‘ना मतदान केले, ना प्रचारात भाग घेतला…’ ; भाजपने ‘या’ ज्येष्ठ नेत्याला पाठवली नोटीस

Jayant Sinha ।

Jayant Sinha । भाजपने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  तसेच येत्या दोन दिवसांत या नोटिशीवर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावला नाही. याशिवाय भाजपने धनबादचे आमदार राज सिन्हा यांनाही नोटीस बजावली आहे.  हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून मनीष जैस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही ना निवडणूक प्रचारात रस … Read more

द्रौपदी मुर्मू यांना “या” राज्यातून मिळाले फक्त एक मत

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदी निवड झाली आहे. येत्या 25 तारखेला त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मुर्मू यांनी एकतर्फी विजय संपादन केला असला तरी त्यांना केरळ या राज्यातून मात्र एकच मत मिळाले आहे. या राज्यात डाव्या आघाडीची सत्ता असून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात आहे. दोन्ही … Read more

द्रौपदी मुर्मू यांना ‘रबर स्टॅम्प’ म्हणणाऱ्यांना भारती पवारांचे सडेतोड उत्तर; म्हणाल्या “’त्या मानसिकतेतून…’”

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू जिंकल्या आहेत. त्या पहिल्या आदिवासी-महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. दरम्यान उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर टीका करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सडेतोड प्रत्यत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. “हा ऐतिहासिक निर्णय असून, सोनेरी क्षण आहे. आदिवासी समाजातील आमची … Read more

यशवंत सिन्हा यांनी द्रौपदी मुर्मू यांचे केले अभिनंदन; विरोधकांचे मानले आभार

नवी दिल्ली  –विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. तसेच, राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी दिल्याबद्दल विरोधकांचे आभारही मानले. देशातील सध्याची स्थिती चिंता वाटण्याजोगी आहे. सध्या सुरू असलेल्या विषारी राजकारणामुळे लोकशाही आणि सामाजिक सलोख्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशावेळी कुठलेही भय न बाळगता नव्या राष्ट्रपती कार्य करतील अशी आशा प्रत्येक … Read more

नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैला? किती असेल वेतन ? जाणून घ्या राष्ट्रपतींचे अधिकार

दिल्ली – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. भाजप प्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांच्यावतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार मैदानात होते. एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचेच पारडे जड होते म्हणूनच त्यांचा विजय सोपा झाला आणि यशवंत सिन्हा पराभूत झाले. या निवडणुकांसाठी सोमवारी, … Read more

President Draupadi Murmu: द्रौपदी मुर्मू विजयी! शिक्षिका, नगरसेवक, आमदार, मंत्री, राज्यपाल आणि आता राष्ट्रपती ! असा होता द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास

दिल्ली – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. भाजप प्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांच्यावतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार मैदानात होते. एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचेच पारडे जड होते म्हणूनच त्यांचा विजय सोपा झाला आणि यशवंत सिन्हा पराभूत झाले. द्रौपदी मुर्मू यांना … Read more

4 वर्षात 2 तरुण मुले आणि पती गमावला; राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार असणाऱ्या द्रौपदी मुर्मू नक्की आहेत तरी कोण?

नवी दिल्ली – ओडिशातील पहारपूर गाव. प्रवेशद्वारावर एक बॅनर आहे. ज्याच्या दोन्ही बाजूला द्रौपदी मुर्मू यांचे मोठे फोटो आहेत. त्यात लिहिले आहे,’राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू, पहारपूर गावात तुमचे स्वागत आहे. येथे एक मोठा पुतळा आहे, जो द्रौपदीच्या पतीचा आहे. ज्यावर ओडिशातील दोन महान कवी सच्चिदानंद आणि सरला दास यांच्या कवितांच्या ओळी कोरल्या आहेत.’ येथून … Read more

आतापर्यंत झालेल्या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती यांची थोडक्यात माहिती

नवी दिल्ली – आज देशात नव्या राष्ट्रपतीची निवड केली जाणार आहे. ते देशाचे १५ वे राष्ट्रपती म्हणून कारभार हाताळतील. भारताचे राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख आणि भारतीय सशस्त्र सेना दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी भारतीय संविधानाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि … Read more

भाजपाची देशातील 1.30 लाख आदिवासी गावांमध्ये जल्लोषाची जय्यत तयारी

नवी दिल्ली – देशाच्या 15व्या राष्ट्रपतींची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.  18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले होते. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत होत असली तरी द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. त्यामुळे भाजपने देशातील 1.30 लाख आदिवासी … Read more

राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल

नवी दिल्ली  -राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल उद्या (गुरूवार) जाहीर होणार आहे. त्या निवडणुकीसाठी 18 जुलैला 99 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. आता उद्या सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला प्रारंभ होईल. त्यानंतर सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला समाप्त होणार आहे. त्यांचे उत्तराधिकारी ठरणाऱ्या 15 व्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 … Read more