रच वर्क फ्रॉम होम ही कार्य संस्कृती रूढ झाली. आता करोना महामारी संपली असली तरीसुद्धा जगातील अनेक देशांमध्ये वर्क फ्रॉम होम ही कार्य संस्कृती चालूच आहे; पण आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे वर्क फ्रॉम होममध्ये कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मॅसाचूसेट्‌स स्कुल ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि कॅलिफोर्निया … Read more

“वर्क फ्रॉम होम’ पिच्छा सोडेना

पिंपरी  – करोनाकाळात देशात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना रुजली. बहुतेक सर्वच लहान-मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, डेस्कटॉप देऊन घरुनच काम करण्याची मुभा दिली. घरुनच काम करण्याच्या या संकल्पेनेने कर्मचारी सुखावले होते. कंपनीने दिलेला संगणकही प्रिय वाटत होता. परंतु आता तोच संगणक कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. करोना आटोक्‍यात आल्यानंतर कार्यालये सुरू झाली आहेत, परंतु वर्क फ्रॉम … Read more

Work From Home: आयटी कंपन्यातील वर्क फ्रॉम होम होणार समाप्त

मुंबई – करोनाच्या काळात भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली होती. अजूनही काही कर्मचारी घरातून काम करीत आहेत. मात्र आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे या कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करा असे सांगत आहेत. भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर पासून कार्यालयातून काम करण्याच्या सूचना जारी केल्या … Read more

पिंपरी: घरबसल्या काम शोधताना महिलेला बसला दीड लाखाचा गंडा

पिंपरी – ऑनलाईन माध्यमावर वर्क फ्रॉम होम (घरबसल्या काम) शोधत असताना अनोळखी व्यक्तींनी फोन करून महिलेला ऑनलाईन उत्पादने खरेदी करून ऑनलाईन विकायची, अशी स्कीम सांगितली. त्यासाठी महिलेकडून एक लाख 63 हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केली. ही घटना 26 आणि 27 एप्रिल 2022 रोजी चऱ्होली बुद्रुक येथे ऑनलाईन घडली. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. … Read more

पुणे शहर परिसरात अतिवृष्टीचा इशारा; कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम देण्याचे महापालिकेचे खासगी अस्थापनांना आवाहन

पुणे – हवामान विभागाकडून शहर आणि परिसरात पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेकडून शहरातील आयटी कंपन्या आणि खासगी अस्थापनांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी सुविधा द्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेकडून शहरातील शाळांना एक दिवसाची सुट्टीही जाहीर केलेली आहे. शहरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळाधार पाऊस सुरू … Read more

‘वर्क फ्रॉम होम’ आता कायदेशीर अधिकार

ॲम्स्टरडॅम : करोना महामारीच्या कालावधीत गेले अडीच ते तीन वर्षे जगात सर्वत्रच वर्क फ्रॉम होमची नवी संस्कृती सुरू झाली आहे. या संस्कृतीला कायदेशीर आधार देण्याचे काम नेदरलँड सरकारने सुरू केले आहेत. नेदरलैंडच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहांमध्ये वर्क फ्रॉम होम हा कायदेशीर अधिकार असल्याचे विधेयक संमत झाले आहे. वरिष्ठ सभागृहांमध्ये हे विधेयक संमत होताच या विधेयकाला कायद्याचे … Read more

वर्क फ्रॉम होममुळे पाठदुखीची समस्या सतावतेय? ‘या’ आसनांचा सराव करून मिळवा त्वरित आराम…

BACK PAIN YOGA |  करोनाच्या काळात घरून काम केल्याने लोकांमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्याच्या गुंतागुंत वाढल्या आहेत. बैठ्या जीवनशैलीमुळे विशेषत: घरून काम करणाऱ्या बहुतेक लोकांमध्ये, सतत बसण्याची सवय बनली आहे, जी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असल्याचे तज्ञ मानतात. संशोधनात असे दिसून आले आहे की बैठ्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये कंबर, पाठदुखी, ग्रीवा आणि गोठलेल्या खांद्यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात … Read more

‘वर्क फ्रॉम होम’ समाप्त : आजपासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन करावे लागणार काम

नवी दिल्ली – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याची मूभा देण्यात आली होती. दरम्यान करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने हा निर्णय … Read more