पुणे जिल्हा | कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार

शिक्रापूर, (वार्ताहर)-  शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार करण्यात आला. शरद रमेश गायकवाड (रा. वाडेगव्हाण, जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शंकर जगताप यांचे ज्ञानराज ट्रेडर्स नावाने दुकान असून त्या माध्यमातून ते डायमंड कंपनीचे खाद्यपदार्थ वेगवगेळ्या दुकानांना देत असताना त्यांच्याकडे कामासाठी शरद गायकवाड हा कामगार ठेवलेला होता. शरद टेम्पोतून इतर दुकानदारांना … Read more

राष्ट्रीय काँग्रेसच्या महासंमेलनाला १५ हजार कार्यकर्ते जाणार – नरेश देसाई

सातारा – राष्ट्रीय काॅंग्रेसला १३८ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने दि. २८ डिसेंबरला नागपूरला पक्षाचे महासंमेलन होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १५ हजार काॅंग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील काॅंग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी मनोहर शिंदे, निवास थोरात, ॲड. श्रीकांत चव्हाण, … Read more

हरियाणातील एका मजुराच्या बॅंक खात्यात अचानक जमा झाले 200 कोटी रुपये; नेमकं प्रकरण काय वाचा

नवी दिल्ली – हरियाणातील चरखी- दादरी येथे राहणाऱ्या एका मजुराच्या बॅंक खात्यात अचानक 200 कोटी रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे हा मजुर आणि त्याचे कुटुंब आनंदी होण्याऐवजी दहशतीच्या छायेत वावरत आहेत. संबंधित व्यक्ती आपल्या खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे पाहून खरेतर हबकला आहे. हे पैसे आले कुठुन याचाच विचार तो आणि त्याचे कुटुंबिय करत … Read more

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार; मॅनहोलमध्ये उतरून काम करताना घडली घटना…

मुंबई – मुंबईत एका व्यक्‍तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेज लाईन साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. 37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी त्याच्यावर कार … Read more

बारामतीच्या आयएसएमटी कंपनीत डोक्यात रॉड पडल्याने कामगाराचा मृत्यू

डोर्लेवाडी : बारामतीतील एमआयडीसीमध्ये लोखंडी पाइप तयार करणाऱ्या आयएसएमटी कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास सकाळ शिफ्टमध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बारामतीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले ,मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संतोष देवकाते (वय ३०) असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नांव आहे. काम करीत असताना … Read more

पुणे: कामावरून काढल्याचा राग अनावर; कामगाराने मालकिणीला पेटवलं; होरपळून दोघांचा मृत्यू

पुणे : कामावरुन कमी केल्याच्या रागातून टेलरिंग दुकानातील कामगाराने मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी भागात घडली. या घटनेत मालकिणीसह तिला पेटवून देणाऱ्या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. कामगार मिलींद गोविंदराव नाथसागर (वय ३५) आणि दुकान मालकिण बाला नोया जोनिंग (वय ३२ रा. मांदळे … Read more

पुणे: कामगारांच्या मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या चौघांना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – येरवडामधील शास्त्रीनगर परिसरात लोखंडी जाळी पडून 5 कामगारांच्या मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. घटनास्थळाची मालकी वाडीया यांची आहे. त्यामुळे जागा मालक आणि ब्लु ग्रास बिझनेस पार्कचे लायझनिंग काम पाहणारी लॅंडवाईज प्रा.लि. आणि कन्स्ट्रक्‍शनचे काम पाहणारे मे. अहलुवालिया कन्स्ट्रक्‍शन इंडिया लि. यांचा एकमेकांशी … Read more

अजिंक्‍यतारा सूतगिरणी कामगारांना वेतनवाढ

सातारा ,वळसे (प्रतिनिधी) –  येथील अजिंक्‍यतारा सहकारी सूतगिरणीतील कामगारांना या जानेवारीपासून भरघोस पगारवाढ करण्यात आली असून यामुळे गिरणी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविडमुळे व्यवसायात आलेली मंदी तसेच बेकारीचे वाढते प्रमाण या सर्व गोष्टींचा विचार करता तसेच वाढलेली महागाई यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये भरमसाठ वाढलेले कापसाचे … Read more

ई- श्रम पोर्टलवर 14 कोटी कामगारांची नोंदणी

नवी दिल्ली – अनौपचारक क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरू केले आहे. चार महिन्यांमध्ये देशातील 14 कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यामुळे एकूण कामगारांच्या 30 टक्के कामगारांची नोंदणी या पोर्टलवर झाली असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना अनेक अडचणी असतात. मात्र … Read more

ओलाच्या स्कुटर कारखान्यात सर्व महिला कामगार असणार

नवी दिल्ली – ओलाच्या स्कूटर कारखान्यामध्ये तब्बल दहा हजार महिला कामगार काम करतील. पूर्णपणे महिलांनी चालवलेली ही जगातील सर्वात मोठी फॅक्‍टरी असेल. ओला कंपनीचे सहसंस्थापक भावेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आत्मनिर्भर महिला होणे गरजेचे आहे. यासाठी महिलाकामगारांची पहिली तुकडी नियुक्त करण्यात आली आहे. या महिलांना आवश्‍यक ते कौशल्य … Read more