T20 World Cup 2024 : टीम इंडिया विश्वचषक जिंकण्याची शक्यता कमी..! ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने वर्तवले भाकित, दिले ‘हे’ स्पष्टीकरण…

T20 World Cup 2024  &  Team India – आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. अद्यापही भारताचे बहुतांश खेळाडू हे इंडियन प्रिमिअरा लीग खेळण्यात व्यग्र आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु व्हायला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना, भारतीय संघ सराव करणार कधी आणि सामन्यागणिकची रणनीती ठरवणार कधी, असा प्रश्न आहे. त्यामुळे यावर्षी … Read more

T20 World Cup 2024 : आयर्लंडकडून पराभूत झाल्यानंतर रमीझ राजा पाक संघावर संतापला, म्हणाला “वर्ल्ड कपमध्ये USA सुध्दा…”

T20 World Cup 2024 :  गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी क्रिकेट संघात बदल झाला आहे. बाबर आझम पुन्हा कर्णधार बनला आहे, गॅरी कर्स्टनला मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. याशिवाय पाकिस्तानी खेळाडूही अनोख्या पद्धतीने फिटनेस ट्रेनिंग करताना दिसले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता दिग्गज क्रिकेटर आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ … Read more

T20 World Cup 2024 : रोहित-विराट विश्‍वकरंडक खेळणार; संघ निवडीबाबत निवड समितीची वाढली डोकेदुखी…

मुंबई – बीसीसीआय व निवड समिती यांच्या डोकेदुखीत आता वाढ झाल्याचे समोर आले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा व प्रमुख फलंदाज विराट कोहली यांनी यंदाच्या मोसमात होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी संघ निवड करताना निवड समितीला मोठे खलबत करावे लागणार आहे. तसेच ज्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी … Read more

#CWC2023 : ऑस्ट्रेलियन मीडियाची भारतीय खेळाडूंबद्दल अपमानास्पद पोस्ट; IPL खेळाडू कमिन्स-मॅक्सवेलनं केलं समर्थन..

ICC ODI World Cup Final :  विश्वचषक 2023 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करत विश्वचषक जिंकला. भारत या विश्वचषकात सुरुवातीपासूनच अप्रतिम कामगिरी करत आला होता, आणि एकही सामना गमावलेला नव्हता, पण शेवटचा सामना गमावल्यामुळे भारतीय संघ विश्वविजेता बनू शकला नाही. भारताच्या या पराभवानंतर ऑस्ट्रेलियातील अनेक मीडिया हाऊसनी भारताची खिल्ली उडवली. त्यापैकी … Read more

Urvashi Rautela : ‘भावा…थोडा तरी रिस्पेक्ट ठेव वर्ल्डकप ट्रॉफीचा’; उर्वशी रौतेलाने मिचेल मार्शला सुनावलं, नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्रीच कौतुक

Urvashi Rautela : वर्ल्डकपच्या फायनल (World Cup 2023) सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियांने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्डकपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसकडे सोपवली. या ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एन्जॉय करत होते. यावेळी काही खेळाडूंनी फॅमिलीसोबत ट्ऱॉफी घेऊन फोटो काढले. मात्र यावेळी मिचेल मार्शने … Read more

उर्वशीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला सल्ला देणे पडले ‘महागात’

 Urvashi Rautela  – 19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या ICC विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघासोबतच करोडो देशवासीयांची निराशा झाली. यानंतर सोशल मीडियावर दिसणारी झलक पाहता जगभरातून ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुक होत आहे.     View this post on Instagram   A post shared by Urvashi … Read more

Ahmednagar – विश्‍वचषक जिंकण्यासाठी श्री गणेशास साकडे

नगर  – विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग 10 सामन्यांमध्ये विजय मिळवत अजिंक्‍य राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाने रविवारी होणारा अंतिम सामानही जिंकून क्रिकेटचा विश्‍वचषक जिंकावा. यासाठी नगरच्या विजेता क्रिकेट क्‍लबच्या वतीने शनिवारी ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्या चरणी विश्‍वचषकाची प्रतिकृती ठेवून महाआरती करून साकडे घालण्यात आले. श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या उपस्थितीत आमदार संग्राम जगताप … Read more

World Cup Final 2023 : मुख्य प्रशिक्षक द्रविड यांचाही ठरणार अंतिम सामना, समोर आलं ‘हे’ कारण…

Indian Cricket Team Coach Rahul Dravid : भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश केला. जसा संघातील खेळाडूंसाठी हा सामना महत्वाचा आहे तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठीही महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यानंतर त्यांचा संघाशी असलेला करार संपणार आहे. आता त्यात वाढ होणार नसल्याचे संकेतही द्रविड यांनी दिले आहेत. रवी शास्त्री यांची मुदत … Read more

virat kohli : विश्वविक्रम करताना विराट कोहलीच्या मनगटावर दिसले ‘हे’ खास डिवाइस; काय आहे खासियत आणि किंमत?

virat kohli : विराट कोहलीने (virat kohli) वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) विक्रम त्याच्यासमोरच मोडीत काढला. हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः वानखेडेवर उपस्थित आहे. अखेर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावे केलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा … Read more

World Cup 2023 : भारत vs न्यूझीलंड Semi-final सामन्यासाठी ICC ने पंचांची केली घोषणा…

Umpires For World Cup Semifinal 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 चे लीग (साखळी फेरी) सामने संपले आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीत सर्व नऊ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने त्यांनी विश्वचषत स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला. आता या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि … Read more