पुणे जिल्हा : शेती महामंडळाच्या कामगारांना घरासाठी जागा द्या

इंदापूर/वालचंदनगर – राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्‍यातील शेतीमहामंडळाच्या 14 मळ्यांमध्ये तीन पिढ्यांपासून रहात आलेल्या हजारो कामगारांना हक्काच्या घरासाठी दोन गुंठे जागा मिळावी. व खंडकरी शेतकरी बांधवांच्या शेतजमीनीसंर्दभात राहिलेल्या जमीनीचे वाटप करण्यात यावे अशी आग्रही लक्षवेधी सभागृहात लावून धरली. राज्याचे महसूल … Read more

“डोळसपणे लक्ष ठेवा अन् वेळीच धावून जा…”; पुण्यातील तरुणीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन

मुंबई : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी भरदिवसा रस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. यावेळी तेथील जमावाने बघ्याची भूमिका घेतली परंतु, लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवले. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मनसैनिकांना मदतीसाठी आवाहन … Read more

सव्वाशे किलोचे बेसन, 24 हजार भाकरी ; अकलूजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

अकलूज  : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे 24 हजार भाकरी व 125 किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी दीपकराव खराडे पाटील संस्थेचे … Read more

नागपूरमध्ये अ‍ॅग्रो कंपनीच्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; जवळपास 30 कामगार अडकल्याची भीती

नागपूर : नागपूरमध्ये अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील हिंगणा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामागरांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तर कंपनीमध्ये जवळपास 30 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती … Read more

“गुजरातमधील भाजपा कार्यकर्ते छुप्या पद्धतीने..”; अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आगामी गुजरात निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत  असून त्यामुळे गुजरातमध्ये भाजपाला ‘आप’चे आव्हान निर्माण झाले असल्याचे म्हटले जात आहे.  त्याच पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांबाबत केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. “गुजरातमधील भाजपा कार्यकर्ते छुप्या पद्धतीने आम आदमी पक्षाला समर्थन देत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना स्वपक्षाचाच पराभव पाहायचा आहे”, असे केजरीवाल … Read more

पक्षप्रमुखांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची उपेक्षा कायम

राजधानीत जाऊनही भेटीसाठी वेळ नसल्याची दौंडमधील शिवसैनिकांची खंत चौफुला – शिवसेनेतील बंडामागे एक कारण होते, ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी वेळ देत नव्हते. भलेही या आमदारांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली असली तरी ते एक महत्वाचे कारण समजले जात होते. यावर विश्‍वास ठेवायचा की नाही हा जनतेचा प्रश्‍न आहे. दौंड तालुक्‍यातील कट्टर शिवसैनिक आपल्या … Read more

वारकऱ्यांच्या प्रश्‍नी केंद्रात पाठपुरावा करणार

केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह : माऊलींच्या समाधीचे घेतले दर्शन आळंदी – आळंदीतील प्रलंबित प्रश्‍न आणि वारकरी संप्रदायाच्या अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी दिले. केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका … Read more

स्थानिक अध्यक्ष नसल्याने “एचए’ कामगारांचे प्रश्‍न रखडले

पिंपरी -पिंपरीतील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्‍स कंपनी (एचए) कामगारांचे प्रश्‍न शासन स्तरावर मार्गी लागताना दिसत नाहीत. एचए कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी स्थानिक अध्यक्ष नसल्याने या समस्या निर्माण होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे निवृत्त कामगारांच्या ग्रॅज्युइटी, कामगारांच्या सुट्ट्यांची देणी प्रलंबितच राहत आहेत. एचए कंपनीतील कामगारांच्या समस्या संसदेत मांडण्यासाठी संघटनेच्या अध्यक्षपदी खासदाराची नियुक्‍ती केली जाते. ही कंपनी पिंपरी चिंचवडमध्ये … Read more

युवा कार्यकर्त्यांनी एकसंघ राहावे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – “जनसंपर्क कार्यालय’च्या माध्यमातून पक्ष जनतेच्या घरापर्यंत पोहोचवा. युवा शक्‍ती एकत्र आल्यावर नवीन आणि चांगले बदल घडतात. त्यामुळे ही शक्‍ती एकत्र करण्यासाठी प्रत्येक युवा कार्यकर्त्याने एकसंघ राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. सोमवार पेठ येथे पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे … Read more

कंत्राटी कामगारांची पुणे पालिकेसमोर निदर्शने

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 -महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र लढा देण्याचा … Read more